वास्तुशास्त्रातील एक जागतिक आश्चर्य मानले जाणाऱ्या ताजमहालची मृत्युघंटा वाजू लागली आहे. यमुना नदीतील प्रदूषण, ताजमहालाची स्वच्छता आणि देखभालीबद्दलची कमालीची अनास्था यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच यासंदर्भात केंद्र सरकारला फटकारले आहे. ताजमहालाच्या या दुरवस्थेचा लेखाजोखा मांडणारा लेख..

‘ताजमहाल नष्ट करायचा आहे का?’ ही बातमी १८ ऑगस्टच्या सर्व वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ही विचारणा करताना ‘ताजची दुरवस्था पाहा..’ या शब्दांत आपली नापसंती व्यक्त केली आहे. न्या. मदन लोकूर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठासमोर ही  सुनावणी झाली. पर्यावरणतज्ज्ञ एम. सी. मेहता यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी सध्या सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला असं का फटकारावं? केंद्राचं नक्की काय चुकलंय?

china sinking
न्यूयॉर्क आणि टोकियोनंतर चीनमधील शहरेही जलमय; जगातील ‘ही’ शहरे पाण्याखाली जाण्याचे कारण काय?
Russian missile attack kills 13 in Ukraine
रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील १३ जण ठार
another sort of freedom 2
काळाबरोबर वाहणं..
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

ताजमहाल हे भारतातलं एक जागतिक आश्चर्य असूनही त्याची अक्षम्य हेळसांड होते आहे. आज ताज अशा अवस्थेला पोहोचलेला आहे, की त्याची दुरुस्ती आणि देखभाल जर केंद्र सरकारने लगेचच  हाती घेतली नाही तर तो यमुना नदीत कधी कोसळेल  हे कळणारही नाही. गेली ३५० वर्षे किंवा कदाचित त्याहूनही शेकडो वर्षे आधीचे हे आश्चर्य (महाल असो वा मंदिर!) समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान आहे. खरं तर सर्वोच्च न्यायालयाने याआधीही दोन वेळा- म्हणजे ऑक्टोबर २०११ मध्ये केंद्र सरकारला सहा आठवडय़ांत संबंधित खात्यांना त्यांचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. ब्रिटिश म्युझियम, ब्रिटिश मीडिया रिपोर्ट, डेली मेल यांचे संशोधक पथक भारतात त्यावेळी आले होते. ताजचे सात मजले, तळमजला, खजिनाकोठी, ढासळलेला  दक्षिण काठ, आग्रा किल्याकडे जाणारा मार्ग ताज- अंतर्गत दालने जोडणारे गुप्त मार्ग त्यांनी पाहिले. त्याचे अहवाल त्यांनी  ब्रिटिश शासनाला दिले. ‘डेली मेल’चे जेम्स टॅपर (James Tapper) यांनी एक लेखमाला लिहून ताजची अंतर्गत आणि बाह्य़ दुरवस्था जगाच्या नजरेला आणली. नाथराम (Natharam), कोह एब्बा (Koha Ebba), वायने बेगली (Wayne Begley) या विद्वानांना त्याच्या संशोधनात काय आढळलं?

ताजची अंतर्गत पाणी वाहून नेणारी व्यवस्था ही स्वच्छ  पाणी आत घेणारी व सांडपाणी बाहेर काढणारी अशा स्वरूपात विभागली गेली आहे. त्यानुसार यमुना नदीत कमी-अधिक उंची व योग्य अंतर राखून पाणी आत-बाहेर करता येई. सांडपाणी बाहेर काढताना ते स्वछ पाण्यात मिसळले जाऊ  नये यासाठी स्वच्छ पाणी वाहणारे नळ तांब्याचे, तर सांडपाण्याच्या नाल्या पक्क्या बांधणीच्या आढळल्या आहेत. या सर्वाची तजवीज मुख्य इमारत व इतर इमारती प्रत्यक्ष बांधायला सुरुवात करण्याअगोदर केली गेली आहे. ताजमधील मातीचे नळ ०.२५ मीटर व्यासाचे व जमिनीखाली १.८ मीटर खोल आढळले आहेत.

ब्रिटिशकाळात ही व्यवस्था नियमितपणे तपासली जात होती. ताजचे सर्व मजले धुतले जात होते. त्यावेळी एखादे खाते स्वतंत्रपणे अस्तित्वात होते. ताजची नियमित स्वच्छता, केरकचरा सफाई जिने-पॅसेजेससह केली जाई. विशेषत: आज ताजअंतर्गत जी शेकडो दालने आहेत (खजिनाकोठीत २४ ), तिथे  हवा व प्रकाशाची सोय नसताना मोगलकाळी तिथे काय ठेवले जात होते, हे कळायला मार्ग नाही. आज ती सर्व दालने व मधले पॅसेजेस कुलूपबंद असल्याने तिथे कुणालाही प्रवेश नाही. ताज बघायचा म्हणजे काय करायचं? तर फक्त चौथ्या मजल्यावरची दर्शनी थडगीच बघायची, तीदेखील फक्त वीस मिनिटे!

