या आठवडय़ात होळी आणि धूलिवंदन हे सण येत आहेत. त्यानिमित्ताने गाजलेल्या गीतांवर आधारित विडंबनगीते आम्ही मागविली होती. त्यास उदंड प्रतिसाद मिळाला. विडंबनगीतांचा अक्षरश: पाऊस पडला. त्यातील निवडक विडंबनगीते येथे सादर करीत आहोत..

(मूळ गीत : ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’)

lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
lokrang article, book review, Noaakhali manuskicha avirat ladha, novel, mahatma gandhi, last days, Ramesh Oza And Shyam Pakhare,
माणुसकीच्या अविरत लढ्याची गोष्ट
Review of Rohini Nilekanis book Shambharital Shahanapan on durgabai Nilekani
शंभरीतलं शहाणपण!

नमो तुझे..

नमो तुझे किती, फसवे ते शब्द
होतो आम्ही स्तब्ध, ऐकोनिया॥ १॥
जुन्या योजनांना, नवी नावे देशी
भुलवूनी जाशी, साऱ्यांना या॥ २॥
तुझे ते बेताल, गणंग नि साधू
जटाधारी भोंदू, वाचावीर॥ ३॥
विचारी विरोध, ऐकून न घेती
फटके ते देती, विद्वानांना॥ ४॥
तुझ्या त्या पक्षाचा, सनातनी नारा
इतरां न थारा, देशामध्ये॥ ५॥
चांगल्या दिसांची, पाहतोय वाट
नको फाटाफूट,जनांमदी॥ ६॥
हात जोडोनिया विनवतो सारे
वाहू दे रे वारे, ऐक्याचे ते॥ ७॥

– पी. एस. कौलापुरे, शिरोडा, ता. वेंगुर्ला.

(मूळ काव्य- विंचू चावला हो विंचू चावला हो..)

घात की हो झाला…

घात की हो झाला.. काय आम्ही करू..
प्रथा मोडली.. काय आम्ही करू..
शनिदेव कोपणार.. काय आम्ही करू..
अधर्म घडला.. अधर्म घडला.. अधर्म घडला हो..
महाराज महाराज असे झाले तरी काय?
आगाऊपणा केला त्या महिलेने..
चौथऱ्यावर प्रवेश केला बेछुटपणे..
अपवित्र केला चौथरा.. त्या.. महिलेने..
घात की हो झाला.. काय आम्ही करू..
प्रथा मोडली.. काय आम्ही करू..
शनिदेव कोपणार..काय आम्ही करू..
अधर्म घडला.. अधर्म घडला.. अधर्म घडला हो..
त्या पापाला उतारा..
पवित्र करा तो चौथरा..
त्यासाठी मात्र.. त्यासाठी मात्र..
त्यासाठी काय महाराज?
गोरसच.. बरा..
महाराज.. म्हणजे पुन्हा स्त्रीलिंगी प्राण्याच्याच दुधाने?
(खेकसून) प्राणी नव्हे.. गोमाता.. साक्षात् गोमाता..
तर..गोरसाने पवित्र करा.. तो..चौथरा..
घात की हो झाला.. काय आम्ही करू..
प्रथा मोडली.. काय आम्ही करू..
शनिदेव कोपणार..काय आम्ही करू..
अधर्म घडला.. अधर्म घडला.. अधर्म घडला हो..
महिलांना प्रवेश नाकारून..
कर्मठ रूढी परंपरा पाळून..
जपावे आपुले दुकान.. संस्थान..
वर्षांनुवर्षे..
घात की हो झाला.. काय आम्ही करू..
प्रथा मोडली.. काय आम्ही करू..
शनिदेव कोपणार.. काय आम्ही करू..
अधर्म घडला.. अधर्म घडला.. अधर्म घडला हो..
– अलकनंदा पाध्ये

(मूळ गीत- ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली..’)

कशी जेटलीने थट्टा आज मांडली..

poe02माझ्या पी. एफ. ची वाट पार लावली,
कशी जेटलीने थट्टा आज मांडली!

