केवळ चवीची भूक भागवणाऱ्या मुंबई-पुण्यासारख्या शहरांतील या खाऊगल्ल्या तरुणाईसाठी म्हणून तब्येतीचं हेल्दीमानलं जाणारं खाणंही पुरवतायेत. स्ट्रीक्टडाएट फॉलो करणाऱ्या तरुणाईसाठी आता स्ट्रीटडाएटही दिमाखात उभं राहिलं आहे.

हल्ली मुंबईच्या रस्त्यारस्त्यांवर, गल्लीत असंख्य खाऊ अड्डे आहेत. प्रत्येकाची खासियत वेगळी. त्यामुळे कोणी त्यावर तुटून पडलं नाही तरच नवल! दिवसभरात कधीही पण संध्याकाळी अंमळ जास्तच खवय्यांची गर्दी या खाऊ गल्लीत असते. सकाळी तशी ही खाऊ गल्ली बऱ्यापैकी सामसूम असते असं आपल्याला वाटतं, परंतु आजकाल सकाळीदेखील रस्त्यावर एक स्टॉल टाकून उभे असलेले काका दिसतील. त्यांच्याजवळ वडापाव, बुरजीपाव, समोसा असले एकही पदार्थ नसतात, पण चक्क तुमच्या डाएट फूडसाठी अनेक पर्याय तुम्हाला त्यांच्याकडे मिळतील. केवळ चवीची भूक भागवणाऱ्या मुंबई-पुण्यासारख्या शहरांतील या खाऊगल्ल्या तरुणाईसाठी म्हणून तब्येतीचं ‘हेल्दी’ मानलं जाणारं खाणंही पुरवतायेत. ‘स्ट्रीक्ट’ डाएट फॉलो करणाऱ्या तरुणाईसाठी आता ‘स्ट्रीट’ डाएटही दिमाखात उभं राहिलं आहे.

Organizing an international conference on Dr Babasaheb Ambedkar in london
लंडनमध्ये आज आंतरराष्ट्रीय परिषद; शाश्वत, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. आंबेडकर
Electric Cycle
Doodleची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला एम एस धोनी, व्हिडीओ झाला व्हायरल
Sachin Tendulkar Investment
‘आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स’ महाराष्ट्रात पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार, सचिन तेंडुलकरचाही सहभाग!
fire broke out in vasai industrial estate
वस‌ईच्या औद्योगिक वसाहतीत भीषण आग; औद्योगिक कचऱ्यामुळे आग लागल्याचा शक्यता

डाएट फूडचे स्टॉल हल्ली कॉलेजच्या गेटपासून, जॉगिंग पार्क, आपल्याकडे मरिन ड्राइव्ह ते शिवाजी पार्कपर्यंत सगळीकडे सकाळी आपले बस्तान मांडून असतात. रोज मॉर्निग वॉकला येणाऱ्या मुला-मुलींपासून सगळेच या ‘स्ट्रीट डाएट फूड’ची रोजची ग्राहक मंडळी झाली आहेत. मुंबईत डाएट कॉन्शस मंडळी आपलं वजन कमी करण्यासाठी धडपडत असतात पण डाएट फूड सहजासहजी मिळत नाही. मग सहजपणे जे मिळेल तो पर्याय निवडावा लागतो मात्र या नव्या स्टॉल्सनी खाण्याची मजा आणि वजनावर नियंत्रण ठेवणं या दोन्ही गोष्टी तरुणाईसाठी सहजसाध्य केल्या असल्याने स्ट्रीट डाएट फूडचा विस्तार सध्या वेगाने होतो आहे.

सकाळी कोणत्या पदार्थापासून सुरुवात करायची याचा सल्ला डाएटिशनकडून घेण्याची गरज असते. आपल्यासाठी नेमकं कोणतं डाएट फूड घेतलं पाहिजे, कोणतं नको हे आपल्याला सहजी लक्षात येत नाही. पण गंमत म्हणजे या स्टॉल्सवर सकाळी जॉगिंग करून आल्यापासून ते नाश्त्यापर्यंत डाएट फूडचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मरिन ड्राइव्हजवळ विनय यांचा असाच डाएट फूड स्टॉल आहे. त्यांच्याकडे डाएटसाठी ज्यूस व सूपचे वेगवेगळे प्रकार मिळतात. मॉर्निग वॉकला येणाऱ्या मुलामुलींची संख्या आमच्या स्टॉलवर जास्त असते, असं विनय सांगतो. त्यातही मुलींची संख्या जास्त आहे. ज्यूसपेक्षा मुलींची मागणी सूपसाठी जास्त असते, अशी माहिती त्याने दिली. लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरातील जॉगर्स पार्क जवळही ही मंडळी असतात. वेगवेगळ्या पद्धतीची प्रोटीनयुक्त ज्यूस, सूप आणि सॅलड्स त्यांच्याकडे मिळतात. इकडे येणाऱ्या सर्वानाच सकाळी ज्यूस पिणं जास्त आवडतं. इथे साधारणपणे रोज न चुकता येणारे दहा ते बारा जण आमचे ग्राहक आहेत, असं लोखंडवाला इथल्या जोगेश या विक्रेत्याने सांगितलं.

