एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शब्द साधा असो वा कठीण, पण छोटय़ा कानामात्रेने शब्दाचा उच्चार बदलतो आणि एकदा का तो ओठी रुळला की बदलणं जवळपास अशक्य होतं. बरं हे बदललेलं रूप इतकं वेगळं असतं की मूळ शब्द घराचा मालक असून तो बाजूला पडून राहतो आणि मालकावर कुरघोडी करणाऱ्या भाडेकरूप्रमाणे चुकीचा उच्चार बिनधास्त संचार करतो.
एनव्हलोप हा शब्द फारच वेगळा, अपरिचित कॅटेगरीतला नाही. फरक इतकाच की काही जण इनव्हलप म्हणतात, काही जण

एनव्हलप म्हणतात. पण मूळ उच्चार आहे एनव्हलोप. अर्थात लिफाफा! एनव्हलोप हा मूळचा फ्रेंच शब्द. तिथून तो इंग्रजीत आला आणि मराठीतही व्यवस्थित रुळला. मराठीतला लिफाफासुद्धा उर्दूकडून उसनवार घेतलेला असल्याने दोन्ही शब्दांचं मराठीतलं स्थान तसं परकीयच. लिफाफा शब्दाचा वापर एनव्हलोपपेक्षा सध्या तरी फारसा प्रचलित नाही. काही वेळा चपखल मराठी शब्द वापरल्यावर ज्या प्रतिक्रिया मिळतात त्या पाहता लिफाफा माहीत असूनही एनव्हलोप म्हणणारे अधिक. मध्यंतरी चित्रपटाची कथा सांगताना मी ‘खलनायकाचे हस्तक’ असा शब्द वापरल्यावर, हा काय प्रकार आहे बुवा या अर्थाने आ वासलेली तोंडं आठवतात. लिफाफ्यात घालून ती चिठ्ठी दे, असं म्हटल्यास यापेक्षा नव्या पिढीच्या प्रतिक्रिया वेगळ्या नसतील. एकुणात काय तर एनव्हलोप खूपच सहजपणे वापरलं जात आहे.

१८४० ते १८४५ पर्यंत एनव्हलोप हातीच तयार होत असे. १८४५ मध्ये एडव्हीन हील आणि वॉरन दे ला रु यांनी पहिल्यांदा एनव्हलोप पिट्रिंग मशीनचे पेटंट मिळवले आणि त्यांचा वापर वाढला. आपल्यासाठी हा शब्द फारच दक्ष राहून उच्चारला पाहिजे वगरे कॅटेगरीतला नसल्याने उच्चार अगदी सहजपणे होतो. इंग्रजीत मात्र या शब्दाला एक खास वाक्प्रयोग जोडला गेला आहे. To push the envelope. अर्थात एखाद्या गोष्टीच्या मान्य, रूढ कल्पनेपेक्षा मर्यादेच्या पलीकडे जाऊन एखादी गोष्ट करणे. Tv shows are really pushing the envelope by showing so much violence and sex.
आता प्रश्न उरतो की या शब्दाचा उच्चार सुधारल्याने नेमकं साध्य काय व्हावं? तर आपला उच्चार योग्य, अचूक आहे याचं समाधान पदरी पडेल. म्हणूनच.. कर के देखो ! सच्चा और अच्छा लगता है !
रश्मी वारंग- viva.loksatta@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A guide to english pronunciation
First published on: 23-10-2015 at 01:05 IST