गंगेवानी निर्मळ होते कर्मचारी राव
सुखी समाधानी होते, चोर आणि साव!
त्यांनी पी. एफ. ची पुंजी जोडली
कशी जेटलीने थट्टा आज मांडली!
अशा एका गावी होता एक कर्मवंत
कुणी म्हणे कंजूष त्याला, नसे त्याला खंत
त्याच्या निवृत्ती फंडाला दृष्ट लागली
कशी जेटलीने थट्टा आज मांडली!

जन्मभरी झटुनी केली माया थोडी गोळा
कष्टाच्या धनावरती, सरकारचा का डोळा?
आज हुंदक्याने पगार पत्रिका पाहिली
कशी जेटलीने थट्टा आज मांडली!
– अविनाश चिंचवडकर, बंगलोर

(मूळ गीत- कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे)

मतदाराच्या खांद्यावर..
poe08मतदान आम्ही केले त्यांना सर्व विसरून
आले तेही निवडून सारे मोजून मापून
स्थापन केले सरकार त्यांनी एक होऊन
तरी कसा संसारात हाहाकार माजे ॥ धृ॥
थकून गेलो आम्ही आता भाषणे ऐकून
माजी मंत्री बसले मूग गिळून
पचविती मालमत्ता रवंथ करून
घोटाळ्याचे पसे आता कोण रोज मोजे? ॥ १॥

गुन्हेगार सुटती सहज जामीन घेऊन
गरीब मात्र सुटून येती सजा भोगून
न्यायदेवता उभी आहे डोळे झाकून
म्हणती आम्हा ‘गप्प बसा.. अहो आम्ही राजे!’॥ २॥

विदेशाचे दौरे यांचे आमच्या पशानं
रोज एक पॅकेज येते पावला-पावलानं
मायबाप सरकार मारे आम्हा गोड बोलून
तरी कसे लटकती आमचे बळीराजे? ॥३॥
ललना झाली भयभीत, स्वैर झाली पोरे
ऐकेनात आप्तांचेही सल झाले दोरे
दिसेना समाजात कोणीही कोरे
इतका कसा झपाटय़ाने स्वैराचार माजे ॥ ४॥

अंत झाला संतापाचा जनता ही भोळी
केली की रे कित्येकांनी आयुष्याची होळी
केला कोणी आवाज मोठा तोच ठरतो बळी
श्रद्धांजली वाहण्यासाठी सूर यांचाच गर्जे ॥ धृ॥
– राजेंद्र भोसले

(मूळ गीत- देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा)

देवळाची तिजोरी..

देवळाची तिजोरी, बडव्यांनाच मेवा..
उघडा डोळे देवा आता, उघडा डोळे आता..॥ धृ॥
दिवसा करिती पूजा-अर्चा, रात्री भ्रष्टाचार
भक्तांनाच लुटूनी भरती, झोळी ते अमाप
सोने-चांदी देवावरची, सहजी करिती साफ
अशा बडव्यांना देवा, करू नको तू माफ॥ १॥
देवळाची तिजोरी..॥ धृ॥
देव नाही देव्हाऱ्यात, वदूनी गेले संत
तासन् तास रांगा लावण्यात, तरीही भक्त दंग
गोरगरिबांची सेवा हाच खरा धर्म
सदाचरण ठेवुनी वागा, हेच खरे सत्कर्म॥ २॥
देवळाची तिजोरी..॥ धृ॥
नवस करूनी देवा तुजला, भक्त देती लाच
दागदागिने अर्पुनी, करिती फुका थाट
सणावारी दाविती तुजला, पक्वान्नांचे ताट
गरीब देश भारत अपुला, चालतोचि वाट॥ ३॥
देवळाची तिजोरी..॥ धृ॥
भक्तांनीच केला बाजार, तुझ्या दर्शनाचा
सत्य-असत्याचा नाही, कुणा मनी थारा
विसरूनी माणुसकी, पैशामागे धाव सदा
समज दे तू आता त्यांना समज देई देवा॥ ४॥
देवळाची तिजोरी..॥ धृ॥
– शुभदा कु ळकर्णी कुर्ला, मुंबई</strong>

(मूळ गाणे – ‘हे सुरांनो चंद्र व्हा!’

