एरिक्सन, स्काइप आणि स्पॉटीफाय यांचे माहेरघर असलेल्या तंत्रप्रगत स्वीडनने २०३० पासून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू करण्याचे ठरवले आहे. सन २०३० साली स्वीडन जगातील पहिला Cashless देश ठरेल. रिक्सबँक या तेथील मध्यवर्ती बँकेच्या सर्वेक्षणानुसार, स्वीडनमध्ये सध्या नोटा आणि नाणी यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेमधील वापर अवघा दोन टक्के एवढाच आहे. अमेरिकेमध्ये हेच प्रमाण जवळपास आठ टक्के आहे. तर संपूर्ण जगभरातील किमान ७५ टक्के अर्थव्यवस्था कागदी नोटांच्या व्यवहारावरच चालते.
स्वीडनमध्ये दैनंदिन व्यवहारात इलेक्ट्रॉनिक चलनाचा वापर गेले काही वर्षे झपाटय़ाने वाढतो आहे. दैनंदिन बस व लोकलचे प्रवासभाडे, रस्त्याकडेच्या पेपरवाल्याचे पैसे तसेच बेरोजगार भत्ताही डिजिटल माध्यमाद्वारेच अदा केला जातो. बसप्रवाशांची तिकिटासाठी द्याव्या लागणाऱ्या सुटय़ा नाण्यांच्या अभावामुळे होणाऱ्या भांडणातून कायमची सुटका व्हावी म्हणून काही वर्षांपूर्वी स्वीडनमधील बसचालकांनी इलेक्ट्रॉनिक कार्डने प्रवासभाडे स्वीकारायला सुरुवात केली. अर्थात ही पद्धत जगातील बहुतांश प्रगत देशांतील शहरांतून अस्तित्वात असली तरी जवळपास ८०% लोक जिथे डिजिटल चलनात व्यवहार करतात असा स्वीडन हा एकमेवच देश असावा.
अशा तऱ्हेने स्वीडनमध्ये रोख चलनाचा दैनंदिन व्यवहारातील वापर कमी झाल्यापासून चोर आणि भुरटय़ांचे प्रमाणही उणावले आहे. गेल्या तीस वर्षांत चोरी आणि लुटालुटीचे प्रमाणही कमी झाले आहे. तथापि, एकीकडे हे चित्र असताना गेल्या दहा वर्षांत इलेक्ट्रॉनिक फ्रॉड्सचे प्रमाण मात्र दुपटीने वाढले आहे. सुमारे ९५ लाख लोकसंख्येच्या या देशात इलेक्ट्रॉनिक फ्रॉड्सच्या प्रकरणांची संख्या एक लाख चाळीस हजार इतकी प्रचंड नोंदवली गेली आहे. खरं तर स्वीडनमधील लोक इतर देशांच्या तुलनेने विश्वासू मानले जातात. येथील सरकार लोकहिताचे अनेक प्रकल्प राबवीत असते. देशाच्या सर्वागीण विकासावर भर दिला गेला आहे. अर्थात इलेक्ट्रॉनिक फ्रॉड करणारे लोक स्वीडनवासीच असतात असे नाही. आज इंटरनेटच्या जगड्व्याळ मायाजालात अगणित लोक सामील झाले आहेत. त्यांत जागतिक दहशतवादी संघटनाही आहेत. त्यामुळे स्वीडिश सरकारच्या या Cashless economy च्या धोरणाविषयी अनेकांचा तीव्र आक्षेपही आहेच.
अर्थशास्त्रानुसार, पैशाचे सात महत्त्वाचे गुणधर्म सांगितले जातात. टिकाऊपणा (Durability), सर्ववाहकता (portability), विभक्तीकरण (Divisibility), एकसारखेपणा (Uniformity), मर्यादित पुरवठा (Limited Supply) आणि सर्वमान्यता (Acceptibility). मानवी संस्कृतीने वस्तु-विनिमयापासून ते चलन-विनिमयापर्यंत आणि आता ई-करन्सीपर्यंत प्रगत प्रवास केलेला आहे. मध्यंतरीच्या बिटकॉइनच्या अल्पशा मर्यादित प्रगतीने लोकांना चलन म्हणजे नक्की काय, असा प्रश्न पडू लागला आहे. उदाहरणार्थ, इंग्लंडमध्ये ब्रिस्टल या शहरात ब्रिस्टल पाऊंडचा (Bristol Pound) वापर केला जातो. येथील बसचे भाडे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा कर ब्रिस्टल पाऊंड या चलनाद्वारे दिला जातो.

