मे महिना म्हणजे लग्नसराईचा काळ. लग्न कितीही आधुनिक पद्धतीने करायचं ठरवलेलं असलं किंवा कुछ हटके असं म्हणत वेगळेपणा शोधायचा असला तरीही पारंपरिक कपडय़ांशिवाय लग्नाला मजा नाही. त्यातून मराठमोळी पैठणी तर लग्नाला हवीच. म्हणूनच पैठणी हा महाराष्ट्रातील सर्वच लहान-थोर स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय. पदरावचे सोनेरी मोर, आकर्षक रंगसंगती आणि ते वैशिष्टय़पूर्ण काठ ही पैठणीची ओळख. पैठणी म्हणजे साडय़ांची राणी. त्यामुळे लग्नात ती हवीच. हल्ली तर पैठणी खरेदी हा लग्नापूर्वीचा एक सोहळा होऊन बसला आहे.

पैठणीचं शाही रूप नजरेत भरतं हे खरं, पण या सुंदर साडीचे भाव ऐकून आपले डोळे पांढरेही होतात. तीन हजार ते तीन लाखांच्याही पुढे एवढय़ा रेंजमध्ये पैठणी विकली जाते. नेहमी आपल्या मनात विचार येतो की, ही साडी एवढी महाग का असते? सेमीपैठणी म्हणजे नेमकं काय? पैठणीच्या किमतीत एवढी तफावत का, खरी पैठणी कशी ओळखायची?  एवढे पैसे मोजायचे म्हणजे ओरिजनल साडी मिळेलच याची खात्री काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपली लाडकी पैठणी कशी तयार होते हे समजून घेतल्यावर आपलं आपल्यालाच नक्की कळेल. याविषयी येवल्याच्या मास्टर कारागीर विनायक ठाकूर यांनी ‘व्हिवा’ला माहिती दिली.

not a single word about Sharad Pawar in pm narendra modis speech in wardha
मोदींच्या भाषणात शरद पवारांबाबत चकार शब्द नाही, काय असावे कारण…
Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
uddhav thackeray and kangana
“भाजपाई कंगनाने तिचे अगाध ज्ञान पाजळून इतिहासाची…”, ठाकरे गटाचा टोला
political parties candidates celebrated rang panchami
रंग जल्लोष रामाचा अन् प्रणितीचा..

पारंपरिक पैठणीवर मोराची नक्षी असते, पण आताच्या काळात फुलं- पानांची, कोयऱ्यांची डिझाइन्सदेखील असतात. पोल्का डॉट्सचं डिझाइन हल्ली पैठणीतही दिसू लागलं आहे. पैठणीचे पारंपरिक रंग गडद असतात. पैठणी रंग म्हणजे मजेण्टा. याशिवाय निळा, मोरपंखी, वांगी, चिंतामणी, पिवळा, मोतिया, हिरवा, कुसुंबी हे पैठणीचे पारंपरिक रंग आहेत. चंद्रकला म्हणजे काळा रंग, नीलिगुंजी म्हणजे निळा रंग अशी काही रंगांवरून पैठणीला मिळालेली स्थानिक नावं प्रसिद्ध आहेत. सध्याच्या काळात पैठणी या पारंपरिक रंगांव्यतिरिक्त इतर रंगांमध्येही बााजारात येऊ  लागली आहे. लग्नसराईच्या हंगामात मुंबईत  पारंपरिक रंगांना आणि मोटिफ्सनाच पसंती दिली जाते, अशी माहिती निलेश नागपुरे यांनी दिली. ‘आम्ही येवल्यावरून पैठणी तयार करून  घेतो. हातमागावरच्या अस्सल पैठणीला मागणी आहे. यंत्रमागावर विणलेल्या साडय़ा जास्त काळ टिकत नाहीत, या उलट हातमागवरच्या साडय़ा वर्षांनुवर्षे टिकतात’, असं नागपुरे यांनी सांगितलं.

पैठणी महाग का?

  • खरी पैठणी हातमागावर बनवली जाते.
  • हातमागावरची साडी म्हणजे धागान् धागा हातमागावर विणलेला असला पाहिजे. अशी साडी तयार व्हायला सहा महिन्यांपासून ते कधी कधी १८ महिन्यांपर्यंतदेखील वेळ लागू शकतो.
  • पैठणीतलं काम बारीक असेल तर, दिवसातले बारा तास काम केल्यावर फक्त ०.५० सेंटीमीटर ते ०.७५ सेंटीमीटर एवढं डिझाइन विणलं जातं. पैठणीचा पदरच सर्वसाधारणत दहा ते तीस इंचांचा असतो, म्हणजे साडी विणायला किती वेळ लागेल याचा अंदाज येईल.
  • पूर्वीच्या काळी पारंपरिक पैठणीवर खऱ्या सोन्याची जर वापरली जायची. चांदीचा वापरही पैठणी विणताना केला जात असे. पण आता मात्र खऱ्या सोन्याच्या किंवा चांदीच्या तारा वापरल्या जात नाहीत.
  • अजूनही खास मागणी असेल तर खऱ्या सोन्याच्या- चांदीच्या पैठण्या तयार करून दिल्या जातात, पण त्यांची संख्या फारच कमी असते.
  • हातमागावर विणलेल्या पैठणीची किंमत चार- चाडेचार हजारांपासून ते सहा लाखांपर्यंत आहे. नक्षीकाम कसं, मोर किती मोठे, मोरांची संख्या, रेशीम कुठलं यानुसार हे दर बदलतात.

खरी पैठणी ओळखायची कशी?

  • खरी पैठणी आणि सेमीपैठणीमधला फरक साडी उलटी करून बघताना समजू शकतो.
  • पैठणीवरचं जरीचं विणकाम, मोर, नक्षीकाम उलट बाजूने बघताना मशीनवर केलेलं विणकाम वेगळं दिसतं. हातमागावर विणलेली साडी उलटय़ा बाजूनेही वेगळी दिसत नाही.
  • हातमागावर विणलेल्या साडीची बॉर्डर पुढून मागून दोन्ही बाजूने सारखीच दिसते, तर सेमीपैठणीमध्ये मागच्या बाजूला जाळी दिसते.
  • कधी संपूर्ण पैठणी हातमागावर- त्यातही प्लेन लूमवर विणली जाते तर, कधी कधी साडीची बॉर्डर डॉब्बी लूमवर विणली जाते.

माहिती सौजन्य : विनायक ठाकूर, येवला ; निलेश नागपुरे, दादर

viva@expressindia.com