X
X

मेसेज आला रे

आपल्या रोजच्या जीवनाचा इतका खास भाग ठरलेल्या या शब्दाचा उच्चार अचूक असावा, यात शंकाच नाही.

एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

सध्याच्या जगात अन्न, वस्त्र, निवारा यांच्या जोडीनेच मोबाइल ही गरज होऊन बसलेला एक मोठा वर्ग आहे आणि जिथे संवाद या मोबाइलच्या माध्यमातून अधिक तर रंगतो, तिथे या शब्दाचा वापर अनिवार्य ठरतो. हा शब्द म्हणजे मेसेज. वास्तविक इतक्या पटकन, सहज आपण या शब्दाशी परिचय करून घेतला आहे की, याची आणखी वेगळी ओळख का बरं पटकन घ्यावी, असा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे, पण अगदी निरक्षरांपासून ते पंडितांपर्यंत आणि एक-दोन वर्षांच्या बाळांपासून वयस्कर आजोबांपर्यंत सर्वव्यापी, असा मेसेज काहीदा उच्चारांतही तितकंच वैविध्य धारण करतो आणि म्हणूनच या शब्दाविषयी आवर्जून विचार करावासा वाटतो.

मॅसेज, म्यासेज, मेसेज असे विविध उच्चार आपल्या कानी पडतात. पण ‘मेसेज’ हा अचूक उच्चार कानी पक्का असल्याने बहुतांश वेळा चुकीच्या उच्चारांकडे आपण दुर्लक्षच करतो. मेसेज म्हणजे संदेश. पण संदेसे आते है, हा पक्का देशी शब्दप्रयोग गाण्यापुरताच राहतो आणि बोलीभाषेत इंग्रजी मेसेजच भाव खाऊन जातो. miss us या मूळ लॅटिन भाषेतील शब्दाने जुन्या फ्रेंच भाषेत स्थान मिळवले आणि तिथून तो इंग्रजीत आला.

वाढत्या मोबाइल वापराने हा मेसेज इतका अनिवार्य झाला आहे की, दिवसाच्या २४ तासांपकी झोपेचे तास वगळता मेसेजशी संबंध न येणारी फार थोडीच मंडळी उरली असावीत. सोशल मीडियावर active मंडळी महिन्याभरात साधारण ४००० मेसेजेस वाचतात, असंही एक सर्वेक्षण सांगतं. विशेष म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडे रात्री साडेदहा ते साडेअकरा हा या मेसेज देवाणघेवाणीचा peak hour असतो.

आपल्या रोजच्या जीवनाचा इतका खास भाग ठरलेल्या या शब्दाचा उच्चार अचूक असावा, यात शंकाच नाही. पण म्यासेज, मिसीज, मेसेज हे उच्चार कानी पडल्यावर इतक्या सोप्या शब्दाचाही उच्चार का बिघडत असावा बुवा, असा प्रश्न पडतो. तर त्यामागे एक तर शब्दाबद्दलचे अज्ञान किंवा खूपच कॉमन उच्चार थोडा हटके करण्याची हौस हीच दोन कारणं आढळतात.

शब्द आणि शब्दांचे उच्चार हे स्वत:च खरं तर एक संदेश असतात. आपल्या उच्चारातून समोरच्या व्यक्तीकडे एक मेसेज जात असतो. आपल्या भाषिक ज्ञानाबद्दल. आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल. त्यामुळे चुकीच्या उच्चाराचे नेटवर्क jam न होता आपल्याबद्दल योग्य आणि चांगलाच मेसेज समोरच्याला मिळणं याची काळजी घेणं अगदी उत्तम.

तुम्हाला अशा आणखी कुठल्या परकीय शब्दांच्या उच्चारांविषयी शंका आहे? कुठल्या शब्दाचा उच्चार बुचकळ्यात टाकतो आणि कुठल्या शब्दाचा उच्चार नेमका कुठला आणि का याचा प्रश्न पडतो. असे शब्द आमच्यापर्यंत पोचवा. व्हिवा शब्दसखाच्या माध्यमातून आपण मिळून यावर चर्चा करू. त्यासाठी व्हिवाच्या खाली नमूद केलेल्या इ मेल आयडीवर मेसेज करा आणि सब्जेक्टलाइनमध्ये शब्दसखा असा उल्लेख जरूर करा.

रश्मी वारंग- viva.loksatta@gmail.com

20

  • Tags: english-pronunciation, pronunciation,
  • Just Now!
    X