हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

आवश्यक, अत्यावश्यक, अनावश्यक, प्रतिष्ठेचे, विश्वासार्ह असे ब्रॅण्ड्सचे ढोबळमानाने प्रकार मानले तर त्यात अजून एक उपप्रकार म्हणजे गरजेच्या वेळी जवळ नसल्यास ज्यांचं महत्त्व ठसठशीतपणे जाणवतं असे ब्रॅण्ड्स. झंडू बाम हा या वर्गात मोडणारा ठरावा. गरज पडली की हवाच या वर्गात मोडणाऱ्या या बामला दीर्घ परंपरा आहे. गुणधर्मापासून ते नावापर्यंत खास वैशिष्टय़ं बाळगणाऱ्या आणि नाव उच्चारताच अनेक वर्षांची जिंगल ते सुप्रसिद्ध आयटम साँग यांची आठवण करून देणाऱ्या या ब्रॅण्डची ही कहाणी.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
Video Of Baby Turtles Making Their First Voyage Will Give You Goosebumps
Video : डायनासोरच्या काळापासून अस्तित्वात आहे ही कासवांची प्रजाती, चिमुकल्या कासवांचा पहिला समुद्र प्रवास एकदा बघाच

काही ब्रॅण्ड्स पूर्णपणे गुगली असतात. त्यांच्या नावावरून आपण विशिष्ट कल्पना केलेली असते आणि प्रत्यक्षात काही तरी वेगळंच प्रत्ययाला येतं. झंडू या नावाचा झेंडू फुलाशी संबंध असावा अशी अनेकांची धारणा असते जी पूर्ण चुकीची आहे. या नावाची कहाणी महात्मा झंडू भट्टजी यांच्याशी जोडली गेली आहे. करुणाशंकर हे त्यांचं मूळ नाव. वैद्य विठ्ठल भट्टजी यांचा हा सुपुत्र. जामनगरचा राजा रणमल याचे राजवैद्य होते, विठ्ठल भट्टजी. रोगनिदान करण्यात तज्ज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांनी अनेक उत्तम शिष्य आपल्या हातून घडवले.

झंडू भट्टजी त्यांच्याकडूनच आयुर्वेद शिकले. पुढे जामनगरचे महाराज जामसाहेब हे झंडू भट्टजी यांच्या ज्ञानावर प्रसन्न झाले आणि गुजरातमधील रंगमती नदीच्या तीराजवळील जमिनीचा एक तुकडा त्यांनी झंडू भट्टजींना औषधनिर्मितीसाठी बहाल केला. पुढे १८६४ मध्ये झंडू भट्टजींनी आपली आयुर्वेद रसशाळा स्थापन केली आणि झंडू ब्रॅण्डचा जन्म झाला. असा हा १५४ वर्षांचा इतिहास या ब्रॅण्डच्या मागे आहे, मात्र एक उद्योगसमूह म्हणून झंडू कंपनी कशी विकसित झाली ते जाणणेही तितकेच आवश्यक आहे.

रसशाळेच्या स्थापनेनंतर झंडू भट्टजींनी अत्यंत कुशल वैद्य मंडळींना हाताशी धरून काही औषधं तयार केली. या औषधांचे प्रमाण आणि मात्रा अचूक होती. आयुर्वेदाचे पारंपरिक ज्ञान त्यामागे होते. पण या उद्योगाचा कळस झंडू भट्टजींचे नातू जुगतराम वैद्य यांनी रचला. जुगतराम रसायन आणि भौतिकशास्त्रात हुशार होते. ब्रिटिश अमदानीत राजकोटमधील प्रोफेसर ली यांच्या केमिकल लॅबमध्ये काम करताना आपली स्वत:ची आयुर्वेदिक फार्मास्युटिकल कंपनी स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले. चरक, सुश्रुत, सारंगधर यांच्या पुस्तकांचा, भषज्यरत्नावली या ग्रंथाचा आधार घेऊन आधुनिक तंत्रज्ञानामार्फत आयुर्वेदिक औषधे निर्माण करण्याचा विचार त्यांनी केला आणि १९१० साली ऑक्टोबर महिन्यात झंडू फार्मास्युटिकल वर्क्‍सची स्थापना झाली.

रसशाळेला प्राप्त असलेली दीर्घ परंपरा लक्षात घेऊन या औषधांना सुरुवातीपासूनच उदंड प्रतिसाद मिळाला. औषधांना इतकी मागणी होती की या उद्योगात तातडीने भांडवल गुंतवणूक अनिवार्य होऊन बसली. मग १० डिसेंबर १९१९ मध्ये झंडू प्रायव्हेट फर्मचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत झाले. १९३६पासून आयुर्वेदिक औषधांसोबत अ‍ॅलोपेथिक औषधांची निर्मिती सुरू झाली. आधुनिक तंत्रज्ञान आणि अचूक तांत्रिक नियंत्रण हे या निर्मितीचं वैशिष्टय़ं होतं. गोळ्या,औषधं यांचं मोठय़ा प्रमाणावर उत्पादन सुरू झालं. झंडू उत्पादनांना मागणी इतकी होती की वापी, संझाण, सिलवासा, उत्तरांचल येथे उद्योग विस्तारला गेला. कालांतराने ईमामी लिमिटेडने झंडूचे काही समभाग खरेदी केले. सध्या झंडू फार्मास्युटिकल कंपनी ही ईमामी उद्योगसमूहाचा भाग आहे.

अशी सारी पूर्वपुण्याई लक्षात घेता झंडू च्यवनप्राश, झंडू केसरी जीवन, झंडू पंचारिष्ट, झंडू नित्यमचूर्ण, झंडू हनी यांच्यासह झंडू बाम हे झंडू कंपनीचं अत्यंत महत्त्वाचं उत्पादन आहे. भारतातील क्रमांक एकचा पेनबाम म्हणून झंडू बाम प्रसिद्ध आहे. १३ लाख रिटेल शोरूममध्ये हा विक्रीसाठी उपलब्ध आहे. पाच करोडहून अधिक घरांत झंडू बाम वापरला जातो.

झंडूच्या साऱ्या उत्पादनात झंडू बामचा वरचष्मा आहे. त्यामागे जाहिरातींचा वाटा मोठा म्हणावा लागेल. सकाळ संध्याकाळ टीव्ही रेडियोवर आपण ही जाहिरात नुसती ऐकली नाही तर पाठ केली. झंडू बाम असा दोन शब्दांत उल्लख होऊच शकत नाही. जोडीला, ‘झंडू बाम झंडू बाम पीडाहारी बाम, सर्दी सरदर्द पीडा को पल में दूर करें. झंडू बाम झंडू बाम’ असं गाणं नकळत पाश्र्वभूमीला ऐकू येतं. प्रकट किंवा मनातल्या मनात तरी! जी उत्पादनं अशी जिंगलच्या माध्यमातून मनात शिरतात त्यांचं स्थान घरात बहुतांश वेळा अखंड राहतं. आपल्या औषधांच्या फळीवर, कपाटात झंडू बाम म्हणूनच अढळ आहे. जुन्या पिढीवर ही जिंगलची मोहिनी तर नवी पिढी, ‘मैं झंडू बाम हुई डाìलग तेरे लिये’वर खूश! एकूण काय तर या गाण्यामुळेही हा ब्रॅण्ड कायम चच्रेत राहिला.

पण केवळ चच्रेत राहून मनात घर करता येत नाही. त्यासाठी त्या उत्पादनात सत्त्व हवं. विठ्ठल भट्टजी, झंडू भट्टजी, जुगतराम यांच्या निष्णांत वैद्यकीचं सत्त्व या उत्पादनाला लाभलं आहे. या पूर्वपुण्याईचं बळ पुढची असंख्य वष्रे झंडू बामच्या मागे उभं राहील. झंडूच्या लोगोतील हिरवं पान हे त्याचा आयुर्वेदिक पाया दर्शवितं. विश्वास हा उत्पादनाचा श्वास म्हटला तर १५४ र्वष ही निश्चितच यादृष्टीने महत्त्वाची आहेत. त्यामुळेच सर्दी सरदर्द पीडा को झंडू बाम पल में दूर करणार हा विश्वास झंडूविषयी वाटत राहतो आणि असाच वाटत राहील.

viva@expressindia.com