सर ज.जी. उपयोजित कला महाविद्यालय व रचना संसद कलामहाविद्यालयामध्ये नुकतेच वार्षिक कलाप्रदर्शन भरले होते. ग्रामीण भागातील शिक्षणाची दूरवस्था, जाती, धर्माशी खेळणारे नेते, वायफाय, गुगल, फेसबुक, ट्विटर, वॉट्सअप यांची सामान्यांमध्ये वाढलेली भूक, स्क्रिझोफेनियाची धोक्याची घंटा अशा विविध विषयांवर तरुणांनी आपले विचार व कल्पकता या प्रदर्शनात मांडली होती. विद्यार्थ्यांचे जागृत सामाजिक भान या निमित्ताने पाहायला मिळाले.

idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
revised dates of mpsc exam declared soon
‘एमपीएससी’ परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच; मागासवर्गाकरिता नव्याने आरक्षणनिश्चिती
JNU The fight for democracy Elections in JNU left organizationIndian politics
जेएनयू : लोकशाहीसाठीचा लढा!
contract farming
शेतमजूर ते शेतकरी!

ग्रामीण भागात शिक्षणाची दूरवस्था झाली आहे. येथील पाचवीतील विद्यार्थी इयत्ता दुसरीचे पुस्तक नीट वाचू शकत नाहीत. त्यांचे गणितही फार कच्चे आहे. अशा विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी नव्या तरुणांनी पुढे यायला हवे, असा संदेश आकाश येवलेने आपल्या कॅम्पेनमधून दिला आहे. त्याला या प्रदर्शनात शासनाचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

‘स्टारबक्स’ या अमेरिकन कॉफी कंपनीने भारतातील तरुणांना भुरळ घातली आहे. आपल्या तरुणांना ऊर्जा मिळावी, त्यांनी तणावमुक्त होण्यासाठी स्टारबक्स ही कॉफी अवश्य प्यावी. असे आवाहन करणाऱ्या स्टारबक्स आणि त्याभोवती गुतंलेली तरूणाई याचा वेध जेजेच्या मानसी खाडे या विद्यार्थिनीने घेतला. तिला द्वितीय पुरस्कार मिळाला तर देशातील १० लाख लोक स्क्रिझोफेनिया रोगाने बाधित झाले आहेत. हे रुग्ण काल्पनिक जगात वावरत असतात. या मानसिक आजाराला योग्य उपचार न मिळाल्यास तो वाढतो. या रुग्णांना समजून घ्यावे, हा संदेश देणाऱ्या जेजेच्या मकरंद नारकरला तृतीय पुरस्कार मिळाला आहे.

हिंदू, मुस्लीम, शीख, ईसाई, जैन, बौद्ध अशा धर्माचा षटकोनी कॅरम करून सोंगटय़ांना धर्माची, स्टाईकरला राजकारण्यांची उपमा देऊन ‘धर्माशी खेळू नका’ असा संदेश जेजेच्या प्रदर्शनात देण्यात आला.

प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील ठिकाणांचे सकाळ, दुपार व संध्याकाळी बदलणाऱ्या प्रकाशाचे उत्तम निसर्ग चित्रण केले आहे. मोर, बोट, पांडुरंग, अब्दुल कलाम यांची कोलाज चित्रे उत्तम झाली होती. स्वच्छ भारत अभियान, पतंजली बस, मॅकडोनल्ड, ग्रामीण शेती यांच्या सुबक कलाकृती जेजेच्या प्रदर्शनात पाहायला मिळाल्या. या प्रदर्शनात अमूल, नटराजच्या जाहिराती, इंग्रजी, मराठी वर्तमानपत्रांची मांडणी, युनिसेफचा संदेश, पाणी वाचवायचे महत्त्व, दहशतवादातून मुक्ती असे अनेक विषय मांडले होते. ‘पानी फाऊंडेशन’ची फिल्मही वेधक झाली होती.