हे MP नो सुज्ञ व्हा!

poe03संसदेची शान अपुल्या वर्तनाने वाढवा!
देश अर्धा हा उपाशी
गिळत बसता का तुपाशी?
आत्महत्या कृषिवलांच्या त्वरित तुम्ही थांबवा!
हे टढनो सुज्ञ व्हा!
ध्येय असू द्या ‘देश सेवा’
साधण्या मग ‘लोकसेवा’
गांजलेल्या या प्रजेचे प्रश्न सारे सोडवा!
हेटढनो सुज्ञ व्हा!
भांडता का संसदी या
वेळ किमती जायी वाया!
भोग सत्तेचा घ्या सुखाने, लूट अमुची थांबवा
हे टढनो सुज्ञ व्हा!
– सूर्यकांत लघाटे

(मूळ गीत- कोण होतास तू, काय झालास तू,
अरे वेडय़ा कसा वाया गेलास तू?)

सेन्सेक्स

poe05काय होतास तू, काय झालास तू
अरे गडय़ा, कसा खाली गेलास तू॥ धृ॥
चांगले दिवस
येणार म्हणुनी
बाळसे धरलेस तू
चार बाजूनी
वर वर जात होता
तुझ्या बाणाचा तोरा
सारे खुशीत होते
काळा आणिक गोरा
नव्याची नवलाई
कधीची सरली
अच्छे दिनों की
नशा उतरली
बुडित कर्जाचा
डोंगर वाढला
सरकारी बँकांचा
नफा ना उरला
काळ बदलला
तू ही बदलला
चार वर्षांपूर्वीचा
तळ तू गाठला
गुंुतवणूकदारांना
वाली ना उरला
कफल्लक झाले सारे
पटेल आणि लाला
बोलाची कढी होती
बोलाचा भात होता
स्वप्ने पाहुनी मोठी
वेडय़ा तू नाचत होता
थोडय़ा दिवसांत बरबाद झालास तू
काय होतास तू काय झालास तू?
– प्रवीण पंडित

(मूळ गीत – ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’ )

खूप आम्ही चरणार..

खूप आम्ही चरणार आम्हाला
काय कुणाची भीती
देवघेव अन् पैशापायी
राज्य घेतलं हाती॥ धृ॥
जिंकावं अन् राज्य करावं
हेच आम्हाला ठावं
पद मिळवावं मग मिरवावं
हेच आम्हाला ठावं
चाऱ्यासाठी कुरण ठरावी
अशी मिळावी खाती॥ १॥
देवघेव अन् पैशापायी
राज्य घेतलं हाती..॥
बकासुराने आम्हा शिकविली
कारभाराची रीत
खुर्चीसंगं लगीन लागलं
जडली येडी प्रीत
लोकशाहीची उडवू थट्टा
करू नीतीची माती॥ २॥
देवघेव अन् पैशापायी
राज्य घेतलं हाती..॥
लालबत्तीची ऐटही येते
खुर्ची पाठोपाठ
भाग्याचे हे रांजण अवघे
भरते काठोकाठ
सत्य, अहिंसा गाडून टाकू
सत्ता मिळता हाती॥ ३॥
देवघेव अन् पैशापायी
राज्य घेतलं हाती..॥
शूर आम्ही सरदार आम्हाला
काय कुणाची भीती
देवघेव..॥
शांता लागू, पणजी, गोवा</strong>

(मूळ गीत- ‘सांग सांग भोलानाथ-
पाऊस पडेल का?’)

सांग सांग भोलानाथ

सांग सांग भोलानाथ, स्मार्ट सिटी होईल काय?
स्मार्ट सिटी करताना, घोटाळा होईल काय?
सांग सांग भोलानाथ, स्मार्ट सिटी होईल काय?

