सुरेश चांदवणकर

१९३४ साली गांधीजींनी लिहिलेल्या एका पत्राला पुढे कवितारूप कसे मिळाले, याचा वेध घेणारे टिपण..

fir against power company team over extortion money
मीटरमध्ये गडबडीच्या नावावर विद्युत महामंडळाचा अभियंताच मागत होता लाच….अखेर पाठलाग करून….
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
chandigarh doctor grandfather sbi share 500 rupees in 1994 know profit
याला म्हणतात खरी गुंतवणूक! आजोबांनी ३० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या ५०० रुपयांच्या शेअरवर नातू झाला लखपती
Do you know the beginnings of Gmail
जीमेलची सुरुवात आणि एप्रिल फूल कनेक्शन तुम्हाला माहित्येय का?

अलीकडेच मुंबईच्या चोरबाजारात ‘आदित्य बिर्ला समूहा’नं २००५ साली खासगी वितरणासाठी बनवलेला डीव्हीडी संच नगण्य किमतीला विकत मिळाला. त्यातल्या एका डीव्हीडीवर ‘गांधीजींनी लिहिलेली एकमेव कविता’ असा उल्लेख असलेला ‘नम्रता के सागर’ या गीताचा व्हिडीओ पाहायला मिळाला. या व्हिडीओचं संगीत इलायराजा यांचं आहे. तो अधूनमधून टीव्हीवरही पाहायला मिळतो. अनेक दिग्गज गायक व गायिकांच्या आवाजात ही कविता घोळवून गायलेली ऐकायला मिळते. ‘शाश्वत गांधी’ असं नाव असलेला हा अल्बम पाहताना त्याच सुमारास आलेल्या ‘खॅट’ म्हणजे ‘जन गण मन’ या रहमान साहेबांच्या व्हिडीओ अल्बमची आठवण होते.

तीसेक वर्षांपूर्वी याच चोरबाजारात सफेद लेबलची ७८ गतीची एक ग्रामोफोन रेकॉर्ड मिळाली होती. तिची आठवण झाली. हीच कविता ‘हे नम्रता के सम्राट’ या शीर्षकात मन्ना डे यांच्या आवाजात व वसंत देसाई यांच्या संगीतात मुद्रित झाली होती. लेबलवर ‘गीतकार – गांधीजी’ असं छापलेलंही आहे. १९६९ साली गांधीजींच्या जन्मशताब्दी निमित्ताने महाराष्ट्र शासनाने खासगी वितरणासाठी या ध्वनिमुद्रिका खास बनवून घेतल्या होत्या व काळाच्या ओघात काही प्रती चोरबाजारात संग्राहकांची वाट पाहत पडून होत्या. त्यावेळचे मंत्री मधुकरराव चौधरी यांनी ‘गांधीजींचं पत्र’ म्हणून समोर ठेवलेल्या मजकुराला चाल लावण्याचं मोठंच अवघड काम वसंतराव देसाई यांनी केलं होतं. वल्लभभाई पटेलांच्या कन्येनं, छोटय़ा मणिबेननं बापूंना ‘ईश्वराचं स्वरूप कसं आहे?’ असं पोस्टकार्ड लिहून विचारलं होतं. त्याचं उत्तर म्हणजे ही कविता अशी कहाणीही प्रचारात होती.

ही दोन्ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकत असताना मनात अनेक प्रश्न मात्र पडत होते. ही एकच कविता लिहून बापू कसे थांबले? तिला चाल लावून गाण्याचे प्रयत्न त्यांच्या हयातीत का बरे झाले नाहीत? ही इतकी छान रचना आश्रमात व प्रार्थना सभांमध्येही कधीच कुणी का गायली नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं २०१२ साली मिळणार होती.

झाले असे की, २०१२ मधील गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही दोघं अहमदाबादच्या साबरमती आश्रमात फिरत होतो. पावसाची जोरदार सर आली व इतरांबरोबर आम्हीही धावत ‘बापू-कुटीर’च्या प्रशस्त आवारात पोहोचलो. बरीच गर्दी होती. भल्या मोठय़ा व्हरांडय़ाच्या एका टोकाला असलेल्या खोलीत बापूंच्या वापरातल्या चरखा, गादी, लेखनसामग्री अशा वस्तू कडीकुलपात ठेवलेल्या होत्या. इतरांप्रमाणे जाळीच्या दारातनं त्यांचं दर्शन घेत असताना बायकोची हाक आली- ‘‘तुम्ही लोकांना ऐकवता ना, ते गाणं इथं लिहिलंय बघा,’’ म्हणाली. व्हरांडय़ाच्या मध्यावर बापूंच्या फोटोखाली संगमरवरात ‘हे नम्रता के सागर..’ गीताचे शब्द कोरलेले होते. िहदी, इंग्रजी व गुजराथीमध्ये. प्रत्येकाच्या खाली ‘मो. क. गांधी’ असं लिहिलेलं. आसपास आश्रमाचे कर्मचारी होते. त्यांना विचारलं. हे गीत इथं कधीच गायलं जात नाही असं समजलं. कुणी गायलंय का, याचीही त्यांना कल्पना नव्हती. खिशातनं मोबाइल काढला व त्यात साठवून ठेवलेलं मन्नादांचं गाणं सुरू केलं. एकदा, दोनदा, तीन वेळा. सगळेच मंत्रमुग्ध.

