हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

‘चेंज इज द इसेन्स ऑफ लाइफ’. बदल घडत असतात, नव्या गोष्टी येत राहतात पण त्याच वेळी काही जुन्यांची सोबत आपल्याला हवीशी वाटते जसा की आपला ब्रॅण्डनामा. या नव्या वर्षांतही तो तुमची सोबत करणार आहे पण थोडय़ाशा बदलांसह. फरक इतकाच की, सोबतीला असतील खास इंटरनॅशनल ब्रॅण्ड्स. जे ब्रॅण्ड वस्तुरूपात न राहता स्वप्न होऊन जातात, असा इंटरनॅशनल ब्रॅण्ड म्हणजे नायकी. खेळाडू आणि फिटनेस प्रेमींचा हा लाडका ब्रॅण्ड कसा साकारला त्याची ही कथा.

How to remove Bad Smell From Dustbin with the help of five rupees
फक्त पाच रुपयांचा बेकिंग सोडा गायब करेन कचरापेटीतील दुर्गंधी, पाहा VIDEO
desi jugaad video man prepare solar bike with 200 km range harsh goenka share video
ना पेट्रोल, ना वीज! तरुणाने जुगाडद्वारे बनवली ७ सीटर सोलर बाईक; VIDEO पाहून हर्ष गोयंका अवाक्, म्हणाले, क्या होगा उनका?
Viral Video Artist Made flight attendant signature into stunning Couple sketch After See You Will Shock
जबरदस्त! स्वाक्षरीने चित्र रेखाटणारा ‘अनोखा’ कलाकार; VIDEO पाहून कराल सलाम
this is true love old couple eating in one plate
याला म्हणतात खरं प्रेम! एका ताटात जेवणाऱ्या आजी-आजोबांचा व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावूक

अमेरिकेतील पोर्टलंड शहरात राहणारा धावपटू फील नाइट हा एक उद्योगी तरुण होता. तिथल्याच विद्यापीठात कोच म्हणून कार्यरत बिल बॉवरमन यांचा हा शिष्य. अनेक धावपटू, खेळाडू घडवणारे बॉवरमन आपल्या विद्यार्थ्यांच्या खेळात अधिक सुधारणा करतील, खेळाची गती वाढवतील, असे शूज बनवण्याचे प्रयोग फावल्या वेळात करत असत. मात्र त्यांना फारसं यश प्राप्त झालं नाही. त्या काळी जर्मन कंपनीच्या अ‍ॅथलीट शूजचा दबदबा विलक्षण होता. मात्र फील नाइटने एका जपानी कंपनीचे शूज हे खेळाडूंसाठी त्याहून अधिक उपयुक्त आहेत हे विद्यापीठाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी ठरला. त्यानंतर फीलने स्वत:च ते जपानी शूज आयात करून विक्री करायचे ठरवले. बॉवरमन यांनासुद्धा ही कल्पना पटली आणि १९६४ च्या जानेवारी महिन्यात त्यांनी दोघांनी भागिदारीत ब्लू रिबन स्पोर्ट्सची स्थापना केली. या कंपनीमार्फत शूजची स्थानिक भागात चांगली विक्री होत होती. त्यानंतर मधल्या काळात दोघांनी अधिक मेहनत घेऊन, तज्ज्ञमंडळी नेमून स्वत: शूजची निर्मिती केली. हे शूज कोणत्याही खेळाडूच्या सर्व गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले होते. १९७१ साली हे स्वत:चं फूटवेअर त्यांनी बाजारात आणलं आणि नाव दिलं ‘नायकी.’ नायकी म्हणजे ग्रीक संस्कृतीमधील विजय देवता. खेळाडूंच्या पदरात घवघवीत यशाची माळा घालण्यासाठी हा शू ब्रॅण्ड तयार झाला. १९७९ साली नायकीने एअर टेक्नॉलॉजी वापरुन शूज तयार केले आणि धावत्या, खेळत्या पायांना अधिक गती मिळाली.

‘नायकी’च्या निर्मितीसोबतच ते ‘स्वुश’ चिन्ह ब्रॅण्ड्सोबत जोडलं गेलं. स्वुश हे ध्वनिचिन्ह आहे. आपल्या जवळून झर्रकन एखादी गोष्ट जाणं यासाठीचा आवाज म्हणजे ‘स्वुश’.  हा आवाज गती, जलदपणाचं प्रतीक आहे. तेच नायकीच्या लोगोतून दिसतं. नायकीची पहिली टॅगलाइन होती, ‘देअर इज नो फिनिश लाइन.’ १९८८ साली ती बदलून ‘जस्ट डू इट’ अशी करण्यात आली. जगातील सर्वात लोकप्रिय लोगो आणि टॅगलाइनमध्ये नायकीचा समावेश होतो. दरवर्षी हा ब्रॅण्ड नवनव्या श्रेणी घेऊन त्याच्या ग्राहकांसमोर येतो. त्यापैकी २००० साली आलेली नायकी शॉक्स विशेष गाजली.

आज टेनिस, बेसबॉल, सॉकर, क्रिकेट, गोल्फ, अ‍ॅथलेटिक्स अशा अनेकविध खेळांमध्ये नायकी फुटवेअरचा दबदबा आहे. मात्र सुरुवातीला या ब्रॅण्डला खेळविश्वात लोकप्रिय करण्याचं श्रेय जातं, सुप्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डनला. तो या ब्रॅण्डचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनला आणि या ब्रॅण्डची लोकप्रियता वाढत गेली. गोल्फपटू टायगर वुड्समुळे ती द्विगुणित झाली. आज फुटबॉलमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो, टेनिससाठी रॉजर फेडरर आणि राफेल नदाल अशी मंडळी नायकीचा प्रचार करतात. २०१७ मध्ये नायकीचा विस्तार २९.६ अब्ज इतका होता. आज नायकी ब्रॅण्ड फक्त फुटवेअर पुरता मर्यादित नाही. खेळाशी निगडित विविध प्रकारचे साहित्य हा ब्रॅण्ड विकतो. जगातील प्रभावशाली ब्रॅण्डमध्ये त्याचा समावेश होतो.

चांगल्याच्या मागे अनेक जण धावतात पण सर्वोत्तमाचा ध्यास घेणारी मंडळी जेव्हा त्यासाठी झपाटून जातात तेव्हा ‘नायकी’सारखा ब्रॅण्ड जन्माला येतो. गुरू-शिष्याच्या मेहनतीतून जन्माला आलेला हा ब्रॅण्ड प्रत्येक खेळाडूला, फिटनेसप्रेमीला हेच सांगतो.

तेरी तो बाहें पतवार,

कदम हैं तेरे हाहाकार

तेरी नस नस लोहातार,

तू है आग

ओ बस तू भाग.

जस्ट डू इट.

viva@expressindia.com