हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

रंग माणसाच्या आयुष्यात जे चैतन्य निर्माण करतात त्याला तोड नाही. हेच रंग कपडय़ांवर पसरून आपल्या मनाचा ताबा घेतात. आपली मनोवस्था अनेकदा कपडय़ांच्या रंगावरून अधोरेखित होते. अशा रंगीबेरंगी कपडय़ांच्या दुनियेतला शार्प, व्हायब्रंट कलर्सची उधळण करणारा ब्रॅण्ड म्हणजे ‘ग्लोबल देसी’.

Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
nilu phule son in law omkar thatte play role in Indrayani new serial
निळू फुलेंचे जावई झळकले लोकप्रिय मालिकेत, साकारतायत ‘ही’ महत्त्वाची भूमिका
madhuri dixit dances on amitabh bachchan rang barse song
Video : रंग बरसे भीगे चुनरवाली…; बिग बींच्या लोकप्रिय गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित, स्पर्धकांसह केला जबदरस्त डान्स
Ajith Kumar made biryani video viral
बाईकने रोड ट्रिपवर निघालाय सुप्रसिद्ध अभिनेता, कॅम्पमध्ये मित्रांसाठी बनवला खास पदार्थ, व्हिडीओ व्हायरल

अस्सल भारतीय कलाकारी, डिझाइन्स, रंग, पॅटर्न यामुळे स्त्रीवर्गाला एकाच वेळी आधुनिक आणि पारंपरिक अनुभव देणारा हा ब्रॅण्ड आहे. कुर्ती, घेरदार स्कर्ट्स, वनपीस ते भारतीयत्व दर्शवणारे कूल कॉटन टॉप हे सारं या ब्रॅण्डमध्ये सामावलंय. फॅशनच्या भाषेत बोलायचं तर हा बोहोचिक स्टाइलचा ब्रॅण्ड आहे. सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांच्या कल्पनेतून हा ब्रॅण्ड साकारलाय.

अनिता यांचा जन्म सिंधी परिवारात झाला. त्यांचं बरचसं बालपण आजी-आजोबांसोबत राजस्थानमध्ये गेलं. राजस्थानी बाजार, तिथले अत्यंत खुले लाल-पिवळे-हिरवे कपडय़ांचे रंग, कपडय़ांची स्टाईल याचा लहानपणापासून अनिता यांच्या मनावर गडद ठसा उमटला. एसएनडीटी महाविद्यालयातून फॅशन डिझायनिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर त्या फॅशनविश्वात सक्रिय झाल्या. दरम्यान, उद्योगपती प्रवीण डोंगरे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. १९९५मध्ये बहीण मीना सेहरा आणि भाऊ  मुकेश सावलानी यांच्या जोडीने अनिता यांनी स्वत:च्या फॅशन हाऊ सची स्थापना केली. सुप्रसिद्ध वेस्टर्न आऊटफिट ब्रॅण्ड ‘अ‍ॅण्ड’, एथनिक वेअर ‘ग्लोबल देसी’ आणि ब्रायडल वेअर ‘अनिता डोंगरे ब्रॅण्ड’ असे तीन ब्रॅण्ड यातून जन्माला आले. यामध्ये व्यावसायिक गणितांचा बराचसा भाग भावंडांवर सोपवून अनिता या तिन्ही ब्रॅण्डच्या डिझाइन्सकडे विशेष लक्ष देतात.

ग्लोबल देसी ब्रॅण्डचं एक खास वैशिष्टय़ अवश्य सांगावंसं वाटतं. महिला सबलीकरणाच्या समर्थक असणाऱ्या अनिता डोंगरे यांच्या मते ग्रामीण स्त्रियांचं आर्थिक सबलीकरण अत्यंत गरजेचं आहे. त्याकरिता त्यांनी स्वत:पासून सुरुवात करत मुंबई पासून दीडशे कि.मी.वर असलेलं एक गाव दत्तक घेतलं असून तिथल्या स्त्रियांना जुजबी शिवण, आयर्निग, पॅटर्न कटिंगचं प्रशिक्षण देऊन त्यांनी रोजगार देऊ  केला आहे. आज हा ब्रॅण्ड १४३ ‘ग्लोबल देसी’ स्टोअर रूम्स, आणि ४०५ मल्टी ब्रॅण्ड स्टोअर रूम्समध्ये उपलब्ध आहे. २०१३ ला मॉरिशसमध्ये या ब्रॅण्डने आपलं शोरूम उघडत परदेश प्रवेश केला. ७०० कोटींची उलाढाल हा ब्रॅण्ड करतो.

जगभरातून गुगलवर सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या इंडियन फॅशन डिझायनर्समध्ये अनिता डोंगरे यांचा क्रमांक वरचा आहे. भारतीय फॅशन जगतातील डिझायनर्सचे ब्रॅण्ड म्हणजे परवडण्या पलीकडील कपडे असं आपलं समीकरण असतं, पण ‘ग्लोबल देसी’ याला अपवाद म्हणता येईल. अत्यंत सुंदर रंगांची उधळण करणारे भारतीय डिझाईन्सचे पण आधुनिक पॅटर्नचे हे कपडे अनेकांना आपल्या वॉर्डरोबमध्ये आवर्जून ठेवावेसे वाटतात.

हा ब्रॅण्ड म्हणजे उत्तम फ्युजन आहे. ‘ग्लोबल देसी’ या नावातून ते प्रतीत होतंच शिवाय ‘ग्लोबल स्टाईल, इंडियन थ्रेड’ या टॅगलाइनमधूनही दिसतं. रंगांची उधळण करणारा रंगपंचमीचा माहौल एका दिवसाचा असला तरी वर्षभर तुम्हाला कलरफुल, चिअरफुल ठेवणारे काही ब्रॅण्ड असतात. ‘ग्लोबल देसी’ त्यांपैकीच एक.. आपल्यापैकी प्रत्येकाचा स्वत:चा असा एक रंग असतो.. हा ‘रंग माझा वेगळा’ जपणं महत्त्वाचं.. मग तो कपडय़ांचा असेल किंवा व्यक्तिमत्त्वाचा..

viva@expressindia.com