डाएटिशन अश्विनी कानडे यांच्या मते, ‘हल्ली सगळ्यांनाच कमीतकमी वेळात आणि परिश्रमात डाएट फूड हवं असतं. इतर पदार्थ खाण्यापेक्षा रस्त्यावर डाएट फूड उपलब्ध असेल तर साहिजकच तिथे लोकांचं लक्ष जातं. त्याचाच फायदा घेत स्ट्रीट डाएट फूडचं प्रमाण वाढलं आहे. हे स्ट्रीट डाएट फूड विक्रेते फक्त सकाळीच असतात. जिथे तरुण किंवा इतर लोकही जॉगिंगला जास्त येतात तिथे हे स्टॉल्स उभे करतात. कधीकधी फूड ट्रकसारखी त्यांची गाडीही फिरते, जिथे लोक वॉकला जास्त जातात अशा ठिकाणी ते सगळीकडे फिरतात. पहाटे पाच वाजल्यापासून तर कधी चार वाजल्यापासूनच ही मंडळी तयार असतात’. या विक्रेत्यांकडे मुला-मुलींची गर्दी जास्त असली तरी सगळ्याच वयोगटातील लोकांना खाता येतील, असे पदार्थ विचारपूर्वक या स्टॉल्सवर ठेवलेले पहायला मिळतात. कुठला पदार्थ पौष्टिक आहे किंवा जड आहे याची पूर्णत: माहिती काढून त्यातून काही निवडक पदार्थ वेगळ्या पद्धतीने काढून ठेवले जातात. उदाहरणार्थ कारल्याचं सूप. मधुमेही पेशंट्सनाही हे सूप उत्तम आहे. तसंच इतर लोकही पौष्टिक म्हणून ते घेणं पसंत करतात. मूग, टोमॅटो सूप, तुळस, आलं, कोकम, गाजर, कारलं असे वेगवेगळे पर्याय ज्यूसमध्ये असल्याने त्यांचा कमी किमतीत इतर ग्राहकांना चांगलाच फायदा होतो. त्यामुळे या डाएट फूडची क्रेझ हळूहळू वाढत चालली आहे हे नाकारता येणार नाही, असं कानडे सांगतात.

डाएट प्लॅन पूर्ण दिवस करत असल्याने ऑफिसवाल्यांसाठीसुद्धा असं स्ट्रीट डाएट फूड कुठे उपलब्ध असतं का, असा प्रश्नही पडेल पण ऑफिसमध्ये काम करणारी सगळीच तरुण मंडळी ही फूड स्टार्ट अप असणाऱ्यांकडून डाएट प्लॅनचा सल्ला घेतात आणि त्यांच्याकडून ते बाहेरून मागवतात. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये डाएट फूड प्लॅनर गगन वर्मा यांनी सांगितलं की स्ट्रीट डाएट फूडचं प्रमाण वाढतंय. याचं कारण अनेकांचा सकाळचा नाश्ता हा या स्ट्रीट डाएटवर अवलंबून असतो. रस्त्यावर जे डाएट पदार्थ मिळतात ते आमच्याकडे मिळत नाहीत. मग कित्येकदा सकाळचं डाएट फूड रस्त्यावर जे स्टॉल्स असतात तिथून घेतलं जातं. आणि मग दुपारचं जेवण आमच्याकडून मागवलं जातं. अनेकदा सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण या सगळ्या गोष्टी डाएट प्लॅनप्रमाणे आहेत की नाही हे तपासून कुठून कधी काय मागवायचं हेही ठरवलं जातं, असं वर्मा यांनी सांगितलं.

