19 February 2019

News Flash

नया है यह : वेअर लिपस्टिक

एले १८’कडूनही १०० रुपयांच्या आसपास पिंक, पॉप कलरमधील लिपस्टिक मिळू शकतील.

(संग्रहित छायाचित्र)

गायत्री हसबनीस

हटके लिपस्टिकचे प्रेम संपतच नाही. या वेळेस बाजारात आणि ई-मार्केटमध्ये सर्व ब्रॅण्ड्सनी नवीन कलरफुल लिपस्टिक मोठय़ा प्रमाणात आणले आहेत. त्यामुळे त्याच्या नवीन ट्रेण्डसह काही विविध डिस्काऊं ट व ऑफरही आहेत. किमतीवर ७ ते १० टक्के ऑफ असून त्यात विविध एक्ट्रा लिपस्टिक पॅक्सही उपलब्ध आहेत. तुमच्या बॅगमध्ये लिपस्टिकसाठी वेगळी स्पेस नक्कीच ठेवा.

* ‘रिव्लॉन’ या ब्रॅण्डचे ‘अल्ट्रा एच डी मॅट लिप कलर’, ‘अल्ट्रा जेल एच डी जेल लिप कलर’, ‘न्यू रिव्लॉन अल्ट्रा एच डी मॅट लिप कलर’ असे नवीन पण विविध कलर आणि मॉइश्चरायझिंग लिक्विडमध्ये सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. मॅट कलरमध्ये गुलाबी रंगाच्या प्रतीकांतून म्हणजे टेम्प्टेशन, फल्र्टेशन, अ‍ॅडिक्शन, सडक्शन, अम्ब्रेस, ऑब्सेशन, डिवोशन, रोमॅन्स, पॅशन, लव्ह, इन्टेन्सिटी, क्रश या नानाविविध गुलाबी रंगाच्या शेड्समध्ये मॅट कलर उपलब्ध आहेत. पावसाळी हवा आहे आणि त्याचबरोबरीने ऑगस्टचा माहिना आहे. डेटला जायचे असेल किंवा डिनरला. आपल्या पार्टनरसोबत जाताना रिव्लॉनचे हे शेड्स ट्राय करायलाच हवेत. याच्या किमती साधारण १,१६० रुपयांपासून सुरू होऊन १,२०० ते १६०० व १९५० रुपयांपर्यंत मिळतील. तीन लिपस्टिकचा पॅक साधारण ४,००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. जेल लिपस्टिकमध्ये या सीझनमध्ये ट्वायलाइट, सॅण्ड, डेझर्ट, पिंक क्लाऊ ड, सनसेट, ब्लॉसम, डॉन अशा शेड्स आहेत. त्यामुळे इतक्या व्हारायटीच्या रंगाचा अनुभव घ्यायलाच हवा.

* ‘मॅक’ या ब्रॅण्डचे सुपी्रम बीममधील ग्लोडन, ऑरेंज, रेड आणि ‘बुनहॉगसेक’ म्हणजेच हेवन पिंक या कॉरियन रंगातही उपलब्ध आहेत. साधारण ९०० रुपयांपर्यंत सहज आपल्या आवडीच्या लिपस्टिक्स मिळू शकतील. वेलवेट मॅट, रेट्रॉ मॅट यात १,५०० रुपयांपर्यंत तर १,९०० रुपयांपर्यंत मॅन्ग्रुव, पिगमेंट या पॅटर्नच्या लिपस्टिक्स उपलब्ध आहेत. इथे सॅटिन, वेलवेटपेक्षा रेट्रॉला मागणी अधिक आहे.

* ‘मेबलिन’ या ब्रॅण्डची डार्क रेड मॅट लिपस्टिक ३०० रुपयांपर्यंत तर कलर सेन्सेशन ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. अजूनही या दोन आवडत्या लिपस्टिक्सची रेलचेल ऑनलाइनवर सुरू आहे. त्यातूनही कलर सेन्सेशनमध्ये नारंगी रंगाला मागणी आहे. मॅट लिपस्टिकलाही अनन्यसाधारण महत्त्व मेबलिनने दिलेय त्यामुळे ऑथेंटिक प्रॉडक्ट्सही असल्यामुळे डार्क ब्राऊन व डार्क पर्पल हे कलर नव्याने ट्रेण्डमध्ये आहेत. साधारण ५०० रुपयांपासून या लिपस्टिकची किंमत असून त्यावर १० टक्के सवलत देण्यात आली आहे. बेबी लिप्स तर नेहमीप्रमाणे छान शेड्समध्ये उपलब्ध आहेत. या वेळेस न्यूड कलर आणि वेलवेटला वाव तितकासा नाही पण  मेबलिनच्या सेन्सेशनल व सुपरस्टे कलर लिपस्टिक ट्रेण्डमध्ये आहेत.

* ‘लॉटस्’कडून यंदा हर्बल, इकोस्टे यातून ओठांच्या मुलायमतेसाठी आणलेल्या लिपस्टिक्स २२०-२९० रुपयांपर्यंत आहेत.

* ‘लॅक्मे’तून यंदा करीना कपूर खानने तिचे नवे कलेक्शन लाँच केले आहे. १२०० रुपयांत पाऊट डीफायनरमध्ये आठ विविध शेड्स खासकरून क्रीमी मॅट ट्रेमध्ये आहेत. ‘लॅक्मे’तर्फे यंदा ‘नाइन टू फाइव्ह’ या प्राइमर अंतर्गत मॅट लिप कलरलाच पसंती आहे. सॅफरॉन, वर्मिल, ऑरेंज, रेड, पार्टी, चॉको, रस्ट, मरून, रॉझी, प्लम, स्कार्लेट या विविध शेड्सच्या लिपस्टिक त्यांनी आणल्या आहेत. साधारण १०० रुपयांत क्रेयॉन, ४०० पर्यंत लिप पाऊट मॅट, त्यातही सॅटीन लिपस्टिक, मॅट लिपस्टिकमध्ये ४५०, ५००, ४९०, ४३० पर्यंत विविध रेट्सचे पर्याय आहेत.

* ‘लॉरियल’ या ब्रॅण्डने मॉइश्चरायझरवर भर दिलाय. १,०५० रुपयांपर्यंत तर ९५५ मध्ये मॉइस्ट मॅट कलर आहेत. ज्यात जर्मन ब्राऊन, फ्रेंच कलरचा समावेश आहे. ज्यांचे निळ्या रंगावर प्रेम आहे त्यांच्यासाठी लॉरियल पॅरीसतर्फे हटके ब्लू शेड्स आणले आहेत.

* ‘एले १८’कडूनही १०० रुपयांच्या आसपास पिंक, पॉप कलरमधील लिपस्टिक मिळू शकतील. रेड, ऑरेंज, पिंक, न्यूड या रंगात लिपस्टिक उपलब्ध आहेत.

* ‘हिमालया हर्बल्स’तर्फे तुमच्या ओठांच्या रक्षणासाठी लिची, स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये १३०, १२० रुपयांपर्यंत लिपस्टिक सहज मिळू शकतील.

* ‘फेसेस’मध्येही विविध क्रेयॉन्स त्यातही मॅट पिंक, मॅट लाइट ब्राऊन, फंकी पिंक, सुपर पर्पल मॅट, शिमर कलरसोबत ६००, ७०० ते ८९० रुपयांपर्यंत मिळतील.

viva@expressindia.com

First Published on August 24, 2018 1:13 am

Web Title: article about different types of lipsticks