हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

लोकांची मानसिकता ओळखून गरज नसताना गरज निर्माण करून आपला ब्रॅण्ड खपवणं ही कला आहे. अशा चतुर उत्पादनांमध्ये ‘फेअर अँड लव्हली’चं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. असंख्य आशियाई देशांमधील बऱ्याच मंडळींना आपल्या रंगाबद्दल असलेल्या न्यूनगंडाचा आणि गोरं दिसण्याच्या प्रबळ इच्छेचा पुरेपूर फायदा घेऊन निर्माण झालेला हा ब्रॅण्ड आहे.

Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर
restaurant inside metro coach nmrc introduces unique metro coach restaurant at sector 137 station know seating capacity read all details
आता मेट्रोमध्ये करु शकता पार्टी अन् मीटिंग; ‘या’ ठिकाणी सुरू होतेय मेट्रो कोच रेस्टॉरंट
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती
BMW iX xDrive50 launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, नवी इलेक्ट्रिक SUV देशात दाखल, सिंगल चार्जमध्ये धावते ६३५ किमी, पण किंमत तर…

‘युनिलिव्हर’ कंपनीच्या संशोधन विभागातील मंडळींनी १९७३ मध्ये असं संशोधन केलं की व्हिटॅमिन बी ३ च्या योग्य प्रमाणामुळे चेहऱ्याचा रंग उजळू शकतो. त्यावर त्यांनी अधिक दोन र्वष संशोधन करून जे फेअरनेस क्रीम बनवलं, तेच हे ‘फेअर अँड लव्हली’. १९७५ मध्ये बाजारात आलेलं हे जगातील पहिलं फेअरनेस क्रीम.

आशियाई देशात या उत्पादनाला उत्तम प्रतिसाद अगदी सुरुवातीपासूनच मिळाला, कारण युनिलिव्हर कंपनीच्याच संशोधनानुसार नव्वद टक्के स्त्रियांना गोरं दिसणं हे वजन कमी करण्याइतकंच महत्त्वाचं वाटतं. गोरेपणा हा सौंदर्याचा निकष वाटणाऱ्या देशांत असं घाऊक आणि रेडीमेड सोल्युशन विकणं कठीण नसतंच. त्यामुळे फेअर अँड लव्हलीचा विस्तार वाढला यात आश्चर्य नाही. आज भारत, बांगलादेश, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, थायलंड, श्रीलंका, पाकिस्तान अशा ३० देशांमध्ये फेअर अँड लव्हली खपतं. भारतातील ऐंशी टक्के फेअरनेस क्रीम मार्केट याच ब्रॅण्डकडे आहे. १८ वर्षांवरील मंडळी या ब्रॅण्डचं टार्गेट असले तरी २१ ते ३५ वयोगटांतील मंडळी हा ब्रॅण्ड अधिक वापरतात.

१९८० पासूनच्या फेअर अँड लव्हलीच्या जाहिरातींत खूप बदल होत गेलेला दिसतो. ऐंशीच्या दशकातील जाहिरातींमध्ये ‘गोरी बायको पाहिजे’ या मानसिकतेचा विचार अधिक होता. जुही चावला अभिनीत जाहिरातीत पतीदेव तारीफ करताना म्हणायचे, ‘कितनी गोरी, कितनी प्यारी’. काळ बदलत गेला आणि गोरेपणा पलीकडे स्त्री सौंदर्याची व्याख्या बदलत गेली तसा फेअर अँड लव्हलीच्या जाहिरातीत पण बदल होत गेला. गोरेपणाचा संबंध आत्मविश्वासाशी जोडला गेला. मात्र ‘चांद का तुकडा’ होण्याची स्वप्न दाखवणं एकीकडे चालूच होतं. फक्त गोरेपणा उपयोगी नाही हे लक्षात आल्यावर अ‍ॅन्टी मार्क क्रीम, क्लिन्झिंग क्रीम, डेली ट्रीटमेंट अशा गोष्टींकडे फेअर अँड लव्हली वळलं. त्यात ‘हर दिन जिंदगी निखारे’चं आश्वासन होतं.

स्त्रियांच्या गोरेपणाकडून पुरुषांच्या गोरेपणाकडे वळत फेअर अँड लव्हली मेन्स क्रीम आलं. फेअर अँड लव्हली फेस वॉश आला. या ब्रॅण्डचा संपूर्ण कल नेहमी गोरं, सुंदर दिसणं याच गोष्टींकडे अधिकतर राहिला. दरम्यान मधल्या काळात काही सेलिब्रिटींनी या बाबतीत घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अभिनेता अभय देओल, नंदिता दास यांनी गोरेपणावरून सौंदर्याची कल्पना करण्यास केलेला विरोध, रणबीर कपूर, स्वरा भास्कर, सुशांत सिंह राजपूत यांसारख्या कलाकारांनी फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करण्यास दिलेला नकार खूप कौतुकास्पद आहे.

सुंदर, निरोगी त्वचा आणि गोरी कातडी यात खूप फरक आहे. काळाच्या ओघात सौंदर्य संकल्पना बदलत असूनही हा ब्रॅण्ड आज विलक्षण खपतो. फेअर अँड लव्हली लावल्यामुळे लख्ख गोरेपणा आल्याची नोंद कुठेही माहितीत नाही. मग फेअर अँड लव्हली काय करतं? तर ते क्रीमच्या माध्यमातून स्वप्न विकतं, आशा विकतं. काळ्या व्यक्तीला गोरं करण्याची आशा, गोऱ्या व्यक्तीला अधिक गोरं करण्याची आशा.

जोवर रंगाचा गोरेपणा हा सौंदर्याचा मापदंड राहणार तोवर फेअर अँड लव्हलीचे ब्रॅण्डमहात्म्य अढळ राहणार.