भोलानाथ, स्मार्ट सिटीत पाणी आणणार कोठून?
आडातच नाहीच तर पोहऱ्यात येणार कोठून?
भोलानाथ, भोलानाथ..
भोलानाथ, दुर्दशा गावांची आहे आज,
करून स्मार्ट शहर हे, झाकतात आपली लाज
भोलानाथ, भोलानाथ..
भोलानाथ, भोलानाथ खरं सांग एकदा
यातून फक्त राजकारण्यांचा होईल का रे फायदा?
भोलानाथ, भोलानाथ..
भोलानाथ, स्मार्ट सिटीत रस्ते मोठे मोठे,
या देशाच्या प्रगतीचे चित्र खोटे खोटे
भोलानाथ, भोलानाथ..
भोलानाथ, सांग त्यांना, गावे सुधारा
तोच आहे भारताचा खरा चेहरा
भोलानाथ, भोलानाथ..
सांग सांग भोलानाथ, स्मार्ट सिटी होईल काय?
– विनय शिर्के , प्रभादेवी, मुंबई

(मूळ कविता – ‘दातापासून दाताकडे’, कवी- विंदा करंदीकर)

कपापासून कपाकडे

तुझी माझी धाव आहे poe04
कपापासून कपाकडे

धुता धुता कपावरील
एक कपची उडली होती
रंगवलेली फिक्कट बशी
तेव्हाच मला हसली होती

तू म्हणालास :
‘‘मधुमेहाच्या रोग्या तुला
हा चहा झेपेल काय?’’
मी म्हणालो :
‘‘चहाशिवाय राहायचे तर
जगून तरी फायदा काय?’’
तो म्हणाला :
‘‘चहा प्या- नका पिऊ
मरण कधी चुकेल काय?’’
चहावाचून तुझे अडे
चहावाचून माझे अडे
तुझी माझी धाव आहे
कपापासून कपाकडे..

रेल्वे स्टेशनवरचा चहा
पूर्वी होता तसा आहे
पाच रुपयांत कप भरणे
हाच त्यांचा वसा आहे

तू म्हणालास :
‘‘चहा गाळायच्या फडक्याला
पाणी कधी लागेल काय?’’
मी म्हणालो :
‘‘अस्वच्छता रक्तात भिनली
फडके धुऊन भागेल काय?’’
तो म्हणाला :
‘‘पूर्वीपासून कपावरती
वाळलेलीच असते साय’’
पूर्वी झाले तेच घडे
बशीवरचे वाढले तडे
तुझी माझी धाव आहे
कपापासून कपाकडे..

बादलीभर गढूळ पाण्यात
कपबशी पडली आहे
स्वच्छतेची आशा तिने
फार पूर्वीच सोडली आहे

तू म्हणालास :
‘‘गल्ला पाहून मॅनेजरची
खळी थोडी खुलते आहे
मी म्हणालो :
‘‘पिचकी बशी कपाकडे
थोडी थोडी कलते आहे’’
तो म्हणाला :
‘‘काळी सोंडवाली किटली
चुलीपुढे झुलते आहे’’
कपामध्ये काय पडे
माशीचेच प्रेत सडे
तुझी माझी धाव आहे
कपापासून कपाकडे..

तुझा माझा प्रवास आहे
कपापासून कपाकडे..
स्वच्छ कप, गलिच्छ कप
ओशट कप, चिकट कप
काही उंच, काही बुटके
काही उजळ, काही विटके
काही कप कानतुटके
काहींवरती फुलेपाने
नक्षीमध्ये चांदी-सोने
तुझी माझी झेप पडे
कपापासून कपाकडे..

मला एक कळले आहे
अलमीनच्या चरवीत बसून
ताजे दूध पळाले आहे
तुझ्या-माझ्या कपामध्ये
पावडर मिल्क उरले आहे
स्वच्छतेचे लागले राडे
कपावरचे वाढले तडे
त्यात काय नवीन घडे
तुझी माझी धाव आहे
कपापासून कपाकडे..
शरदमणी मराठे

(मूळ गीत- ‘रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेलाही पूर चढे’)

कचराकुंडी भरे सारखी..

