सणांचे दिवस आले की, आपल्याकडे शॉपिंगची लगबग सुरू होते. बाजारपेठांमध्ये टांगलेले नाना रंगांचे कपडे आपलं लक्ष वेधून घेतात. त्यात आपल्याकडे विशेषत: उत्सवी रंग म्हणजे गडद – ब्राइट कलर जास्त पसंत केले जातात. त्यामुळे लाल, पिवळा, नारंगी, गडद गुलाबी, जर्द हिरवा, निळा अशा सुंदर शेड्सचे कपडे आपल्याला खुणावत असतात. पण यंदाचा माहौल थोडासा वेगळा आहे. म्हणजे बाजारात नव्या स्टाइलचे कपडे नाहीत असं नाही, पण त्यात एक महत्त्वाचा रंग सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. एरवी दुर्लक्षित असलेला, सणांच्या दिवसात वज्र्य असलेला असा काळा रंग यंदाच्या फेस्टीव्ह सीझनमध्ये मुख्य रंग आहे.

तसं काळ्या रंगाची महती मोठी आहे. हा रंग प्रत्येक स्किनटोनला शोभून दिसतो. त्यात तुम्ही फारसे जाड दिसत नाही. उलट आटोपशीर दिसायला मदत करतो हा रंग. ‘बीइंग सेक्सी’ लुक काळ्या रंगात सहज साध्य होतो. त्यातही पार्टी, ऑफिस, कॉलेज, मीटिंग, गेट-टू-गेदर अशा प्रत्येक निमित्ताला आणि दिवसाच्या कोणत्याही प्रहराला काळा रंग सहज वापरता येतो. असं असूनही भारतीय सणांच्या दिवशी मात्र हा रंग निषिद्ध असतो. यंदा मात्र हे सगळे पायंडे मोडत काळा रंग फेस्टिव्ह सीझनचं मुख्य आकर्षण बनला आहे. साडी, सलवार सूट, मॅक्सी ड्रेस, स्कर्ट, पलॅझो अशा वेगवेगळ्या स्वरूपांत काळा रंग पाहायला मिळतोय. असं असलं तरी रोजच्या वापरात काळा रंग वापरणं आणि सणांच्या काळातील त्याचा वापर यात थोडासा फरक आहे. सणांच्या दिवसात काळ्या रंगाचा उठावदारपणा फोकसमध्ये आणायचा असतो, पण त्याच वेळी तो भडक होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे.

Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
Why the people born in the April month are so different from others Know their nature and personality
एप्रिल महिन्यात जन्मलेली माणसं का असतात इतरांपेक्षा वेगळे? जाणून घ्या त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व
shukra asta 2024
एप्रिल महिन्यात मेष राशीत शुक्र होणार अस्त! ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पटलणार! आयुष्यात येईल प्रेम करणारी व्यक्ती

व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास, नेतृत्वगुण काळ्या रंगामुळे फोकसमध्ये येतात. पण हा रंग लपवाछपवी करत नाही. त्यामुळेच काळ्या रंगाच्या ड्रेसवर पडलेली एखादी चुणीसुद्धा स्पष्ट दिसते आणि इस्त्री करतानाची तुमच्या स्वभावातील बेफिकीर वृत्ती सहज समोर आणतो. या रंगात शरीरयष्टी बारीक दिसते हे मान्य, पण तुमच्या पोटाला किंवा मांडीला घेरी असेल, तर फिटेड ब्लॅक ड्रेसमध्ये ती झाकली जाईल असा गैरसमज बाळगू नका. त्यामुळे काळा रंग वापरायचा तर तो सांभाळून. सणांच्या दिवसांमध्ये काळ्या रंगाचा वापर करताना, शक्यतो डल फिनिशचे कापड टाळा. कॉटन, लिननऐवजी सिल्क, रॉ सिल्क, वेल्व्हेट, सॅटिन, ब्रोकेडचा वापर करा. यांच्यातील सेल्फ शाइनमुळे ड्रेसला उठाव मिळेल.

  • पिंक, लाल, नारंगी, पिवळ्या अशा कॉन्ट्रास्ट शेडची काळ्या रंगाला साथ देऊन ड्रेसला उठाव देता येऊ शकतो. अगदी कॉन्ट्रास्ट बॉर्डरसुद्धा खूप परिणाम करते.
  • काळा आणि सिल्व्हर हे कॉम्बिनेशन यंदा ट्रेण्डमध्ये आहे. साडी, ड्रेसमध्ये हा लुक नक्कीच वापरू शकता.
  • नेहमीच्या ड्रेसऐवजी कपडय़ांचे काही हटके प्रकार ट्राय करा. केप, स्कर्ट विथ लेगिंगसारखे प्रकार नक्कीच वापरा.
  • सिंपल नेकलाइनचे ड्रेस काळ्या रंगात शोभून दिसतात. त्यामुळे शक्यतो बोट नेक, राउंड नेकचे ड्रेस वापरा.
  • काळ्यावर एम्ब्रॉयडरी विशेष शोभून दिसते.

 ब्लॅक अँड ब्यूटिफुल लुकसाठी आणखी काही टिप्स :

घेरदार ड्रेसेसमध्ये तुम्ही काळा रंग वापरून मस्त इफेक्ट निर्माण करू शकता. त्यामुळे काळ्या रंगाचा स्कर्ट, पलॅझो, अनारकली नक्की वापरू शकता. पण लाँग कुर्ता आणि घागरा, लाँग कुर्ता आणि फ्लेअर पँट असे दोन्ही सेपरेट्स घेरदार घालणं टाळा. यामुळे तुमची उंची कमी दिसू शकते आणि बॉडीस्ट्रक्चर हेवी दिसू शकतं. * काळ्या रंगासोबत मॅट किंवा अर्दी टोन्स सुंदर दिसतात. त्यामुळे मेहेंदी ग्रीन, नेव्ही, टक्र्वाइश, बॉटल ग्रीन, मस्टड यल्लो, डल ऑरेंज, डल ब्लू, मरून, मॅट पिंक असे रंग ड्रेसमध्ये असू द्यावे. मॅक्सी ड्रेस आणि जॅकेट हे मस्त कॉम्बिनेशन ठरू शकतं. पण नेहमीप्रमाणे काळ्या रंगाचे जॅकेट घेण्यापेक्षा ड्रेसचा रंग काळा ठेवून जॅकेट वेगळ्या रंगाचे घ्या. नवरात्रीमध्ये कच्छी वर्कचे जॅकेट घेतले असेल, तर ते नक्कीच वापरू शकता. मॅक्सी ड्रेसवर लाँग दुपट्टासुद्धा मस्त दिसेल. त्यासाठी पंजाबी ड्रेसच घातला पाहिजे असं बंधन नाही. * मल्टी कलर क्रॉप टॉप घालायचा असेल तर खाली काळा स्कर्ट, पलाझो, घागरा मस्त दिसेल. काळ्या ब्लाउजवर डल कलरची साडीसुद्धा उठून दिसेल. * काळ्या रंगावर वेगवेगळ्या प्रकारची ज्युलरी उठून दिसते. त्यामुळे ज्युलरीसोबत प्रयोग तुम्ही करू शकता. सध्या सिल्व्हर बोहो ज्युलरी ट्रेण्डमध्ये आहे. नेहमीच्या गोल्ड ज्वेलरीला ती छान पर्याय ठरेल. तसेच कुंदन ज्युलरीसुद्धा वापरू शकता. तुमचा लुक हटके ठेवण्यासाठी नेकलेस, इअररिंग, कडय़ाऐवजी हातफुल, बाजुबंद, कमरबंद असे ज्युलरीचे वेगळे प्रकार ट्राय करा.
* काळा रंग हा आपणहून फोकस तयार करतो, त्यामुळे लुकमध्ये हेवी मेकअप वापरणं टाळा. न्यूट्रल लुक तुम्ही नक्कीच कॅरी करू शकता.