हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

वेळ कसा सरतो कळतंच नाही. नववर्षांचं कौतुक करता करता ते कधी संपायला आलं हे जाणवतंच नाही. पण आपल्या नकळत आपल्या प्रत्येक क्षणाचा सेकंदाचा हिशोब कुणी तरी ठेवत असतं. आपल्या वेळेवर ‘वॉच’ ठेवणाऱ्या घडय़ाळांमधला विश्वसनीय आणि सहज उपलब्ध ब्रॅण्ड म्हणजे टायटन.

Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
Use Apps to Manage Electricity Use and Reduce Bills During Summer Heatwaves
भरमसाठ वीज देयक येते का? ‘हे’ करा मग येईल वीज वापराचा अंदाज…

टाटा या जगप्रसिद्ध कंपनीने तामिळनाडू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (टिडको) या तामिळनाडू सरकारच्या उपक्रमाशी हातमिळवणी करीत हा ब्रॅण्ड आणला. १९८७ मध्ये सुरू झालेला म्हणजे तुलनेनं अलीकडचाच हा ब्रॅण्ड आहे. ‘टाटा’ या विश्वसनीय उद्योगसमूहामुळे ग्राहकांनी अल्पावधीत या ब्रॅण्डला पसंती दिली. वर्षांनुर्वष आकर्षक डिझाइन्स आणि नवनव्या कल्पना यांचं श्रेयही टायटनला द्यावं लागेल. अमेरिकन टायमेक्स कंपनीसोबतचं संघटन असो किंवा खास तरुणाईसाठी २००५ मध्ये आणलेला फास्टट्रॅक ब्रॅण्ड असो किंवा टायटन रागा, टायटन स्पेक्ट्रा, सोनाटा श्रेणी असो, टायटनने नेहमीच ग्राहकांचा विश्वास संपादित केला. टायटन वॉचेस लिमिटेडचं १९९३ मध्ये टायटन इंडस्ट्रीजमध्ये रूपांतर झालं. घडय़ाळांकडून अनेकविध उत्पादनांकडे टायटन वळलं. त्यात तनिष्कसारखा ज्वेलरी ब्रॅण्ड येतो. टायटन आयप्लससारखं आयकेअर येतं आणि टायटन सुगंधी स्प्रे येतात. या नव्या क्षेत्रातही टायटनने चमकदार कामगिरी बजावलेली दिसते.

टायटनच्या यशात टायटन टय़ूनचा आणि जाहिरातींचा वाटा मोठा आहे. आमिर खानच्या जाहिराती ज्यांना आठवत असतील ते नक्कीच हे मान्य करतील. या जाहिरातींतून टायटनने वरचा क्लास अधोरेखित करताना सर्वसामान्यांना परवडतील अशा घडय़ाळांची ग्वाहीही दिली. फोब्र्जसारख्या मासिकाने टायटनला २०१३ मध्ये फॅब ५० ब्रॅण्डमध्ये समाविष्ट केलं ते याचसाठी. क्लासेसपासून मासेसपर्यंत सर्वासाठी हा ब्रॅण्ड उपलब्ध आहे. टायटनच्या वेगवेगळ्या श्रेणींच्या टॅगलाइन वेगवेगळ्या आहेत. टायटन. बी मोअर असं म्हणताना फास्टट्रॅक मात्र तरुणाईला साद घालत म्हणतं ‘मूव्ह ऑन’.

आणि ते खरंही आहे. नव्या क्षणासोबत, नव्या वर्षांसोबत आपणही पुढे सरकतोच की! त्याच वेळी मागेही वळून पाहतो. ‘ब्रॅण्डनामा’ सदरात मागे वळून पाहताना काय दिसतं? खूप साऱ्या ब्रॅण्ड्सची रांग तर दिसतेच, पण जोडीला अनुभवता येते, तो ब्रॅण्ड उभा करताना त्या मंडळींनी घेतलेली अपार मेहनत, स्वत:वर ठेवलेला विश्वास आणि कल्पकता. त्या जोडीला तुम्हा वाचकांची पत्रंही इथे आवर्जून नमूद करावी लागतील. किती तरी नवे ब्रॅण्ड तुम्ही सुचवले. त्या ब्रॅण्डसोबत असलेल्या आठवणी वाटून घेतल्या. त्यामुळे हा ब्रॅण्डनामा अधिक ठसठशीत झाला. हे वर्ष सरतंय. पण सरत्या वर्षांला निरोप देत थोडय़ा बदलांसह ब्रॅण्डनामा तुमची सोबत करणार आहे. सरकत्या काटय़ासोबत येणारं नववर्ष तुम्हाला खूप आनंददायी जावो या मनापासून शुभेच्छा! नव्या वर्षांत अवश्य भेटू या..!

viva@expressindia.com