24 January 2019

News Flash

‘काश्मीर प्रश्न’ ‘शब्द’कडून मागे!

मूळ पुस्तकाची दुसरी आवृत्ती म्हणून ही २०१७ ची आवृत्ती प्रकाशित केली गेली.

डिसेंबर, २०१७ मध्ये ‘शब्द पब्लिकेशन’ने ना. य. डोळे व रश्मी भुरे या लेखकनामांखाली ‘काश्मीर प्रश्न’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले होते. डॉ. ना. य. डोळे यांचे ‘प्रभात प्रकाशना’ने प्रकाशित केलेले ‘काश्मीर प्रश्न’ नावाचे पुस्तक पुन्हा प्रकाशित व्हावे अशी आमची इच्छा होती. मात्र त्याचबरोबर १९९८ नंतर वीस वर्षांत काश्मीर प्रश्नाविषयी घडलेल्या घडामोडींचा परामर्श घेतला जावा, असेही आम्हाला वाटत होते. या हेतूने डॉ. डोळे यांच्या मूळ पुस्तकाची दुसरी आवृत्ती म्हणून ही २०१७ ची आवृत्ती प्रकाशित केली गेली. मात्र असे करताना काही अक्षम्य चुका घडल्या.

८ एप्रिलच्या ‘लोकरंग’मध्ये ‘‘काश्मीर प्रश्न’ आणि वैचारिक अप्रामाणिकपणा’ हे संकल्प गुर्जर यांचे २०१७ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकावरील चिकित्सक परीक्षण प्रकाशित झाले. या परीक्षणात पुस्तकातील अनेक गंभीर त्रुटींबद्दलची चर्चा त्यांनी केली आहे. त्यांच्या विवेचनाच्या प्रकाशात पुस्तकाची पुन्हा तपासणी केल्यानंतर गुर्जर यांच्या आक्षेपांमध्ये तथ्य आहे, याची जाणीव झाली.

या निवेदनाद्वारे आम्ही असे जाहीर करत आहोत की, प्रस्तुत पुस्तक आम्ही बाजारातून मागे घेतो आहोत. पुस्तकाचे वितरण आणि विक्री पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. डॉ. ना. य. डोळे यांनी लिहिलेली मूळ संहिता विवेचक प्रस्तावनेसह आम्ही लवकरच प्रकाशित करत आहोत.

– यशोधन पाटील, शब्द पब्लिकेशन

First Published on April 15, 2018 12:37 am

Web Title: kashmir prashna book by n y dole