News Flash

‘बुक’ वॉल

इथे फक्त आपण स्वत:चाच विचार करत असतो ज्यात भीती, दडपण, असुरक्षितता या भावना असतात

प्रतिनिधिक छायाचित्र

कुणाल सुतावणे

तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

“Awake, arise, stop not till thy goal is reached”    – Swami vivekanand

लेखिका सुनीता तांबे यांच्या ‘सागर रेड्डी – नाम तो सुना होगा’ या पुस्तकातून सागर रेड्डी या व्यक्तिरेखेची ओळख तरुणांसाठी एक आदर्श म्हणून होते. आज तरुणांच्या दृष्टिकोनातून शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घेणं सोप्पं वाटतं, पण कठोर मेहनतीची भीती वाटते आहे. कारण आपण लवकरात लवकर सेटल होणं महत्त्वाचं ही भावना एकीकडे मनात असते तर दुसरीकडे स्पर्धेतू बाहेर फेकले जाऊ  शकतो याचीही भीती असते. म्हणजे इथे फक्त आपण स्वत:चाच विचार करत असतो ज्यात भीती, दडपण, असुरक्षितता या भावना असतात. स्वामी विवेकानंदांच्या या ओळी आणि ज्या सागर रेड्डी या युवकाची कथा पुस्तकातून आपल्यासमोर येते त्याचे कार्य या दोन्हींचा संदर्भ लक्षात घेतला तर आपल्यापुरते जगण्याची मानसिकता नक्कीच बाजूला ठेवायला हवी हे लक्षात येईल. सागर आज अनाथ मुलांसाठी ऑक्सिजन म्हणून उभा आहे आणि एक हजार मुलांच्या जीवनात त्याने सशक्तता आणली आहे. आपण तरुण सेल्फ ओब्सेस्ड आहोत त्यातून नेहमीच मीडिया, गॅजेट्स, फेसबुक, लॅपटॉप, व्हॉटस्अ‍ॅप, इन्टाग्रामवरून स्वत:च्या यशाचे पोस्ट्स टाकतो, अपयशाचे कोण टाकतं? यश म्हणजे पैसा कमावणं नसून कमावलेली नातीच कामी येतात, जे आज सागर रेड्डी करतोय. सागरने आठशे ते नऊशे मुलामुलींचे पालकत्व घेतलंय. एक तरुण स्वत: इतरांची जबाबदारी मनापासून घेतो व फक्त एक सामाजिक कार्य न करता आज स्वत:तच अडकलेल्या तरुणांनी आपल्या पल्याड असणाऱ्या जगाची जाणीव ठेवणं किती गरजेचे आहे हा संदेशही देतो. तरुणांनी अनाथ मुलांसाठी एक रुपयासुद्धा मदत म्हणून देणं गरजेचं वाटतं. कारण तुमच्या मदतीने त्यांच्या गरिबीतून ते स्वत: इच्छा असून आर्थिक कमतरतेमुळे जो शिक्षणाचा भारही उचलू शकत नाहीत त्यासाठी मदत होईल. त्यामुळे या ओळीतून हाच संदेश मिळतो की लांब पल्लय़ाच्या शर्यतीत आपण सगळे समान आहोत तेव्हा निर्मळ आनंद लुटावा आणि हसत राहावे. शेवटी माणसे जोडण्यापेक्षा माणूस म्हणून जगणारे जोडा म्हणजे स्वत:लाच माणूस म्हणून जगण्याचे बळ आपोआप येते त्यामुळे आत्ता उठण्याची, विकास करण्याची आणि सकारात्मकतेने ध्येय (स्वत:बद्दलच्या व इतरांबद्दलच्याही नकारात्मक भावनांवर ताबा मिळवून) गाठण्याची हीच वेळ आहे.

viva@expressindia.com

संकलन : गायत्री हसबनीस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 1:03 am

Web Title: book like by young readers best books for young readers book for young readers
Next Stories
1 कॅफे कल्चर : जुन्या मुंबईचा साक्षीदार रिगल रेस्टॉरंट अँड बेकरी
2 चटकदार भजी
3 फॅशन कट्टा
Just Now!
X