सर ज. जी. उपयोजित  कला महाविद्यालयाचे  प्रभारी अधिष्ठाता संतोष क्षीरसागर, प्रा. विश्वजीत सामंत, आशीष विळेकर, कृ =ष्णा पुलकुंडवार, चेतन जगताप, शैलेश साऊतकर या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

रचना संसदचे कलाप्रदर्शन

मुंबईच्या दादर येथील रचना संसद कलामहाविद्यालयातही नुकतेच वार्षिक कलाप्रदर्शन भरवण्यात आले होते. कल्पक चित्रकारांचा सुंदर आविष्कार येथे पाहायला मिळाला. ताज हॉटेल, गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांची वेधक छायाचित्रे या प्रदर्शनात मांडली होती. टाईपराइटर चालविणाऱ्या, तबला वाजविणाऱ्या अंध मुलांची छायाचित्रे आपले मन हेलावून टाकतात. नातवंडांचे आजीआजोबांसोबतचे फोटो कौटुंबिक जाणीव करून देतात.

माशाच्या आकारात, पोटामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, डबे, प्लास्टिकचा कचरा दाखवून ‘प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा’चा संदेश देण्यात आला. नौदलाचे जहाज, बुजगावणे, शंख, छोटय़ा बाहुल्या, स्वयंपाकघर यांच्या आकर्षक कलाकृती प्रदर्शनात मांडल्या होत्या. ‘बेटी को पढाना है, ओला चलाना है।’ हे चालकाचे वाक्य लक्ष वेधून घेते. अ‍ॅटॅक, वॉर, वंदे मातरम, झंडा उंचा रहे हमारा यांची कॅलिग्राफी, कॅलिग्राफी टूलने काढलेली देखणी व्यक्तिचित्रे वेधक वाटतात. सोन्याच्या ताटात, चांदीच्या ताटात, कागदात ग्लूकोज बिस्कीट ठेवून ‘क्योंकि यह भूख में फर्क नहीं जानता’  हे वाक्य भुकेच्या वेदना दाखविते. तसेच ताटामध्ये  गुगल, वायफाय, वॉट्सअप, फेसबुक, ट्विटर दाखवून याचीच भूक सर्वाना आहे, असा सारासार  विचार मांडण्याचा प्रयत्नही विद्यार्थ्यांनी केला आहे.

रोडीज, याहू, यंत्रमानव, टॉपिकाना यांच्या जाहिराती लक्षवेधी झाल्या आहेत.  गब्बरचे वाक्य ‘कितने मिनिट है!’ उत्तर- ‘तीन मिनिट सरदार’ ही खाद्यपदार्थाची जाहिरात मिस्कील वाटते. येवला पैठणी केंद्र, टी शर्ट्सच्या विविध डिझाइन्स तरुणांना आकर्षक वाटतील. इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, डीएनए, हिंदुस्थान टाइम्स यांच्या लेआऊट डिझाइनृसही या प्रदर्शनात पाहायला मिळाल्या. आधुनिक तंत्रज्ञान, ग्राफिकचा कल्पक वापर करून विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता या प्रदर्शनात दाखवून दिली. प्रदर्शनातील उत्तम कलाकृतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

रचना संसदच्या मुख्याध्यापिका सविता सराफ, येथील कलाशिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची आधुनिक विचारसरणी यामुळे रचना संसद कलामहाविद्यालयाचे वार्षिक कलाप्रदर्शन देखणे झाले होते. भावी कल्पक चित्रकारांची चुणूक येथे पाहायला मिळाली. नव्या कल्पनांनी आधुनिकतेला बळ मिळते. हे जेजे व रचना संसदच्या कलाप्रदर्शनांनी दाखवून दिले आहे. ही प्रदर्शने नव्या चित्रकारांना नक्कीच प्रेरणा देतील यात शंका नाही.

viva@expressindia.com