सिनेमातल्या फॅशनचा लगेच ट्रेण्ड बनतो; सेलेब्रिटींची फॅशन सगळ्यांनाच फॉलो करावीशी वाटते; पण चंदेरी पडद्यावरचं किंवा फॅशन रॅम्पवरचं हे स्टाइल स्टेटमेंट प्रत्यक्षात कसं मिरवावं यासाठी हा कॉलम.

शिल्पा शेट्टीला तिच्या चित्रपटांच्या कारकीर्दीपेक्षा एक स्टायलिश दिवा म्हणून जास्त ओळखलं जात. योगा आणि नियमित व्यायामाच्या मदतीने तिने आपली फिगर व्यवस्थित मेंटेन केली आहे. अर्थात त्यामुळे ती कोणत्याही कार्यक्रमासाठी ड्रेस निवडताना त्यात आपले बॉडी कव्‍‌र्ह्ज फोकसमध्ये येतील, याची पुरेपूर खात्री घेते. त्यामुळे बहुतेक वेळा फिटेड, वेल स्टीच्ड गाउन्स, स्टिच्ड साडी अशा पेहरावाला तिची पहिली पसंती असते. पण या वेळी मात्र तिने तिच्या नियमित स्टाइलला फाटा देत थोडासा घेरदार ड्रेस निवडला आहे. पण त्यातही आपले बॉडी कव्‍‌र्ह्ज फोकसमध्ये राहतील याची पुरेपूर खात्रीही तिने घेतली आहे. क्रीम रंगाचा लाँग कुर्ता विथ फ्रंट स्लिट आणि क्रीम रंगाचीच धोती पँट, सोबत तिने सुंदर सिल्व्हर फिनिशचे अँटिक दागिने घातले आहेत. मेकअप मात्र साधा ठेवण्याला तिने पसंती दिलीय. नुकतीच दिवाळी झालीय. या फेस्टिव्ह सीझनमध्ये मोजडी हा प्रकार पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आला होता. शिल्पाचा हा लुक खुलविण्यात मोजडीचाही सहभाग आहेच.
कसा कॅरी कराल?
व्हाइट ऑन व्हाइट किंवा कोणतीही पेस्टल शेड टय़ुनिक आणि पँट म्हणून एकाच वेळी घालणं, हे थोडंसं धाडसाचं काम असतं. कारण पेस्टल शेड्सच्या अति वापराने आपली बॉडी हेवी दिसू शकते, तुम्ही आहात त्यापेक्षा जाड दिसू शकता. तसेच बॉडी शेप लपण्याची शक्यता असते. त्यामुळे असे रंग निवडताना थोडी काळजी घेणं गरजेचं असतं. सफेद, क्रीम, बिस्किटसारख्या शेड्स अशा ड्रेसिंगसाठी वापरता येतात. या ड्रेसिंगमध्ये तुमचा एक गारमेंट फिटेड आणि दुसरा काहीसा लूज असणं गरजेचं आहे. शिल्पानेही इथे फिटेड कुर्त्यांची निवड केली आहे. त्यामुळे धोती पँट असूनही लुक बल्की वाटत नाही. त्यातही तिच्या कुर्त्यांला असलेली बोल्ड स्लिट महत्त्वाची आहे. सध्या मोठय़ा स्लिटच्या कुर्त्यांचा ट्रेंड आहे. यामुळे ड्रेसला एक उठाव मिळतोच आणि शरीरयष्टी उंच, रुबाबदार दिसायला मदत होते. त्यामुळे असे कुर्ते नक्कीच ट्राय करा.
अशा लुकसाठी अँटिक ज्वेलरी अधिक शोभून दिसते. प्लेन ड्रेस असेल तर असे ठसठशीत दागिने हवेतच.
viva.loksatta@gmail.com