गायत्री हसबनीस

कॉलेजच्या वल्लींना आता ‘व्हेकेशन’ असल्याने सगळीकडे पार्टीचा मूड आहे. तरुणींसाठी पार्टी सेलिब्रेशन म्हणजे कुल, ग्लॅमरस दिसणं आलंच. मुलींसाठी कपडे, अ‍ॅक्सेसरीज आणि मेकअप तर आहेत, पण त्यांचा डोळा असतो तो मुख्यत्वे ‘हिल्स’वरती. उंच टाचांच्या चपला म्हणजे इतरांसाठी कुतूहलाचा विषय पण तरुणींसाठी मात्र खरेदीची पर्वणीच जी या सीझनमध्ये तरुण मुलींसाठी चालून आलीये. हिल्स या सगळ्यांच्या आवडीच्या त्यामुळे हिल्सवरील रंग, डिझाइन सर्व गोष्टींचा विचार केला जातो. सगळ्यांना आवडतील अशा नव्या रूपातील हिल्स सध्या बाजारात आल्या आहेत. ‘रिलायन्स ट्रेण्डन्स’, ‘अजियो.कॉम’, ‘शॉपर्स टॉप’, ‘अ‍ॅमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’, ‘द लेबल लाइफ’ अशा विविध वेबसाइटवरून तुम्ही आवडीच्या स्टाइलिश हिल्स विकत घेऊ  शकता.

* यंदा चन्की हिल्स टॉप लिस्टवर दिसतील. अशा हिल्स तुमच्या कॅज्युअल वेअरला उठाव देतात. त्यामुळे यामध्ये न्यूड आणि प्युटर हे रंग आहेत जे डल आणि डार्क रंगाच्या आऊ टफिटवर शोभून दिसतात. यांची किंमत ‘अजियो.कॉम’वर ६००, ४५० रुपये इतकी आहे. याशिवाय चन्की हिल्स सॅन्डल तुम्ही ९०० रुपयांतही घेऊ  शकता. क्रिस क्रॉस स्ट्रॅपच्या चन्की हिल्स या स्त्रियांना जास्त आवडतात त्यामुळे मल्टिस्ट्रॅप, स्ट्रॅपी अप्पर, स्ट्रॅपी ब्लॉक या स्टाइलच्या क्रिस क्रॉस स्ट्रॅपच्या चन्की हिल्स तुम्हाला ३७५, ८१०, ९००, ९५०, १,७९९, १,३५० रुपये अशा विविध किमतीत मिळतील. यात गुलाबी, राखाडी, ब्राऊ न, मेटॅलिक ग्रे असे रंग असून वेलवेट, मेटॅलिक, चीक, लेदर फॅब्रिकमधील अशा हिल्स पार्टीवेअर म्हणून खरेदी करता येतील.

& वेडिंग पार्टीसाठीदेखील हिल्समध्ये भरपूर प्रकार आहेत. यात प्रामुख्याने किटन हिल्स पॉप्युलर असून यामध्ये बेज, ब्राऊ न, ब्लॅक, येल्लो या रंगाच्या विविध शेड्स आहेत. ९५० रुपयांपासून किटन हिल्स मिळतील. ब्लॅक किटन हिल्स १,३५० रुपये एवढय़ा किमतीत मिळतील. ‘पॉइंटेड टो’ आणि ‘स्टडेड पॉइंटी टो’, ‘टी-बार’ या प्रकारच्या किटन हिल्सची किंमत १,१५० रुपये इतकी आहे. या हिल्समध्ये टेर आणि एमब्रोयडरीसुद्धा आहे व १,३९९ आणि १,९९९ रुपये अशी त्यांची किंमत आहे. हिल्स शूज घेण्यापेक्षा नॉट, पोनी, रफल्स स्टाइलच्या किटन हिल्स जास्त योग्य ठरतील.

