27 June 2019

News Flash

गच्चीवरची बाग : कुंडीचे पुनर्भरण करताना..

कुंडीतील भरण-पोषण हे खाली खाली बसत जाते, त्यामुळे त्याचे पुनर्भरण ठरावीक दिवसांनी करणे गरजचे असते.

कुंडी पुनर्भरण करताना

कुंडीतील भरण-पोषण हे खाली खाली बसत जाते, त्यामुळे त्याचे पुनर्भरण ठरावीक दिवसांनी करणे गरजचे असते. कुंडी, बादली, ड्रम याचे पुनर्भरण करताना कुंडी भरण्याचीच भरण-पोषण पद्धत वापरावी.

पूर्वीचे कुंडीतील रोप किंवा छोटे झाड हे अलगद आजूबाजूची माती काढून काढावे, जास्तीची मुळे धारधार व स्वच्छ कैचीने कापून टाकावीत. पूर्वीची कुंडी रिकामी करण्यासाठी कुंडीचे २-३ दिवस पाणी तोडावे. प्लॅस्टिक कुंडी असल्यास त्यास चारही बाजूंची चेप द्यावा किंवा हाताने थोपटावी. मातीची कुंडी असल्यास हलकेचे हाताचे धक्के द्यावे. या कुंडय़ांना उपडे केले की मुळांचा बुंधा बाहेर येतो. त्यास ३० ते ६० टक्केपर्यंत मुळाभोवतालची माती, मुळे, बुंधा काढून टाकता येतो. रोप पाहून तो निर्णय घेणे गरजेचे ठरते. पुनर्भरण करताना कुंडी भरण्याचेच साहित्य घ्यावे, मात्र त्याचे प्रमाण हे प्रत्येकी १० ते १५ टक्केच असावे. म्हणजे कुंडी अध्र्यापेक्षा अधिक भरलेली नसावी. कारण पूर्वीच्या रोपांचा बुंधा, त्याभोवतालची माती या कुंडीत बऱ्याच प्रमाणात भर घालते. या पद्धतीने कुंडीचे पुनर्भरण करताना मातीचे प्रमाण अध्रेअधिकच लागते. त्यामुळे पूर्वीच्या एका कुंडीच्या मातीत दोन ते तीन कुंडय़ा नव्याने भरल्या जातात. याही प्रकारात कुंडीतील भरण-पोषण हे खाली खाली बसत जाते. त्यातही आपण दर आठवडय़ास याप्रमाणे त्यात वरखत लेंडी खत, एंजाईम, माती, वाळलेले शेणखत, घरचे कंपोिस्टग खत, सुका पालापाचोळा व शेंडय़ांचे अच्छादन हळूहळू देत जावे म्हणजे कुंडी, वाफा भरत जातो.
संदीप चव्हाण – sandeepkchavan79@gmail.com

First Published on October 31, 2015 12:18 am

Web Title: terrace garden 11
टॅग Terrace Garden