(पान १ वरून) स्थानिक दुकानांमध्येसुद्धा या चलनाचा वापर वाढत आहे. शहरातील व्यापार-उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, हा यामागचा हेतू. लोकांनी स्थानिक वस्तूंचा वापर करावा आणि गरज नसेल तर दूरवरून येणाऱ्या वस्तू शक्यतो घ्यायच्या टाळाव्यात; जेणेकरून प्रदूषणही आटोक्यात येईल असा व्यापक विचार त्यामागे आहे. पण अर्थातच ब्रिस्टल पाऊंडचा वापर फारच मर्यादित आहे. त्यामुळे चलनच्या सर्वव्यापी गुणधर्मानुसार ब्रिस्टल पाऊंडला लोकमान्यता नाही.
त्याचप्रमाणे स्वीडनचा हा Cashless economy चा प्रयोग कितपत यशस्वी होईल याबाबत अद्यापि संदेह आहे. उदाहरणार्थ, स्वीडनमध्ये बाहेरून आलेल्या पर्यटकांनी आणि कामाधंद्यानिमित्त आलेल्या लोकांनी कसा
व्यवहार करायचा? सरकारने अनेक गावांतून कॅश मशीन्स काढून घेतल्या आहेत. आणीबाणीच्या प्रसंगी लोकांजवळ जर पैसे नसतील तर
त्यांची मोठीच अडचण होईल यात शंका
नाही. अलीकडेच येथील एका संगीत महोत्सवात काही लोकांना इच्छा असूनही सहभागी होता आले नाही, याचं कारण तेथील इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बंद पडल्याने त्यांना कार्यक्रमाची तिकिटे देता आली नाहीत. आणि ‘आज रोखीने तिकिटे मिळणार नाहीत!’ असा बोर्ड आयोजकांनी लावलेला असल्याने पैसे असूनही रसिकांची निराशा
झाली होती.
ई-कॉमर्समुळे लोकांची खरेदीची फारच सोय झाली आहे. घरबसल्या वा जिथे असतील तिथून मोबाइलद्वारे लोक इंटरनेटवरून कशाचीही खरेदी करू शकतात. परिणामी प्लॅस्टिक मनी जाऊन ई-मनीचा वापर वाढतो आहे. स्वीडनच्या सेंट्रल बँकेने नोटा छापण्याचे प्रमाणही कमी केले आहे. आजवर तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वीडन नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे.
१६६१ मध्ये युरोपमध्ये बँक-नोट सुरू करण्याचा पायंडा घालणाऱ्या या देशाची Cashless economy कडे झालेली ही कूच स्वाभाविक असली, तरीही हा प्रवास तितकासा सुकर असणार नाही हेही तितकेच खरे. तंत्रज्ञानाच्या मर्यादा आणि सुरक्षिततेचे आव्हान यामुळे काही व्यवहार प्रचलित नोटांच्या चलनात होतील यात शंका नाही. ‘अबा’ (ABBA) या जगप्रसिद्ध स्वीडिश पॉप गायकाने म्हटल्याप्रमाणे भविष्यात ”money, money, money” हा एक मजेशीर भूलभुलैयाच राहणार आहे!
प्रशांत सावंत- wizprashant@gmail.com

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह

mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!

indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन