घोसाळे ही भाजी फार प्राचीन असून मूळची भारतातीलच आहे. गर्द हिरव्या रंगाची त्वचेवर काळसर ठिपके असलेली आकाराने लांबट गोल असलेली घोसाळे ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. संपूर्ण जगभरात हिचे उत्पन्न घेतले जाते. भारत, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स व कॅरिबियन बेटे, अमेरिका या सर्व देशांमध्ये घोसाळ्याची लागवड पुष्कळ प्रमाणात केली जाते. घोसाळे हे पीक घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची जमीन चालते. घोसाळे वेलीवर येतात.
हा वेल खूप पसरतो म्हणून तो मांडवावर चढवतात. मांडवावर चढवल्यामुळे घोसाळी चांगली येतात. मराठीत घोसाळे, इंग्रजीत र्श्ीषषर (लुफा), संस्कृतमध्ये स्वादुकोष्टकी तर शास्त्रीय भाषेत झरेंश्रर किंवा कुकुमिस एॅक्युफगुंलसलिन या नावाने ओळखले जाते.
औषधी गुणधर्म
० घोसाळ्यामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, आद्र्रता ब व क जीवनसत्त्व, पिष्टमय व तंतूमय पदार्थ, कॅरोटीन, रिबोफ्लेविन, नायसिन, प्रथिने, खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
० आयुर्वेदानुसार घोसाळे ही अग्नीदीपक, शीतल, मधुर गुणात्मक व कफकारक असतात.
उपयोग
० घोसाळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याने लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्तींनी आहारामध्ये घोसाळ्याची भाजी भरपूर वापरावी यामुळे पोट भरल्याची भावनाही होते व वजन आटोक्यात राहते.
० रक्तदाब, हायकोलेस्टोरॉल, हृदयरोग, मधुमेह हे विकार असणाऱ्या रुग्णांनी आहारामध्ये घोसाळे आवर्जून वापरावे. कारण उष्मांक कमी व तंतूयुक्त पदार्थ जास्त असल्यामुळे वरील सर्व आजार आटोक्यात राहतात. म्हणून घोसाळ्याचा आयुर्वेदामध्ये पथ्यकर भाजी म्हणून उल्लेख केला जातो.
० अंगाचा दाह होत असेल तर घोसाळ्याचा रस त्वचेला लावावा. त्वचेला थंडावा निर्माण होऊन दाह कमी होतो.
० अपचन, आम्लपित्त या विकारांमध्ये घोसाळ्याची भाजी खावी. घोसाळे अग्नीदीपक असल्यामुळे वरील विकार दूर होतात.
० सांध्याच्या ठिकाणी सूज आली असेल किंवा पाय, हात मुरगळला असेल तर घोसाळ्याच्या पानांचा कल्क करून त्यात थोडे गोमूत्र घालून पुरचुंडी बांधावी व ही पुरचुंडी गरम करून दुखावलेल्या भागावर बांधावी. असे केल्याने त्या ठिकाणाची सूज ओसरते.
० घोसाळ्याच्या पानाचा कल्क करून त्यात पाणी टाकून स्वरस काढावा व हा स्वरस साजूक तूपात घालून ते तूप स्वरस आटेपर्यंत शिजवावे व त्यानंतर गाळून डब्यात भरून ठेवावे व हे तूप अंगावरील जुन्या जखमा, फुटलेले बेंड, उष्णता वाढून झालेल्या जखमा, तोंड येणे या सर्व विकारांवर लावावे. यामुळे जखमा लवकर भरून येतात.
० जुलाब होत असतील तर घोसाळ्याच्या बिया ५-१० ग्रॅम घेऊन ताकामध्ये बारीक करून ते ताक प्यावे
० घोसाळ्याच्या ताज्या पानांचा २ थेंब रस डोळे आले असल्यास डोळ्यात घालावा यामुळे डोळ्यांची उष्णता कमी होऊन आग थांबते.
० घोसाळी, जास्वंद, ब्राह्मी, माका, वडाच्या पारब्या घालून खोबरेल व तीळ तेल उकळावे. यामधून तयार झालेले खोबरेल तेल केसांच्या मुळाशी लावल्यास केस पिकणे व गळणे थांबते.
० परिपक्व झालेल्या घोसाळ्याचा आतील रेषायुक्त जाळीदार भाग हा अंघोळीसाठी तसेच भांडी घासण्यासाठी, सफाई करण्यासाठी वापरता येतो.
सावधानता
घोसाळी ही अग्नीदीपक पाचक असल्याने सहसा शरद ऋतूत जास्त प्रमाणात खाऊ नयेत. कारण त्याच्या सेवनाने अधिकच पित्त प्रकोप होऊ शकतो.

– डॉ. शारदा महांडुळे
sharda.mahandule@gmail.com

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Know about This Seven Indian royal families heritage source of income and how they live a luxurious life
आलिशान राजवाडे, गडगंज संपत्ती; ‘ही’ आहेत भारतातील सात श्रीमंत राजघराणी; पण त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
Hanuman mandir in pakistan | A 1500 Year Old Shri Panchmukhi Hanuman Mandir Is In Karachi Pakistan
पाकिस्तानातील १५०० वर्षे जुने श्री पंचमुखी हनुमानाचे मंदिर तुम्हाला माहितीये का?
saraswati River civilization,
यूपीएससी सूत्र : भारतातील प्राचीन सरस्वती-घग्गर संस्कृती अन् पाकिस्तानच्या बंदरात चीनचं गुप्तहेर जहाज, वाचा सविस्तर..