23 April 2019

News Flash

‘हॉट’ विंटर

यंदा मेन्सवेअरमध्ये थंडीतील हॉट फॅशनसाठी अनेक पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

गायत्री हसबनीस

या वेळी फॅशनविश्वात पहिल्यांदा बोलबाला झाला आहे तो ‘विंटर मेन्सवेअर कलेक्शन’चा.. हिवाळ्याची सुरुवातही नाही झाली तोवर आपल्याकडे ऑनलाइन बाजारात प्रामुख्याने मेन्सवेअर कलेक्शन पहिल्यांदा दाखल झाले आहे. यंदा मेन्सवेअरमध्ये थंडीतील हॉट फॅशनसाठी अनेक पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत.

सगळीकडे गारवा पडतोय याची जाणीव तर झाली, पण तरुणांमध्ये थंडी पडल्याची फारशी बोलाचाली नसतानाही मुलांच्या घोळक्यात सर्वत्र विंटर कलेक्शन आणि त्यांची खरेदी याचीच चर्चा आणि उत्सुकता आहे. मुलीसुद्धा त्यांच्या मित्रांना काही खरेदीसाठीचे पर्याय सुचवत आहेत. त्यामुळे सगळीकडे थंडाव्याची चाहूल आणि हिवाळ्यातील खरेदीची हवा आहे. मात्र या वेळी फॅशनविश्वात पहिल्यांदा बोलबाला झाला आहे तो ‘विंटर मेन्सवेअर कलेक्शन’चा.. हिवाळ्याची सुरुवातही नाही झाली तोवर आपल्याकडे ऑनलाइन बाजारात प्रामुख्याने मेन्सवेअर कलेक्शन पहिल्यांदा दाखल झाले आहे. यंदा मेन्सवेअरमध्ये थंडीतील हॉट फॅशनसाठी अनेक पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. शिवाय, या कलेक्शन्सवर सध्या ऑफर्स, सवलतींची लुटालूट सुरू असल्याने मेन्सवेअर फॅ शनवर नजर टाकण्याशिवाय गत्यंतर नाही.

तुम्ही खरेदीला सुरुवात केली तर यंदा कॅज्युअल कोट्स ट्रेण्डमध्ये दिसतील. माऊंटनस्किन लेदर विंटर कोट, लेटर्स प्रिंट जॅकेट कोट, नाईक ब्ल्यू वाईन्ड चिटर्स आणि रेड टेप विंटर कोट असे काही पर्याय आहेत. यातही ‘हूडेड कोट’ टॉप लिस्टवर आहे, ज्यामध्ये कॉटन ब्लॅन्ड हूडेड कोट, लाँग स्लीव्ह हूडेड, वेलवेट हूडेड, लेदर हूडेड, कट पॅनल हूडेड आणि झिपर टाइप हूडेड कोट असे विविध प्रकारचे कोट बाजारात आहेत. यंदाचे कोट्स लिनेन, वूल या फॅब्रिकमध्ये असून पर्का कोट, ब्लेन्ड कोट या स्टाईलमध्ये आणि सॉलिड जॅकेट कोट, आर्मी कॉलर कोट या स्वरूपातही आहेत. मल्टिपॉकेट आणि सिंगल बटणचे फॉर्मल/कॅज्युअल कोटसुद्धा फुल स्लीव्हज आणि लाँग साइजमध्ये पाहायला मिळतात. तसेच पॉलिस्टर फॅब्रिकमध्येही कॅज्युअल कोट्स आहेत. पर्का कोट्ससोबतच बॉम्बर कोट्स, टॉप कोट्स, कार कोट्स असे काही नवीन अवतार दाखल झाले आहेत. अर्थात यात काळ्या रंगाच्या छटांचा मामला जास्त आहे, तर क्रीमी ब्राऊन, चेक्सी ग्रे, ऑफ व्हाइट असेही रंग उपलब्ध आहेत.

जॅकेट्स

झिपर फ्रंट आणि हाय नेक जॅकेट्स यांच्यासह बायकर जॅकेट्स, स्लिम फिट जॅकेट्स जास्त पाहायला मिळतील. रिव्हर्झेबल आणि पफरेरेडेट जॅकेट्स मल्टिपल आऊटफीटवर सूट होतात. कामोफ्लाज प्रिंटेड आणि टेक्स्चर्ड व्हर्सिटी जॅकेट्स हेसुद्धा वापरून पाहायला हरकत नाही. क्विटेड कॅमो, पॅनल्ड झिप-अप जॅकेट्स मरून, स्पॅनिच ग्रीन आणि टी कलरमध्ये उपलब्ध आहेत. हेम्स आणि डॅनिम जॅकेट्ससुद्धा कॉपर कलर, डार्क ब्ल्यू शेडमध्ये आहे. पफर जॅकेट फॉर्मल वेअरवरही सुटेबल आहे, तर ट्विड जॅकेट जीन्सवर कॅज्युअल आहे.

