ना. सी. फडके आणि कमल दीक्षित ही मराठी साहित्य विश्वातील गाजलेली प्रेमकहाणी. या प्रेमकहाणीतील नायक मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार. नायकाच्या व्यक्तिमत्त्वाची प्रभा इतकी की, त्यात नायिकेचे व्यक्तिमत्त्वच झाकोळून गेले. त्यामुळेच आजवर कमला फडके यांच्या जीवनचरित्रावर फारसा प्रकाश पडू शकला नाही. परंतु, त्यांच्या कन्या गीतांजली अविनाश जोशी यांनी ‘कमला’ हे चरित्र लिहून या प्रेमकहाणीतील नायिका असलेल्या कमला फडके यांचे वादळी व्यक्तिमत्त्व शब्दबद्ध केले आहे. कमला या ना. सी. फडके यांच्या दुसऱ्या पत्नी. त्यांच्या पहिल्या पत्नी मनोरमाबाई. फडके, मनोरमाबाई व कमला या त्रिकोणाबद्दल स्वत: या तिघांनी आणि इतरांनीही फारसे लेखन आजपर्यंत केलेले नाही. फडक्यांच्या ‘माझे जीवन : एक कादंबरी’ या आत्मचरित्रातही याविषयी फारच त्रोटक माहिती येते. परंतु गीतांजली जोशी यांनी लिहिलेल्या या ललित चरित्रात हे सारे संदर्भ येतात. याशिवाय कमला फडके यांच्या लेखकीय कारकीर्दीविषयीही माहिती मिळते. एक बुद्धिमान, प्रतिभावंत आणि भावनाशील स्त्रीचे व्यक्तिमत्त्व या साऱ्या ललितबंधातून प्रतीत होत राहते. प्रांजळपणे व तटस्थ वृत्तीने लिहिलेल्या या ललित चरित्रातून कमला व ना. सीं.च्या उत्कट प्रेमाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.
‘कमला’ – गीतांजली अविनाश जोशी,
सुनिधी पब्लिशर्स, पुणे,
पृष्ठे- १३१, मूल्य- १८० रुपये

Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?