लोकमान्य टिळकांच्या भाषणांचे, त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखांचे संग्रह, त्यांच्यावरील चरित्रपर ग्रंथ मराठीसह अन्य भाषांतही गेल्या नऊ दशकांत लिहिले गेले आहेत. त्यातून त्यांच्या राजकीय कार्याचे तपशील विस्ताराने कळतात. परंतु याबरोबरच शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, पत्रकार, लेखक, कायदेपंडित, मुत्सद्दी असे विविध पैलू त्यांच्या जीवनाला आहेत. टिळकांच्या व्यक्तिमत्त्वातील अशा पैलूंची ‘आठवणीरूप लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ या विश्वनाथ गोखले यांच्या पुस्तकातून ओळख होते. टिळकांवरील विविध पुस्तकांतून एकत्र केलेल्या या आठवणी टिळकांचे समग्र व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर साकार करतात. यात टिळकांचे बालपण, शिक्षण, पुढे राजकीय जीवन, मंडालेचा तुरुंगवास आदी अनेक बाबींविषयीची माहिती मिळते. त्यांची विद्वत्ता, सूक्ष्म विवेचकशक्ती, धैर्य, देशभक्ती, लोकसंग्रहेच्छा, व्यवहारचातुर्य आदी गुणवैशिष्टय़ेही या आठवणींतून कळून येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आठवणीरूप लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi book athavaneroop lokmanya bal gangadhar tilak
First published on: 20-11-2016 at 01:57 IST