शिल्पकार राम सुतार यांच्याशी वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याच्या निर्मितीप्रक्रियेसंबंधात केलेली बातचीत..

फरक असतो हे त्यांना  समजावून सांगावे लागले. चेहरा, डोळे, हात, नखे, धोतर अशा प्रत्येक गोष्टीला टेक्श्चर दिले. आम्ही पाचशे फुटांवरून तो पुतळा पाहायचो, मग तो कसा होतो आहे याची योग्यायोग्यता तपासायचो.

पटेलांच्या पुतळ्यासाठी तुम्ही कोणता अभ्यास केला?

पटेलांची अनेक छायाचित्रे पाहिली. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्ट दिसतील अशा छायाचित्रांचा अभ्यास केला. त्यांचे व्यक्तिमत्त्व नेमके कसे होते, हे त्यातून उलगडले. पटेल हे करारी, धाडसी होते. महात्मा फुलेंच्या आणि पटेलांच्या व्यक्तिमत्त्वात सारखेपणा आहे. पटेलांच्या व्यक्तिमत्त्वात जोश आहे. त्यांची चाल आणि अन्य लकबींचा छायाचित्रांच्या आधारे बारकाईने अभ्यास केला. शिल्पकार म्हणून माझी विशिष्ट स्टाईल आहे, ती पुतळ्यात दिसते. पटेलांच्या चेहऱ्याचे वैशिष्टय़ काय आहे, हे पाहून तो कसा रुबाबदार दिसेल याचा विचार केला आणि मगच पुतळा बनवला. साडेतीन वर्षे काम चालले.

पुतळानिर्मितीच्या दरम्यान मोदींशी तुमची कधी भेट झाली का?

नाही. पुतळ्याच्या अनावरण समारंभातच त्यांची भेट झाली. पण ते या कामावर लक्ष ठेवून होते. २०१६ मध्ये मला ‘पद्मभूषण’ पुरस्कार मिळाला. पुरस्कार प्रदान सोहळ्यात मोदींनी काम कसे सुरू आहे याबद्दलची विचारणा केली होती.

पटेलांचा पुतळा चीनमध्ये बनवण्यात आला. पण यापुढे बनवले जाणारे पुतळे भारतातच व्हावेत असे नाही का वाटत?

हो. छत्रपती शिवाजीमहाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे भारतात बनवले जावेत असे माझे मत आहे. आपण ‘मेक इन इंडिया’बद्दल बोलतो, मग पुतळे ‘मेड इन इंडिया’ का असू नयेत? पुतळे भारतात बनवले गेले तर लोकांना रोजगारही मिळेल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रामाची भव्य मूर्ती उभी करायची आहे. ही मूर्ती भारतातच बनवली जावी असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. इतरही पुतळे स्वदेशातच तयार केले जावेत.

मुलाखत : महेश सरलष्कर