सायली सोमण

या वर्षीच्या सुरुवातीपासून आपली दर पंधरा दिवसांतून एकदा भेट होत आली आहे. बघता बघता वर्ष कसं संपत आलं कळलंच नाही. आता काही दिवसांतच आपण परत एकदा नवीन वर्षांचे स्वागत करायला तयार आहोतच. नवीन वर्ष म्हणजे परत नवीन संकल्प, नवीन कल्पना, नवीन फॅशन ट्रेंड्स व स्टाइल्स आल्याच. तर दर वर्षीप्रमाणेच येत्या नवीन वर्षांत आपण आपल्या कपडय़ांवर आणि त्याअनुषंगाने आपल्या स्टाइलमध्ये कसे बदल करणार आहोत यावर नजर टाकू या.

A bone stuck in a tiger's teeth
भक्ष्यावर ताव मारताना वाघाच्या दातात अडकले मोठा हाडाचा तुकडा; हातोड्याने….,थरारक व्हिडीओ एकदा बघाच
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
puppy rescue
माणुसकीला सलाम! दोन भिंतीच्यामध्ये अडकलं कुत्र्याचं पिल्लू; भिंत फोडून काढले बाहेर, पाहा Viral Video
girl playing holi with boyfriend while standing on moving scooter
चालत्या स्कुटीवर उभे राहून तरुणाला रंग लावत होती तरुणी! अचानक ब्रेक दाबला अन्…. व्हिडीओमध्ये बघा पुढे काय घडले

फॅशन ट्रेंड्सच बघायचे झाले तर मागच्या वर्षांतल्या फॅशन ट्रेंड्सला धरून आणि या कालावधीत घडलेल्या काही सामाजिक, राजकीय व आर्थिक घडामोडींचा अभ्यास करून, येत्या नवीन वर्षांतील फॅशन ट्रेंड्सचा विचार केला गेला आहे. त्यामुळे मागील वर्षांतील काही लोकप्रिय गाजलेल्या स्टाइल्स या वर्षीदेखील आपल्याला परत दिसू शकतात.

नवीन फॅशन ट्रेंड्स बघायचे झाले तर त्याची सुरुवात साधारणत: आपण त्या फॅशन घटकांपासून म्हणजेच कलर ट्रेंड्स, सिल्हाऊट्स, फॅब्रिक्स आणि सरफेस ऑर्नमेन्टेशनपासून करतो. सर्वप्रथम आपण येत्या वर्षांतील कलर ट्रेंड्सवर एक नजर टाकू या. नव्या वर्षांची सुरुवात ही हिवाळ्याच्या मध्यात आणि वसंत ऋतूच्या आगमनाने होते. म्हणूनच या पहिल्या दोन ते तीन महिन्यांत आपण मिश्र रंगसंगतीवर जास्त भर देणार आहोत. म्हणजेच पेस्टल कलर्स आणि फॉर्मल गडद रंगांचा मेळ असेल. या वर्षांप्रमाणेच पुढच्या वर्षीदेखील पावडर ब्ल्यू, पिस्ता ग्रीन, लेमन येल्लो आणि डस्की ऑरेंज/पीच कलर पण अजून जास्त उठावदार आणि हलक्या गडद छटांमध्ये पाहायला मिळणार असून ते वर्षभर ट्रेंडमध्ये असणार आहेत. शिवाय उबदार स्वेटर, जॅकेट, शॉल इत्यादी अपरल्स इंग्लिश फॉर्मल कलर पॅलेट म्हणजेच कोळा, ऑफव्हाइट, आयव्हरी, ग्रे,चॉकोलेट ब्राऊन, मरून, र्बगडी, मिलिटरी ग्रीन, डेनिम ब्ल्यू, नेव्ही ब्ल्यू अशा विविध रंगांमध्ये बघायला मिळतील. वर्ष जसे पुढे जाईल तसेच ऋतूंप्रमाणे रंग अजून फिके आणि गडद होत जातील. उदाहरणार्थ वर्षां ऋतूमध्ये खूप फिके रंग न घालता लोक जास्त मळखाऊ , गडद रंगाचे कपडे घालायला प्राधान्य देतील. पार्टीवेअर आणि नाइट लाइफमधील अ‍ॅपरल्स आणि अ‍ॅक्सेसरीजमध्ये तर अपल्याला मेटॅलिक कलर्स आणि निऑन कलर्सचा वापर जास्त दिसेल.

