मॅरिऑन चेस्ने ही ऐंशीच्या दशकात लिहिती झालेली स्काटिश लेखिका प्रामुख्याने ओळखली जाते ती तिच्या गूढ आणि रहस्यांनी काठोकाठ भरलेल्या कादंबऱ्यांसाठी. ‘अ‍ॅगाथा रेझीन’ ही काल्पनिक हेर व ‘हॅमिश मॅक्बेथ’ हा हुशार पोलीस अधिकारी, या व्यक्तिरेखांना घेऊन ‘एम. सी. बीटन’ या टोपणनावाने चेस्नेने दोन स्वतंत्र कादंबरी मालिका लिहिल्या आहेत. त्यातील ‘हॅमिश मॅक्बेथ’ मालिकेतील पहिली कादंबरी १९८५ साली प्रकाशित झाली. ती कादंबरी होती- ‘डेथ ऑफ अ गॉसिप’! तिथपासून मॅक्बेथ मालिकेतील कादंबऱ्यांनी अमेरिकी वाचकांवर भूरळच घातली. या कादंबरीचा मराठी अनुवाद नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

या कादंबरीचे कथानक घडते ते स्कॉटलंडमधील लॉचडभ या गावी. तिथे जॉन कार्टराइट हा लोकांना मासेमारीचे प्रशिक्षण देत असतो आणि त्याच्या वर्गाला स्कॉटलंडच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. एका खासगी तलाव्याच्या काठी त्याचे छोटेसे हॉटेलही असते. त्याच्या वर्गात उदयोन्मुख राजकारणी-व्यापारी मार्विन रॉथ आपल्या पत्नीसमवेत आलेला असतो. लेडी जेन विंटर्स ही पत्रकार महिला, बॅरिस्टर जेरेमी ब्लिथ, त्याची साहाय्यक एलिस विल्सन, १२ वर्षांचा चार्ली बॅक्स्टर, निवृत्त मेजर पीटर फ्रेम, ऑक्स्फर्डचा डॅफने गोर ही मंडळीही आलेली असतात. शोध-पत्रकारिता करणारी लेडी जेन ही विधवा असून तिला सतत लोकांच्या खासगी बाबींत नाक खुपसण्याची सवय असते. त्याचा प्रत्यय तिथे आलेल्या प्रत्येकाला येतोच. त्यातून अनेकांशी तिचे वाद होतात. त्यामुळे सगळेच तिच्यावर वैतागलेले असतात.

star pravah man dhaga dhaga jodte nava jogwa fame smita tambe entry
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत ‘जोगवा’ फेम अभिनेत्री घेणार एन्ट्री, साकारणार ‘ही’ भूमिका, जाणून घ्या…
First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
jun furniture poster
“या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा”; ‘जुनं फर्निचर’ मध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी, पहिलं पोस्टर प्रदर्शित

एका संध्याकाळी मासेमारीचे प्रात्यक्षिक करायला सगळे जण तलावाच्या काठी जातात. तिथून रात्री सगळे परत येतात, पण जेन मात्र परतत नाही. शोध घेतला असता तिचा मृतदेह तळ्याजवळ आढळतो. तिच्या या आकस्मिक जाण्याने प्रशिक्षण वर्गातच नव्हे, तर त्या छोटय़ाशा खेडय़ातही वादळ उठते. तिथला पोलीस अधिकारी हॅमिश मॅक्बेथ तपासाची सूत्रे हाती घेतो आणि लेडी जेनच्या खुनाचे रहस्य मॅक्बेथ हुशारीने शोधून काढतो. त्याची ही शोधमोहीम कशी झाली, हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचण्याशिवाय गत्यंतर नाही!

  • ‘डेथ ऑफ अ गॉसिप’- एम. सी. बीटन,
  • अनुवाद : दीपक कुळकर्णी,
  • मेहता पब्लिशिंग हाऊस,
  • पृष्ठे- १३२, मूल्य – १७० रुपये.