आतापर्यंत आपण गच्चीवरच्या बागेसाठी वेगवेगळी खते कशी तयार करायची ते पाहिले. आता गच्चीवरच्या बागेसाठी कुंडय़ा किंवा वाफा कसा भरायचा ते पाहू.

कुंडय़ा किंवा वाफा हा कधीही पूर्ण मातीने भरू नये. कालांतराने मातीतील सत्त्व संपून झाडे फळे, फुले देत नाहीत. माती निर्जीव होते. त्यासाठी कुंडी, वाफा भरताना तळाकडून अधिकचे पाणी वाहून जाण्यासाठी खाली एक छिद्र किंवा वाफ्यातून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था असावी. यात सुरुवातीला नारळाच्या सुक्या शेंडय़ा, उसाचे वाळलेले चिपाड, त्यावर वाळलेल्या काडय़ांचा एक सेंटीमीटपर्यंत थर द्यावा. त्या थरावर कोणत्याही झाडांचा सुकलेला पालापाचोळा, त्यावर वाळलेल्या खरकटय़ा अन्नाचा किंवा वाळलेल्या हिरव्या कचऱ्याचा थर द्यावा. त्यावर माती असे सर्व साधारणत १५-१५ टक्के थर द्यावेत. ते पायाने अथवा हाताने चेपून घेतल्यास उत्तम. वरील मातीचा थर हा ३-४ इंचांचा असला तरी पुरेसा होतो. वरील थरामध्ये भाताचे तूस, शेणखत किंवा घरच्या व्हर्मी कंपोस्टिंग खताचा १-१ इंचाचा थर दिल्यास उत्तम. अशा प्रकारे कुंडी किंवा वाफा भरल्यावर ४ ते ५ दिवस गरजेपुरते मोजकेच पाणी द्यावे. ते वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. यामुळे कुंडीत, वाफ्यात वाफसा तयार होतो. असा वाफा तयार  केल्यावर ३ ते ५ दिवसांनी बियाणे  पेरता येते वा रोपाची लागवड करता येते.

cat
दुबईमध्ये पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या मांजरीची जीव वाचवण्यासाठी धडपड! कारच्या दरवाजाला लटकणाऱ्या मांजरीचा थरारक Video Viral
Worker dies due to suffocation in sewage tank
वसई : सांडपाण्याच्या टाकीत गुदमरून कामगाराचा मृत्यू
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू

त्यासाठी मातीच्या थराची उंची वाढवावी. कालांतराने हे थर खाली बसत जातात. त्यात वरखत, लेंडीखत, माती, वाळलेले शेणखत, घरचे कंपोस्टिंग खत, सुका पालापाचोळा व शेंडय़ांचे आच्छादन देत जावे म्हणजे कुंडी, वाफा भरत जातो.

संदीप चव्हाण – sandeepkchavan79@gmail.com