वडिलांचा भरभक्कम आधार आणि प्रेमळ सहवास मिळाला की मुलं खूप कणखर आणि आनंदी होतात हे आता सर्वेक्षणाने सिद्ध झालं आहे. ज्या वडिलांचं आणि मुलांचं नातं मैत्रीचं, मोकळेपणाचं आणि विश्वासाचं असतं त्या घरातील मुलं आत्मविश्वासी तर होतातच, पण वडीलही त्यांच्या आयुष्यात समाधानी असतात, असं दिसून आलं आहे.

पन्नास-साठ वर्षांपूर्वीच्या तुलनेत आताच्या वडिलांचं आणि मुलांचं नातं खूप बदललं आहे, अधिक मोकळं झालं आहे, हे तर दिसत आहेच. पण ते नेमकं कसं आहे, ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे यंदाच्या ‘फादर्स डे’ निमित्ताने. तुम्ही त्यांचा मुलगा असाल वा मुलगी. आम्हाला सांगा तुमच्या आयुष्यातलं तुमच्या वडिलांचं स्थान. आणि हो, तुम्ही वडील असलात तरी तुम्ही पाठवू शकता तुमचे अनुभव. वडील म्हणून आजच्या मुलांचं पालकत्व आव्हानात्मक ठरतंय का?

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार

आयुष्यात अनेक वळणं येत असतात, मन द्विधा करणारी, कस लावणारी अनेकदा तर नात्याची परीक्षा पाहाणारी.. कसं सामोरं गेलात अशा प्रसंगांना आणि कसं निघालं तुमचं नातं त्यातून तावून सुलाखून? आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर एकमेकांचं बरोबर असणं आश्वासक ठरलंय? आमच्याशी शेअर करा असे प्रसंग, अशा घटना. शाळा-कॉलेजच्या प्रवेशाचा प्रसंग असो वा नोकरी निवडण्याचा किंवा अगदी जोडीदार निवडण्याचा, योग्य मार्ग निवडण्यासाठी किंवा अगदी अपयश आल्यावर कसा भरभक्कम आधार दिला वडिलांनी. की असंही झालंय, बाबा नाही समजून घेत आपल्याला म्हणून त्यांचीच वा स्वत:चीच समजूत घातलीत.

आणि बाबा, तुमचा काय अनुभव आहे. पुरुष आणि वडील यांच्यात संघर्ष होतो कधी? तुमच्यातलं माणूसपण वडिलांवर मात करतं कधी? तुमचा अहंकार, अपयश मुलांच्या यशापयशावर वरताण ठरतो? कधी तडजोड करावी लागली, इच्छा मोडाव्या लागल्या, स्वत:ची स्वप्ने बाजूला ठेवावी लागली असतील कसं तयार केलं स्वत:ला आणि इतकं करूनही अनेकदा नात्यात ताण येतो, मुलं आपल्याला समजून घेत नाहीत किंवा आपल्याला त्यांना समजून घेता येत नाही, असं वाटतं का? नात्याची कसोटी लागली आहे का? सांगा तुमचे अनुभव. कसं असतं बाप होणं आणि ते निभावणं?

लोकसत्ता, चतुरंगकडे पत्र, ई-मेल पाठवताना – तुमच्या अनुभवांवरच -घटना, प्रसंगांवरच भर द्या.  शब्द मर्यादा ३००. सोबत मुलांसह फोटो असेल तर उत्तम.

पत्रावर आणि ई-मेल सब्जेक्टमध्ये – ‘चतुरंग फादर्स डे’साठी आवर्जून लिहा. आम्हाला तुमची पत्रे २ जूनपर्यंत मिळणे आवश्यक आहे.

आमचा ई-मेल व पत्ता असा – प्लॉट नं.

ईएल – १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई-४०० ७१०

chaturangnew@gmail.com,

chaturang@expressindia.com