* स्टिलेटोज् (stilettos) यांची खासियत अशी की यात तुम्हाला अक्षरश: भरपूर विविधता मिळते. ट्राऊ झर, प्लिटेड स्कर्ट, ट्रान्सपरंट मिडी, थ्री फोर्थ यावर हे स्टिलेटोज् परफेक्ट मॅच होतात. स्युड स्टिलेटोजची ७५० रुपये इतकी किंमत आहे तसेच पॉइंटेड टो स्टिलेटोजमध्ये अ‍ॅन्कल व्रॅप, मेश, ब्रोकेड प्रिंट, पॅनल्ड असे प्रकार आहेत आणि त्यांची किंमत अनुक्रमे ८५०, ९००, २,९९९, ९५० रुपये इतकी आहे. सिन्ड्रेला स्टिलेटो ५,५९९ रुपयांपासून उपलब्ध आहेत. तर लेझर कट स्टिलेटो ७२० रुपयांत मिळतात.

* डॉरसे (D’Orsay) हिल्स यातही टाय-अप्स, लेस, क्रिस क्रॉस, अ‍ॅन्कल क्लोजर असे विविध प्रकार आहेत. यांची किंमत ६८० रुपयांपासून १,०१०, १,१००, ३,९९९ रुपयांपर्यंत आहे. शेरीफ शूजमध्ये रेड, टॅन ब्राऊ न, ब्लॅक, व्हाइट, पीच हे कलर आहेत. १,२४९, १,३९५ रुपये इतकी त्यांची किंमत आहे.

* विंटर सिझन हळूहळू जवळ येतो आहे. त्यामुळे सिंथेटिक लेदर शूजची मागणी वाढते आहे. यात हाय हिल्स झिपर बूट तुम्हाला ६९९ रुपयांपासून मिळतील. सुपर प्लॅटफॉर्म ब्लॅक बूट, ब्लॉक हिल अ‍ॅन्कल बूट, गेट बूट, ब्रुक्लिन बूट असे विविध स्टाइलिश बुट्स तुम्ही ४९९, ५९०, ९९९ रुपयांपासून विकत घेऊ  शकता.

* डार्क शेड्समधल्या पल्प हिल्स तुम्ही गाऊ न, वन पीसवर परिधान करू शकता. १,३५०, १,३७९, २,३९९ रुपये इतकी त्यांची किंमत आहे. कॅटवॉक शूजची यंदा तरी एवढी क्रेझ नाही. त्याऐवजी स्लिंग बॅक स्टिलेटोचा विचार तुम्ही करू शकता. ७२० रुपयांपासून त्यांची सुरुवात आहे. या पल्प हिल्स मिंत्रा.कॉमवर उपलब्ध आहेत. यात मुघल, फ्लोरल प्रिंटही उपलब्ध आहेत.

* बोलरूम डान्स हिल्स, ग्लिटर हिल्स, शिमर, डायमंड, गोल्डन फिचर्स असलेले हिल्स तसेच ब्रायडल हिल्स, बॅलेरिना हिल्स, ग्लॅडिएटर तुमच्यासाठी १,००० – ३,००० रुपये इतक्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत; परंतु ट्रेण्डमध्ये ब्रायडल हिल्स आणि ग्लिटर हिल्स आहेत. ज्यांची किंमत ३,९९९, ३,५००, ४,९९९, ६,९९९ रुपये ते ४९,४३१, ४३,०००, ४५,७८९ रुपये इतकी आहे.

* तुम्हाला पूर्ण ऑक्यूपाइड डिझाइन असलेल्या हिल्स आणि ओपन किंवा सेमी ऑक्युपाइड डिझाइन असलेल्या हिल्ससुद्धा मिळू शकतात. या सर्व हिल्स आणि हिल्स बूट्सवर ५० ते ८० टक्के सूट आहे. त्यामुळे आताच योग्य वेळ आहे या हिल्सवर तुटून पडायची हे वेगळे सांगायला नको..