कचराकुंडी भरे सारखी
ई-वस्तूंचा पूर चढे
प्लास्टिक पिशव्या चोहीकडे
गं बाई गेला रस्ता कुणीकडे?

उंदीर मेले, सडली भाजी
दरुगधित ही शहरे झाली
चमकुनि बघता वरतुनि पडती
थर्माकोलचे हे तुकडे!

जलाशयाच्या सर्व दिशांनी
निर्माल्याची रास बघोनी
फिरता राधा प्रभात समयी
तारुण्यातही रोग जडे!

वाट लागली इहलोकाची
रडवेली ही सृष्टी झाली
खुणाविते तिज कर फैलावुनि
संकट भीषण इथे खडे!

– रत्नाकर यादव धर्माधिकारी , कल्याण

(मूळ गीत-‘देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा’)

सरकारी तिजोरी.. जनतेचा तो पैका

सरकारी तिजोरी, जनतेचा तो पैका।
साध हाच मोका नेत्या, साध हाच मोका॥ धृ॥
घेते लाच उघडून डोळे जात पुढाऱ्याची।
मनी का असावी त्याच्या भीतीही कुणाची॥
सरावल्या नजरेमधुनी कसा सुटे खोका
साध हाच मोका नेत्या साध हाच मोका॥ १॥

स्वार्थ हाच धर्मच याचा मुखी मात्र गांधी।
कळते ना कोणालाही कसा साधी संधी॥
जिंकतोच थोरांनाही चारूनिया पैका।
साध हाच मोका नेत्या, साध हाच मोका॥ २॥

निवडणूक येता जवळी घुसे घरोघरी।
वाकुनी हा सर्वानाही नमस्कार करी॥
फुकाचीच आश्वासने देई हाच लोका।
साध हाच मोका नेत्या साध हाच मोका॥ ३॥

डोईवर टोपी याच्या, अंगावर खादी।
कार्य याचे एकच चाले तिन्ही काळ खादी॥
जनी सर्व म्हणती ऐसे, माजला हा बोका।
साध हाच मोका नेत्या, साध हाच मोका॥ ४॥

– प्रभाकर फाटक ,रत्नागिरी

(मूळ गीत – केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली’)

केव्हा तरी पहाटे..

केव्हा तरी पहाटे, चावून डास गेला
poe09आणि मलेरियाचा लावून फास गेला..

इन्जेक्शने न् गोळ्या अनेक चाचण्या त्या
अवघा पगार माझा घेऊन डास गेला..

असेल घाण जेथे वास्तव्य माझे तेथे
परिसर स्वच्छ ठेवा, सांगून डास गेला..

शोषुनी रक्त माझे होऊनिया तो तृप्त
मलाच स्वच्छतेचे देऊन डोस गेला
– भाऊ शिगवण
बोरीवली, मुंबई

मूळ : ‘मधु मागशी माझ्या सख्या परी’

वरण मागशी सख्या परि
डाळीची कोठी रिकामी घरी॥ धृ॥

आजवरी पळसाच्या द्रोणी
वरण वाढिले तुला भरोनी
सेवा ही पूर्वीची स्मरोनी
करी रोष न सखया दया करी ॥ १॥

वरणाची ती एकच वाटी
राखून ठेवली बाळासाठी
तुझ्यास्तव मी ठेवली कढी
गोड मान तूं आता तरी॥ २॥
वरण मागशी..॥ धृ॥

घरात चाले सतत कुजबुज
मूग मसुरीचे गूढ मधुर गुज
वरणाचे मर्म काय सांगू तुज
तेच करण्या डाळ ना घरी ॥ ३॥
वरण मागशी..॥ धृ॥

जातील जातील हे दिन सखया
भाववाढीने त्रस्त दुनिया
आता डाळीचे नाव कासत्या?
लागले नेत्र बजेट वरी..॥ ४॥
वरण मागशी..॥ धृ॥
मृणालिनी केळकर, नागपूर</strong>