कलर ट्रेंड्सनंतर आपण सिल्हाऊट्सवर एक नजर फिरवू या. आता मागील बऱ्याच लेखांमधून एव्हाना तुम्हाला कळलंच असेल की सिल्हाऊट्स म्हणजे थोडक्यात कपडे घातल्यावर त्या कपडय़ाची एका ठरावीक इंग्रजी अक्षराप्रमाणे दिसणारी रूपरेषा. तर मागील वर्षांच्या ‘कम्फर्ट फिट’ला धरूनच त्यात पुढचे आणखी काही बदल करून येत्या वर्षांतदेखील स्त्रिया आणि पुरुष दोघांचाही अ‍ॅपरल्सच्या बाबतीतला कल थोडय़ा ढगळ फिटिंगकडे असेल. कम्फर्ट फिटच्याच जोडीला हिप्पी आणि बोहेमियन फिट्समध्येही आपल्याला जास्त कपडे दिसतील. स्त्रिया अगदी खूप फेमिनिन सिल्हाऊटचे कपडे न घालता थोडे टॉम बॉइश फिटचे कपडे घालतील. एक्स्टेंडेड रुंद खांद्यांचे ड्रेसेस, मोठय़ा कॉलर आणि हुड्स, फ्लोइंग घेर असलेले कपडे ही येत्या काळातील कपडय़ांची वैशिष्टय़े असतील. स्त्रिया आणि पुरुष दोघांकडूनही पुढच्या वर्षी ए आणि एक्स सिल्हाऊट्सच्याच कपडय़ांचा जास्त वापर होताना दिसेल.सिल्हाऊट्सनंतर सर्वात महत्त्वाचा फॅशनमधील घटक येतो तो म्हणजे फॅब्रिक्स आणि त्यावरील सरफेस ऑर्नमेन्टेशन. नेहमीप्रमाणे कॉटन, वुल, लिनेन, सिल्क, टेरीकोटा, टेरीवुल, विकोज यांसारखे फॅब्रिक या वर्षीही वापरले गेले आणि पुढच्या वर्षीही ते असेल मात्र या वेळी त्यावर असलेले टेक्स्चर, ते बनवताना अथवा विणताना त्यात वापरले गेलेले तंत्रज्ञान हे सालाबादप्रमाणे बदलत असते तसेच त्यावरील सरफेस ऑर्नमेन्टेशनमध्येही विविध प्रकार बघायला मिळतील. उदाहरणार्थ या वेळेस डेनिम कापडामध्ये टेक्स्चर्ड डेनिम आणि पॅचवर्क डेनिम हे जास्त प्रमाणात बघायला मिळेल; ठळक फ्लोरल प्रिंट्सचे इतर फॅब्रिक्स किंवा अ‍ॅबस्ट्रॅक्ट आणि बोहेमियन प्रिंट पद्धतीचे उठावदार रंगातील सिल्क खूप आवडीने घातले जाईल, या व्यतिरिक्त टाय अ‍ॅण्ड डाय म्हणजेच बाटिक आणि लेहेरिया पद्धतीच्या कापडाची परत एकदा बाजारात चलती असेल. अ‍ॅप्लिक एम्ब्रॉयडरीवर भर जास्त दिला जाईल, फॉर्मल कपडय़ांमध्ये वेगवेगळ्या रंगसंगतींचे चेक्स फॅब्रिकमधील खूप पर्याय बाजारात दिसतील. या नेहमीच्या वापरात असलेल्या फॅब्रिकव्यतिरिक्त पार्टी वेअरसाठी मेटॅलिक रंगाचे सॅटिन वीव्हचे कपडे, आर्टिफिशिअल फरपासून बनवले गेलेले उबदार कपडे.. यांचाही वापर जास्त दिसून येईल. याशिवाय, रिसायकल अ‍ॅपरलकडेही एक प्रयोगशील फॅशन ट्रेंड म्हणून बघितले जाईल.

आजच्या लेखात फॅ शनमधील मूळ घटक, या वर्षीची फॅ शन यांच्यावर आधारित नव्या वर्षांतील फॅ शनचे ट्रेंडकसे असतील हे आपण लक्षात घेतले. आता पुढच्या लेखात आपण या सगळ्या घटकांचा एकत्रित विचार क रताना येत्या वर्षांतील ट्रेंडी कपडे, अ‍ॅपरल्स, फुटवेअर, ज्वेलरी, अ‍ॅक्सेसरीज या सगळ्याचं स्वरूप कसं असेल, किंवा किती बदललेलं असेल हे लक्षात घेणार आहोत.