नामांकित ब्रॅण्ड्सच्या जन्माची, साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेणारं हे सदर.

काही ब्रँड म्हणजे त्या उत्पादनातले एक्के असतात. त्या ब्रँडपाशी येऊन चर्चा थांबते. एककाळ असा होता जेव्हा जगणं सोपं होतं. बाजारात हजार पर्याय नव्हते आणि आपली साबण या विषयावरची चर्चा लाईफबॉयपाशी येऊन थांबत होती. साबण विश्वातला हा हुकुमी एक्का..नावात बॉय असला तरी आबालवृद्धांना प्रिय. हा भूतकाळी उल्लेख याकरिता की आजही लाईफबॉय घरी येतो. पण ‘तो म्हणजे तोच’ ही त्याची दादागिरी संपुष्टात आली आहे. तरीही अशा सुप्रसिद्ध साबणाची कहाणी जाणून घ्यायला आपल्याला नक्की आवडेल.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात चाललंय तरी काय? मोहम्मद नबीने शेअर केलेली इन्स्टा स्टोरी केली डिलीट, काय आहे कारण?
27 Year Old Youtuber Abhideep Saha Dies Video of No Passion No Vision In Memes
२७ वर्षीय प्रसिद्ध भारतीय युट्युबरचे निधन; एकाच वेळी अवयव झाले निकामी, कष्टाने कमावले होते ५ लाख सबस्क्राइबर्स
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

विल्यम आणि जेम्स या लिव्हर बंधूंनी १८८५ साली इंग्लंडमध्ये साबणाची एक छोटीशी फॅक्टरी सुरू केली. हे बंधू व्हेजिटेबल आणि पामतेलापासून साबण बनवत. सनलाईट हा त्यांचा पहिला वहिला साबण खूप गाजला. व्यवसाय हळूहळू वाढत होता. लिव्हरबंधुंची ही साबण फॅक्टरी म्हणजे लिव्हरपूल भागातील पोर्ट सनलाईटमध्ये वसलेलं एक गावच. साबण बनवण्याच्या विविध शक्यता, विविध प्रयोग हे बंधू आजमावत होते. १८९४-९५ च्या दरम्यान या दोघा भावांनी पहिल्यांदाच  काबरेलिक अ‍ॅसिड वापरून बनवलेला साबण म्हणजे आपला लाईफबॉय. या काबरेलिक अ‍ॅसिडच्या वापरामुळे त्याचा लाल रंग आणि औषधासारखा गंध हे समीकरण पक्के झाले. त्याकाळात  काबरेलिक अँसिडचा वापर फक्त मेडिकलच्या क्षेत्रात होत असल्याने साबणात त्याचा वापर अनोखा ठरला. १९११ पर्यंत लाईफबॉय अमेरिका, जर्मनी, स्वित्र्झलड, कॅनडापर्यंत पसरला. थोडं विषयांतर होईल पण चिं.वी. जोशी यांच्या चिमणरावाच्या रविवारच्या वर्णनातला एक प्रसंग आठवतो. दर रविवारी काबरेलिक साबणाने वडील छोटय़ा चिमणला आंघोळ घालत. नाकातोंडात साबण गेल्यामुळं चुरचुरत्या डोळ्यांनी चिमणराव आरडाओरडा करत. तेव्हा वडील विचारत, ‘मरणारे ते जंतू ओरडत नाहीत मग तू का ओरडतो आहेस?’ हा प्रसंग वाचताना का कोण जाणे पण लहानपणी मनात एकच विचार येई. तो काबरेलिक साबण नक्कीच लाईफबॉयच असला पाहिजे.

शरीरावरील जंतू मारणारा हा साबण जाहिरातींमधून मनावर असा काही ठसला की साबणाचा रंग, सुगंध, ग्लॉसीपणा यांच्या कल्पना विकसित होण्याआधीच्या काळात लाईफबॉय हाच अंतिम पर्याय असं वाटायचं. ब्रिटिश अंमदानीत लाईफबॉय भारतात आला. पुढील काळात साबणात काबरेलिक अ‍ॅसिडवर बंदी आली. ज्या घटकामुळे लाईफबॉयला स्वत:चं वेगळं रूप मिळालं तोच घटक नेमका गायब झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या साबणाचा विलक्षण खप झाला. १९६२मध्ये टिपिकल लाल रंग सोडून पांढरा रंग आणि परफ्युमिक सुगंध असा प्रयोग ही करून पाहिला गेला. पण तो लाल रंग ही त्याची कायमची ओळख बनली. अमेरिकन मार्केटने लाईफबॉयला रामराम ठोकला असला तरी भारतासह बाकीच्या काही देशात तो आहे. युनिलिव्हरने काही काळानंतर ही कंपनी आपल्या ताब्यात घेतली.

आपत्ती काळातली लाईफबॉयची संवेदनशीलता वाखाणण्याजोगी आहे. १९४०मध्ये लंडनवर झालेल्या हवाई हल्लय़ानंतर लाईफबॉयने सार्वजनिक वापरासाठी मोफत सेवा देऊ  केली.  साबण, शॉवर आणि टॉवेल अशी स्वच्छतेची सोय ठिकठिकाणी करण्यात आली. तसंच २००४ मध्ये आलेल्या त्सुनामीच्या वेळी भारत, इंडोनेशिया, श्रीलंका या देशात लाईफबॉयने मदत केली.

आज आपण लाईफबॉय वापरत असू अथवा नसू पण लाईफबॉयचे जिंगल मनावर कोरले गेले आहे. विचार करा,  ‘तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफबॉय’ ही ओळ नुसती बोलता येईल का? नाहीच. तो ठेका ती चाल आपोआप ओठांवर येते. त्याच चालीने  लाईफबॉयला दुकानातील फळीवरून थेट न्हाणीघरात अढळ स्थान दिलं. लाईफबॉयने आपल्यातला बॉईशपणा जपला पण जोडीला सर्व थरांतील मंडळीना साद घालून पाहिली. काहींनी ती ऐकली, काहींनी नाकारली. आजही अनेक घरांमध्ये तो येतो की! बदलत्या काळात साबणाला हजार पर्याय निर्माण झाले. एकाच उत्पादनाला चिकटून राहणारा वर्ग कमी झाला. बाळांचा साबण, स्त्रियांचा साबण, आयुर्वेदिक साबण असे अनेक वर्ग झाल्यावर लाईफबॉय थोडा मागे पडला. तरीही काळानुरुप आता सॅनिटायजर, हँडवॉशच्या नव्या अवतारात जुन्याच विश्वासाने तो आपल्या स्वच्छतेची काळजी घ्यायला घरी येतोच. त्यात पूर्वीचा बॉइश रफटफनेस नाही, पण खात्री नक्कीच आहे.  कारण ‘लाईफबॉय है जहा तंदुरूस्ती है वहा.’ हे आपल्या डोक्यात फिट्ट आहे. आपल्या तंदुरुस्तीची १००हून अधिक र्वष काळजी घेणाऱ्या या मित्राचा विसर केवळ अशक्य!

viva@expressindia.com