मुंबईप्रमाणे पुण्यातही असे स्ट्रीट डाएट फूडचे स्टॉल उभे राहिले आहेत. पुण्याच्या फग्र्युसन रोडवर जो तरुणांचा अगदी आवडीचा कट्टा आहे तिथे ही विशेषत: ज्यूसचे व सॅलडचे स्टॉल आहेत. कर्वेनगरला पटवर्धन बागेजवळ येणाऱ्या जॉर्गससाठी तिथे विविध ज्यूसचे पदार्थ मिळतात. ‘मी गेली दोन र्वष सकाळी जॉगिंग करते. मला नेहमीच डाएट करण्यासाठी एक हलकंफुलकं व कमी किमतीत आरामात खातापिता येईल असं काही तरी हवं असतं. साधारण दोन तास वॉक केल्याने माझ्या डाएट प्रमाणे मला एक तर ज्यूस घेणं भाग असतं. इथे बरेच फ्रुट ज्यूसेस जे माझ्या डाएट प्लॅनप्रमाणे होते ते मला मिळतात, असं पुण्याच्या मुग्धा जोशीने सांगितलं. पुण्यात बऱ्याच ठिकाणा सूपचे स्टॉल्सही सुरू झाले आहेत. मुंबईचा आमोल सांगतो, ‘मी काही महिन्यांपूर्वीच या डाएट फूडबद्दल एका मित्राकडून ऐकलं त्यामुळे मी मॉर्निग वॉकला जाताना मरिन ड्राइव्हवर मित्रासोबत आलं-तुळशीचा ज्यूस प्यायलो. खरं तर तो ज्यूस मला इतका आवडला की इतरत्र जाऊन ग्रीन टी, मूझपेक्षा याची टेस्ट आवडली. स्वस्त आणि मस्त या हिशेबाने रोज आम्ही विनयकडे जातो. त्यामुळे सोबत एखादी ज्यूसची बॉटल घेण्यापेक्षा इथे येऊन ताजा ज्यूस प्यायला जास्त आवडतं. आम्ही इथं येणं पसंत करतो.

स्ट्रीट डाएट फूड हा आता परवलीचा शब्द होतो आहे. तरुण मुलांमुलींच्या मनातली जंक फूडची जागा मोकळेपणाने डाएट फूडने घेतली आहे. डाएटबद्दल एकंदरीतच जागृती वाढत चालली असल्याने मला काय खायचंच, किती खायचयं व कुठे खायचंय असं सर्व ठरवून सकाळी मनापासून वजन कमी करण्यासाल्ली येणारी मंडळी या स्ट्रीट डाएट फूडला भेट देतात.

तरुणांमध्ये जागरूकता – डाएट फूडचा प्रभाव हा जास्त तरुण पिढीत आहे कारण आपल्या दिसण्याविषयी आजची तरुण पिढी ही जास्त जागरूक असते त्यामुळे रोज मॉर्निग वॉकला जाताना हव्या असणाऱ्या डाएट फूडसाठी रस्त्यावरचे डाएट फूडही ते पसंत करतात. स्वस्तात मिळणारं फूड ही जशी एक बाजू आहे तसंच सोशल मीडियाच्या प्रभावामुळे महागडय़ा डाएट फूड पार्लरमधून पदार्थ विकत घेऊन ते पोस्ट करणं जास्त स्टेटसचंही मानणारे अनेक जण आहेत. सध्याच्या तरुणांमध्ये ‘डाएट’ हा परवलीचा शब्द झाला आहे. त्यामुळे जितकी पसंती महागडय़ा डाएट फूडला आहे तितकीच ती स्ट्रीट डाएट फूडलाही आहे. दोन्हीचं कारण तरुणाईतली आपल्या फिटनेस व दिसण्याविषयीची जागरूकता हेच आहे, असं मत डाएटिशन अश्विनी कानडे यांनी व्यक्त केलं.

स्ट्रीटवरचे डाएट – आज वजन कमी करण्यासाल्ली रस्त्यारस्त्यावर मिळणाऱ्या डाएट फूडमध्ये नक्की काय काय पर्याय असतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. या स्ट्रीट डाएट फूडमध्ये, इडली सांबार, डोसा, स्टिम मोमोज, गाजर, पालक, ड्रमस्टिक ज्यूस, सोया, मूग, कचोरी, प्रोटीन सॅलड, इत्यादी पदार्थ प्रसिद्ध आहे. या सर्वात कॅलरीचे प्रमाण कमी असते उदा. ताकात ६० कॅ लरी असतात तर लस्सीत ६६ कॅ लरी. लिंबू पिळलेल्या सॅलडमध्ये १०० तर एक प्लेट कलिंगडमध्ये २०० कॅलरी. खरं तर या स्ट्रीट डाएटमुळे घरच्या ताज्या पदार्थाकडे आपण दुर्लक्ष करतो याकडेही कानडे यांनी लक्ष वेधले. फ्रुट ज्यूसमध्ये टाकलेले इतर घटक पदार्थ आपल्या आरोग्यासाठी कितपत चांगले आहेत याची माहिती आपल्याला नसते. त्यामुळे बाहेर मिळणाऱ्या आवळ्याच्या ज्यूसपेक्षा एखादा आवळा खाल्लेला कधीही उत्तमच, असं त्या म्हणतात.

viva@expressindia.com