स्वेटशर्ट

यात प्रामुख्याने स्विटर्स आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. शॉल नेक स्वेटशर्ट हा प्रकार लक्षवेधी ठरला आहे. ड्रॉप शोल्डर हुडी, थ्रीडी अ‍ॅबस्ट्रॅक्ट हुडी, जोमेट्रिकल प्रिंटेड हुडीसुद्धा वूलनमध्ये आहेत. फुल नेक राऊंडेड स्विटर, नॉच कॉलर स्विटर, ओपन फ्रंट स्वेटशर्ट हे ट्रेण्डमध्ये आहेत. ग्रिन्डल आणि कट – स्यु पॅनल्ड झिप-अप स्विटर आहे ज्यात ट्राय कलर, कॉन्ट्रास्ट कलर आहेत. किन्ट स्विटर, व्ही नेक आणि रिब्ड स्वेटशर्टलादेखील मागणी आहे. क्रू – नेक पुल ओव्हरसुद्धा विंटर कलेक्शनमध्ये इन आहे.

वेस्टकोट

साइड झिप आणि साइड बटण स्टाईल खाकी रंगाचे वेस्टकोट कॉटन आणि डच वेलवेटमध्ये आहे. यातही स्टॅन्ड कॉलर, डबल ब्रेस्टेड, फिट लेदर असे काही वेस्टकोट आहेत. सिंपल प्लेड आणि स्टिच प्लेड वेस्टकोट आहेत जे जास्त आरामदायी आहेत. सॉलिड, वूलन, बॉडी टेलर्ड, नेव्ही, स्ट्राईप्ट, रेग्युलर फिट, पॅटन्र्ड, ब्लॉक प्रिंट, स्लिम फिट, सॉलिड फॉर्मल, एथनिक विंटर, ऑलिव्ह सॉलिड आणि लिनेन नेहरू असे विविध प्रकारचे सिंपल वेस्टकोटचे पर्याय उपलब्ध आहेत.

कार्डिगन

कॉटन ब्लेंड, कलर साइडेड, थंब ओपनिंग, झिप डेकोरेशन आणि कॅज्युअल कॉटन कार्डिगन असे विविध कार्डिगन कलर ब्लॉक आणि स्मोक प्रिंटमध्ये आहेत. प्लेन कार्डिगन, टय़ुनिक एंटर, ओव्हरसाइज्ड कार्डिगन असे काही प्रकार आहेत जे सिंपल वेअरमध्ये मोडतात. या कार्डिगनमध्ये एसिमेट्रिकल कलर पॅटर्न्‍स आहेत. ओपन लाँग कार्डिगन, फुल स्लीव्ह श्रग कार्डिगन, वॉटर फॉल फुल स्लीव्ह कार्डिगन, कॉटन सिनकर, फ्लेकडेड कॉटन असे भरपूर पर्याय कार्डिगनमध्ये आहेत. चारकोल कलरमध्ये थंब होल ओपन लाँग कार्डिगन आहे. तसेच टर्टल नेक आणि स्टॅन्ड कॉलरमध्येही विविध कार्डिगन्स आहेत.

विंटर हॅट्स

या हॅट्समध्ये इतक्या स्टाईल्स आहेत. थोडक्यात, अ‍ॅक्रेलिन वूलन हॅट्स या सीझनला असून बिनी कॅप, बॅगी हॅट, वूलन, स्कल कॅप, बॉनेट हॅट, क्निट कॅप, विंटेज बाऊ लर, स्कार्फ कॅ प, ट्रॅपर हॅट्स अशा विविध स्मॉल साइज आणि ओव्हरसाइज्ड हॅट्सही आहेत.

स्कार्फ

यामध्येही प्लेड लेस्चर स्कार्फ, बॉयफ्रेंड स्कार्फ, चेकर्ड स्कार्फ आहेत; पण वूलन मफलर, प्युअर सिल्क मफलर हेही तितकेच कूल आहेत. या स्कार्फमध्ये इंग्लंड वूल आणि काश्मिरी शॉल पद्धतीचे स्कार्फ आणि मफलर आहेत. यात मल्टिकलर असून यामध्ये फॉर्मल स्काव्हर्ज आणि कॉटन सिल्क मफलर्स आहेत. अल्ट्रा थीन आणि हटके टार्टन स्कार्फही ट्रेण्डी आहेत.

यंदा सेमी कलर कॅज्युअल वेअरला मेन्सवेअरमध्ये पसंती आहे. त्यामुळे डिझायनर लुकपेक्षा सिंपल आणि फॉर्मल लुकला जास्त प्रमाणात ग्राहकांना आकर्षित करतील. ऑनलाइन बाजारात उपलब्ध असलेल्या या कलेक्शनवर सहज जरी नजर टाकली तरी यंदाच्या विंटरला कुठेही न जाता घरच्या घरी तरुणांना थंडीतले त्यांचे त्यांचे फॅ शन स्टेटमेंट्स बसल्या जागी निश्चित करता येतील. कपडय़ांचे इतके प्रकार, फॅब्रिक आणि स्टाईलमधील वैविध्य यामुळे या वेळी विंटर फॅ शनच्या बाबतीत तरुणाईने होऊ द्या खर्च म्हणत खिसा खाली करायला हरकत नाही.

First Published on November 30, 2018 3:42 am

Web Title: article about winter menswear collection