15 January 2021

News Flash

करून बघावे असे काही- गुंतवणूक

गुंतवणूक ० प्रथमच गुंतवणुकीसंबंधी विचार करत असाल तर आधी बँकेत बचत खाते, रिकरिंग खाते उघडा. फार नफा मिळाला नाही तरी बचतीची सवय लागेल. ० बचत

गुंतवणूक
० प्रथमच गुंतवणुकीसंबंधी विचार करत असाल तर आधी बँकेत बचत खाते, रिकरिंग खाते उघडा. फार नफा मिळाला नाही तरी बचतीची सवय लागेल.
० बचत खात्यातील रक्कम हवी तेव्हा काढता किंवा भरता येते तर गुंतवणूक केलेली रक्कम मुदत संपल्यावर मिळते.
० गुंतवणूक ही अधिक काळाकरिता असते. भविष्यातील तरतुदीसाठी बचतीच्या पैशाची गुंतवणूक वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून करता येते.
० गुंतवणूक करणे एक प्रकारची जोखीम असली तरी ही जोखीम कमी व्हावी म्हणून एकाच ठिकाणी गुंतवणूक न करता वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करणे योग्य ठरेल.
० माहीत नसलेल्या कोणत्याही योजनेत जास्त फायदा मिळतो म्हणून पैसे गुंतवू नयेत.
० आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी प्रथम आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.
० गुंतवणूक सरकारी कंपन्यांचे शेअर, विमा योजना, रियल इस्टेट, म्युच्युअल फंड, पीपीएफ, सोने यांमध्ये करता येईल.
० सरकारी कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरते. ओएनजीसी, टाटा कन्सल्टन्सी, भारतीय हेवी इलेक्ट्रिकल्स, आयटीसी, एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया आदी शेअर्समध्ये बाजारातील तेजी-मंदी बघून गुंतवणूक करता येते.
० फिक्स डिपॉझिटमध्ये केलेली गुंतवणूक जोखमीची नाही. एफडीमध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला या रकमेची गरज केव्हा लागेल ते लक्षात घेऊन ती रक्कम किती कालावधीसाठी फिक्स करायची हे ठरवा. मुदतीपूर्वी एफडी मोडल्यास पूर्ण रक्कम मिळत नाही.
० सोन्यामध्ये गुंतवणूक करताना दागिने घेण्यापेक्षा नाणी, चीप, बिस्कीट घेणे सोयीचे ठरेल.
० विमा पॉलिसी घेताना मुलांच्या नावावर पॉलिसी घेणे योग्य ठरेल. मुलांच्या भवितव्यासाठी हे पैसे उपयोगी पडतात शिवाय आयकरात सवलतही मिळते.
० पीपीएफमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर व करमुक्त आहे. पीपीएफमध्ये पती-पत्नी, मुले यांची वेगवेगळी खाती उघडता येतात. हे खाते भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडता येते.
० आपण आयकर दाते असल्यास व आय करात सवलत मिळणार असेल तर भारत सरकारच्या नव्या पेन्शन स्कीम योजनेत गुंतवणूक करता येईल.
० नोकरीचे पैसे हातात आल्यावर आपली स्वप्ने पूर्ण करता करता आपले भविष्य आणि निवृत्तीचा काळही सुखाचा व्हावा यासाठी आर्थिक नियोजन करणे ही काळाची गरज आहे, हे लक्षात ठेवा.

संकलन- उषा वसंत
unangare@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2015 1:01 am

Web Title: investment tips
Next Stories
1 एकल मातेचा अधिकार
2 विवाह‘बंधना’तली ‘एपिलेप्सी’
3 झाडांसाठीची संजीवके
Just Now!
X