इंडियन स्कूल ऑफ ई-बिझनेस या संस्थेतर्फे ई-कॉमर्स क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रशिक्षणाचे विविध उपक्रम राबवले जातात. या शिक्षणक्रमांत अलीकडे ‘डिजिटल आंत्रप्रिन्युरशिप प्रोग्रॅम’ या दोन आठवडे कालावधीच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.
या अभ्यासक्रमात ई-कॉमर्सचे आजच्या काळातील महत्त्व, ई-कॉमर्स उद्योगातील नवे प्रवाह, या उद्योगाच्या वाढीसाठी आवश्यक ठरणाऱ्या सर्जनशील कल्पनांचा विकास, संशोधन आणि नियोजन, व्यापार प्रकल्प, तंत्रज्ञानाची निवड, विक्रीचे विविध पलू, डोमेन नेम निवडीतील व्युहात्मक बाबी, ई-मार्केटिंगसाठी आवश्यक असणारे डिझायिनग आणि जाहिरातीच्या संकल्पना, पैसे अदा करण्याची कार्यप्रणाली, ई-फसवणुकीस आळा घालणारी प्रणाली, ई-विक्रीच्या विविध प्रभावी पद्धती आणि साधने, पॅकेजिंग, साठवणूक केंद्राचे महत्त्व आदी विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.
या संस्थेमार्फत ‘हाऊ टू डू बिझनेस ऑनलाइन?’ हा तीन दिवस कालावधीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम, ‘ई-कॉमर्स मास्टर’ हा सात आठवडे कालावधीचा पदविका अभ्यासक्रम, ‘हाऊ टू स्टार्ट युवर ऑनलाइन स्टार्ट अप’ हा सहा दिवसांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम असे विविध प्रशिक्षणक्रम सुरू करण्यात आले आहेत.

पत्ता- इंडियन स्कूल ऑफ ई-बिझनेस, सेंटर ऑफ ई-कॉमर्स एक्सलन्स, चौथा मजला, प्रीमियर हाऊस, एमआयडीसी, अंधेरी- ´पूर्व, मुंबई- ४०००९३. वेबसाइट- http://www.isebonline.com ईमेल- enquire@isebonline.com