कार्यालयापर्यंत बातमी पोहोचली. दोन कर्मचारी बोलवायला आले. ‘‘आज तुम्ही आमचे खास पाहुणे. बापूंच्या खोलीत तुम्हाला न्यायला सांगितलंय,’’ म्हणाले. बरोबर चाव्यांचा जुडगा होताच. हे मात्र अनपेक्षित होतं. गांधीजींच्या खोलीत काही काळ शांत बसून राहिलो. भारावलेल्या अवस्थेतच व्यवस्थापक अमृत मोदी यांच्या खोलीत आलो. त्यांनाही गाणं ऐकवलं. मनातल्या शंका त्यांनाही बोलून दाखवल्या.

दरम्यान, गांधीविचारांवर अभ्यास करणारी एक विदेशी तरुणी येऊन बसली होती. माझं बोलणं ऐकून तिनं शिपायाकरवी ग्रंथालयातनं ‘दि कलेक्टेड वर्क्‍स ऑफ महात्मा गांधी’चा खंड – ५८ मागवला. सूची पाहून पान ४३५ माझ्यापुढे ठेवलं. ‘अ ढफअएफ’ असं शीर्षक असलेलं दोन परिच्छेदांचं सप्टेंबर, १९३४ चं पत्र होतं. त्या पानाची तळटीप वाचली. हैदराबाद येथे एक इंग्रज महिला सर्वधर्मीयांसाठी कल्याणकारी संस्था चालवीत होती. तिनं बापूंना काही संदेश देण्याची विनंती केली होती. बापूंनी पाठवलेली ही इंग्रजी प्रार्थना त्या संस्थेत भिंतीवर लावलेली होती. कालांतरानं भंवरी लाल यांनी गुजराथीत, तर उमाशंकर जोशी यांनी िहदीत रूपांतरीत करून मूळ इंग्रजी पत्रातल्या आशयाला कवितेचं रूप दिलंय. श्रेय मात्र स्वत: न घेता बापूंना दिलं. त्यामुळे गांधीजी त्यांच्याही नकळत एका कवितेपुरते कवी झाले! कवितेचं गाणं झालं त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांत. पत्राला ७१ वष्रे झाली त्या वेळी इलायराजानं त्याला पुन्हा स्वरसाज दिला व भीमसेन जोशी, अजय चक्रवर्ती यांनी ते व्हिडीओसाठी गायलं. बापूंचं १५० वं जन्मसाल सुरू झालं आहे. कुणी सांगावं,  ईश्वराचं स्वरूप वर्णन करणारी ही कविता आणखी एखादं रूप घेऊन येईल व गांधीजी पुन्हा एकवार गीतकार बनतील!

 

हे नम्रता के सम्राट,

दीन भंगी की हीन कुटिया

के निवासी,

गंगा, यमुना और गोदावरी के जलोंसे सिंचित इस सुंदर देश में

तुझे सब जगह खोजने में हमें मदद दें

हमें ग्रहणशीलता और खुला दिल दें, तेरी अपनी नम्रता दें

भारत की जनता से एकरूप होनेकी शक्ती और उत्कंठा दें

हे भगवन,

तू तभी मदद के लिए आता है जब मनुष्य शून्य बनकर तेरी शरण लेता है

हमें वरदान दें कि सेवक और मित्र

के नाते इस जनता की हम सेवा

करना चाहते है

उससे कभी अलग ना पड जाए,

हमें त्याग, भक्ती और नम्रता की

मूर्ती बना

ताकि इस देश को हम ज्यादा समझे और ज्यादा चाहें,

हमे वरदान दे हे भगवन

संदर्भ

http://www.timesquotidian.com/

2012/10/28/lyricist-gandhiji-revisited/

Z86LscyJhNY iPZDg5f6jqo

chandvankar.suresh@gmail.com