ताज आतून स्वतंत्रपणे पर्यटकांना व संशोधकांना दाखवला जात नाही. १९७१ पासून सगळे मजले कुलूपबंद आहेत. १९७२ साली यमुनेला पूर आला. पाणी ताजच्या चौथ्या मजल्याच्या प्लॅटफॉर्मपर्यंत चढले व काही तासांत ते आपोआप ओसरूनही गेले. आग्रा शहर त्यावेळी तीन दिवस तुंबलेल्या पाण्याखाली बुडालं होतं. त्यामुळे झालं काय की, ताज पूर्वकालीन जलयंत्रणेच्या कार्यक्षमतेमुळे शाबूत राहिला आणि आधुनिक व्यवस्थापनाखालचे आग्रा शहर रोगग्रस्त झाले, हे लक्षात आलं. पण पुढच्या ४० वर्षांत ही जलवहनव्यवस्था निकामी झाली. आता तिथून पाण्याचा निचरा न होण्याची जी कारणे आहेत, त्यात मथुरा नदीवरील रिफायनरीमधील विषारी उत्सर्जन यमुना नदीत सोडण्यामुळे होणारे प्रदूषण हे एक आहे. यमुनेच्या काठावरच्या अनधिकृत चर्मोद्योगातील शेकडो छोटे व्यवसायिक मृत जनावरांचे टाकाऊ  अवशेष यमुनेत सोडतात. हे सांडपाणी, घाण कुठलीही प्रक्रिया न करता यमुनेत सोडली जात असल्यामुळे भयंकर प्रदूषण होते. परिणामी गाळ शोषून घेण्याची दक्षिण काठाची धारणाशक्ती संपली आहे. ताजवर याचा विपरीत परिणाम होतो आहे. आता ताज पूर्वीसारखा पांढराशुभ्र दिसत नाही. त्यावर काळसर पिवळी पुटे चढली आहेत.

मुघल इतिहासाचे तज्ज्ञ असलेले आर. नाथ यांनी ताजचा पाया, यमुनेतले वाढते प्रदूषण, अक्षम्य शासकीय हेळसांड या विषयांवर वारंवार जनजागृती केली. इतिहास, पुरातत्त्व, भूगर्भ क्षेत्रातील हिंदुस्थानी व पाश्चात्त्य वास्तुतज्ज्ञांच्या मते, गेल्या ४० वर्षांत असे कुठलेही प्रयत्न, अहवाल आदींचा सखोल अभ्यास शासनाने केलेला नाही. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने आता तिसऱ्यांदा केंद्र सरकारला फटकारले आहे. तेव्हा मनात विचार येतो, की अमेरिका वा पाश्चात्त्य देशांत अशी दिरंगाई खपवून घेतली गेली असती काय?

ब्रिटिश संशोधकांनी ताजच्या मूळ पायाखाली १८ फूट खोलीपर्यंत एबनी व साग वृक्षांची संरक्षक भिंत सभोवार उभारली गेल्याचा उल्लेख केला आहे. ज्या कुणी ती उभारली त्यामुळे यमुनेचे प्रदूषित पाणी ताजच्या बुडाखाली जोपर्यंत पोहोचत नव्हते तोपर्यंत ताज व अंतर्गत जलवहन व्यवस्था व यंत्रणा सुरक्षित राहिली. ब्रिटिशांच्या काळापासून ताजची अंतर्गत झाडलोट, सफाई नियमित होत होती. १९७१ नंतर मात्र ताजची इतर प्रवेशद्वारे, आतली दालने कुलूपबंद झाली आणि पूर्वापार चालत आलेली सफाई यंत्रणा (खाते) बहुधा बंद झाली. सफाई कर्मचारी बहुधा सेवामुक्त झाल्यावर नवीन भरती झाली नाही. मग ताज आतून स्वच्छ कसा राहणार? यमुना प्रदूषणामुळे कोरडी पडत चालल्याने एबनी वृक्षांच्या संरक्षक भिंतीला मजबुतीसाठी हवा असणारा दमट ओलसरपणा नाहीसा झाला. घट्ट चिखलाचा थर चहुबाजूने भिंतीला आवळत गेल्याने लाकूड कमकुवत बनले. अनेक ठिकाणी फळ्या मोडून पडल्या. परिणामी घाण पाणी ताजच्या तळमजल्यापासून वर सरकत डबक्यांच्या स्वरूपात कुठे कुठे साठत गेले. ताजच्या सध्याच्या दुरवस्थेची ही कारणमीमांसा आहे.

ओएनजीसी, मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्याकडे गाळ काढणारी व खडक फोडणारी यंत्रणा आहे. केंद्र सरकारने त्यांची मदत घेऊन यमुनेचा तळ, ताजची मागची बाजू आणि सातव्या मजल्याच्या तळाची त्वरित युद्धपातळीवर दुरुस्ती करणे गरजेचं आहे.

अरुण निगुडकर

arun.nigudkar@gmail.com