थंडी पडली की, वातावरणात एक उत्साह येतो. सुट्टय़ांचं उत्तम प्लॅिनग केलं जातं. बऱ्याच आऊटडोअर ॅक्टिव्हिटीज आणि इव्हेंट्स प्लॅन होताना आपल्याला दिसतात. कारण हाच तर अशा उद्योगांसाठी उत्तम काळ असतो. गाण्याच्या मैफलींपासून ते हुरडा पार्टीपर्यंत आणि नाइट मार्केटपासून शेतातल्या पोपटीपर्यंतचे हे इव्हेंट आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला समजत असतात.

उन्हाच्या झळा, पावसाच्या कटकटी संपल्या की वातावरणात तरतरी आणणाऱ्या थंडीचा मौसम येतो. हिवाळा आणि त्यातसुद्धा डिसेंबर, जानेवारी म्हणजे महोत्सवांचे महिने. पिकनिकचे प्लॅन्स, पाटर्य़ा, कॉलेजचे वेगवेगळे ‘डे’ज, स्पर्धा यामुळे एकूणच धमाल-मस्तीचा हा काळ. सुट्टय़ा, खाणं, गाणं, फिरणं याची चंगळ या काळात असते. वातावरणातला हा आल्हाद मग अनेक अनेक नवीन अ‍ॅक्टिव्हिटीजनी साजरा केला जातो. नाइट मार्केट, ओपन एअर योगा, वेगवेगळे खाद्य महोत्सव, काíनव्हल, शॉिपग फेस्टिव्हल, कॅम्पिंग ट्रिप्स अशा ओपन एअर कल्चरल अ‍ॅक्टिव्हिटीज या काळात मोठय़ा प्रमाणावर दिसू लागल्या आहेत.

मुंबईसारख्या शहरांत नाइट मार्केटची थीम घेऊन कुणी खुलं प्रदर्शन मांडतो, तर कुणी खाद्य महोत्सव. नुकतंच अशा प्रकारचं एक नाइट मार्केट बांद्रय़ात आयोजित करण्यात आलं होतं. एका रेस्टॉरंटनेच हा उपक्रम आयोजित केला होता. छोटय़ा कलात्मक उद्योजकांचं प्रदर्शन, सोबत उत्तमोत्तम आणि चविष्ट खाद्यपदार्थ, साथीला संगीत असं रंगीत-संगीत नाइट मार्केट होतं. संध्याकाळी उशिरापर्यंत चालणारी आधुनिक जत्राच असते ही. एरवी दुकानांमधून न दिसणारे डिझायनर दागिने, भेटवस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. सोबत टॅरो कार्ड रीडिंग, हँडरायटिंग अ‍ॅनालिसीस अशा अ‍ॅक्टिव्हिटीदेखील असतात.

शॉपिंगचा महिना

मुंबईत महालक्ष्मी सरस, पुण्यात भीमथडी जत्राही हिवाळ्यातच भरवण्यात येते. इथे गावोगावचे कारागीर, विक्रेते, कलाकार आपल्या वस्तू घेऊन येतात. सोबत प्रांतोप्रांतीचे पदार्थ चाखून खवय्येगिरी करण्याची सुवर्णसंधी खाद्य महोत्सवातून मिळत असते. मालवणी, कोळी, वऱ्हाडी, खानदेशी, लखनवी खाद्य महोत्सवांतून तर मांसाहारी पदार्थाची रेलचेल असते. पोट भरलं की उरलेलं सगळ नजरेत भरून समाधान मानण्याशिवाय पर्याय नसतो. हे झालं खाण्याचं! नाशिकजवळच्या प्रसिद्ध सुला वायनरीतर्फे सुला फेस्टही डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येतो. हा म्युझिक, फूड अ‍ॅण्ड िड्रक्स याचा मिलाफ असतो. याशिवाय वाइन टेिस्टगचे इव्हेंटदेखील होतात. यात वाइन टेिस्टगसोबत त्याची खरेदीदेखील करता येते.

म्युझिकल डिसेंबर

नुकताच मुंबईत झालेला ग्लोबल सिटिझन फेस्टिव्हल चांगलाच गाजला. म्युझिकल कॉन्सर्ट, शोजच्या माध्यमांतून इलेक्ट्रॉनिक म्युझिक, रॉक म्युझिकच्या ठेक्यावर सगळे ताल धरताना दिसतात. अशा म्युझिकल बॅण्डची पर्वणी याच काळात असते. परदेशातले नावाजलेले बॅण्ड यानिमित्ताने देशात येतात व सादरीकरण करतात. गोव्यातला सनबर्न फेस्टिव्हल यातला महत्त्वाचा. तो डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात रंगतो. भारतीय शास्त्रीय संगीताच्या मैफलींची संख्यादेखील हिवाळ्यात वाढते. कारण ओपन एअर थिएटर इव्हेंट या वेळी वाढतात. पुण्याचा सवाई गंधर्व संगीत महोत्सव यातला सगळ्यात प्रतिष्ठेचा आणि नावाजलेला. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात पुण्यात हा महोत्सव होत आहे.

कॉलेज डेज

कॉलेजमध्येदेखील या काळात लगबगीचं वातावरण असतं. कारण असतं अ‍ॅन्युअल गॅदरिंग आणि फील्ड ट्रिप अथवा इंडस्ट्रियल व्हिजिट नावाने येणाऱ्या धमाल सहलीची. शिवाय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धादेखील याच काळात होतात. पिकनिक, कॅम्पिंग, ट्रेकिंगसाठी देखील अनेक पावलं डोंगरांकडे वळतात. नाइट अंडर द स्टार्स असं म्हणून मोकळ्या माळरानात, किल्ल्यांवर सफरी घडवल्या जातात. रस्त्यावर बाइक रायडर्सच्या रॅलीदेखील अनेकदा दिसतात. सायकिलग करणारेदेखील यात मागे नाहीत. वातावरणातल्या उत्साहामुळे शारीरिक तंदुरुस्तीकडे देखील वळताना लोक दिसतात. मग मॅरेथॉन, योगसाधना, फिटनेसच्या शिबिरांचं आयोजन होताना दिसतं. धावणं, ट्रेकिंग, रोइंग, सायकलिंग अशा सगळ्या प्रकारांचा कस बघणारी ट्रायथलॉन स्पर्धा पुणे परिसरात या काळात आयोजित करण्यात येते.

सोशल झालेले इव्हेंट्स

फोटोग्राफरदेखील आपले कॅमेरे घेऊन फोटोवॉकला निघतात. शहरातले माहितीचे, गजबजलेले परिसर त्यांच्या नजरेतून टिपत असतात. लहानांपासून ते मोठय़ांपर्यंत सगळ्यांनाच काही ना काही फन एलिमेंट या काळात असतोच असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या आणि अशा एक्साइटिंग इव्हेंटची माहिती सोशल मीडिया खासकरून फेसबुक इनव्हाइटच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे आपल्या फ्रेंड्समधलं कोण जातंय, कोण इंटरेस्टेड आहे हे समजतं आणि त्यातून प्लॅन करणं अधिकच सोप्पं झालं आहे. अशा इव्हेंट्सच्या प्रसिद्धीसाठी फेसबुक पेज आणि ट्विटर हॅशटॅग या दोन गोष्टी हल्ली पुरेशा असतात.