News Flash

फॅशनदार : फॅशन करिअर?

पर्सनल स्टायलिंग आणि कॉस्च्युम स्टायलिंगमध्ये इतकाच फरक आहे की इकडे स्टायलिस्ट त्या त्या प्रोजेक्टच्या गरचेप्रमाणे फक्त एका व्यक्तीचा पेहराव ठरवतात.

दहावी-बारावीला असलेल्या मुलांकडून आणि त्यांच्या पालकांकडून मला विचारलं जातं फॅशन इंडस्ट्रीमधे करिअरला काय वाव आहे? फॅशन डिझायनिंगनंतर स्वत:चं बुटिकच सुरू करायचं ना? फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेस म्हणजे खूप स्ट्रगल करावा लागत असेल ना? फिक्स्ड इन्कम आहे का?, असे एक ना अनेक प्रश्न विचारले जातात.

आपण लहान असताना आपण किती खेळ खेळत असतो; मग ते मैदानी असो किंवा मग इनडोअर; सापशिडी, व्यापारसारखे बोर्डगेम्स असो किंवा मोठय़ांचा घरात व बाहेर वावर बघून आपण स्वत: तयार केलेल्या छोटय़ा घर-घर, ऑफिस-ऑफिससारख्या नाटय़छटा. या अशा छोटय़ा छोटय़ा खेळांमधूनच आपल्या आवडीनिवडींचा अंदाज घेत आपण ठरवतो की मोठे झाल्यावर मी कोण होणार? डॉक्टर, इंजिनीअर, वकील, फुटबॉल प्लेअर, आर्किटेक्ट इत्यादी. लहानपणी मी पण असेच खेळ खेळायचे. बऱ्याचदा माझा आवडीचा खेळ म्हणजे आईच्या जुन्या ओढण्या घेऊन आरशासमोर उभे राहणे आणि निरनिराळ्या पद्धतीचे स्वत:वर ड्रेप्स करून बघणे; कदाचित त्याच आवडीमुळे मी आज या क्षेत्रात मला आनंद देणारे काम करते आहे. बऱ्याच वेळा ओळखीचे, मित्रपरिवार किंवा नातेवाईकांकडून विशेष म्हणजे दहावी-बारावीला असलेल्या मुलांकडून आणि त्यांच्या पालकांकडून मला विचारलं जातं फॅशन इंडस्ट्रीमधे करिअरला काय वाव आहे? फॅशन डिझायनिंगनंतर स्वत:चं बुटिकच सुरू करायचं ना? फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेस म्हणजे खूप स्ट्रगल करावा लागत असेल ना? फिक्स्ड इन्कम आहे का?, असे एक ना अनेक प्रश्न विचारले जातात. त्याचीच उत्तरे मी आज देणार आहे याशिवाय, फॅशन क्षेत्रातील आणखी काही करिअरच्या पर्यायांविषयी बोलणार आहे.

गारमेंट टेक्नॉलॉजिस्ट

गारमेंट टेक्नॉलॉजिस्ट हे एक खूप नावीन्यपूर्ण काम आहे. कुठल्याही छोटय़ा किंवा मोठय़ा स्तरावरच्या ब्रँड, लेबल किंवा बुटिकमध्ये ही एक महत्त्वाची जवाबदारी असते. या पद्धतीच्या कामासाठी सर्जनशीलता, लेटेस्ट फॅशन ट्रेंड्सची माहिती आणि मास प्रॉडक्शनमधील तांत्रिक गोष्टींचा योग्य समतोल साधणं गरजेचं असतं. एका विशिष्ट पेहरावाचे ठरावीक डिझाइन ठरले की त्याच्या फॅ ब्रिक मेकिंगपासून ते कपडा शिवून बाजारात विकण्याजोगा दिसण्यासाठी गारमेंट टेक्नॉलॉजिस्टना सतत त्यातील यार्न्स, फायबर्स, कापड, प्रॉडक्शन पद्धतींमध्ये नवनवीन प्रयोग करत राहावे लागतात, शिवाय किमान रिसोर्सेसमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात उत्कृष्ट दर्जाचे गारमेंट प्रॉडक्शनच्या नवनवीन पद्धती शोधणे आणि त्यांचा योग्य क्वालिटी कंट्रोल हे या विभागाचे मूळ काम आहे.

रिटेल बायर

आपण जेव्हा केव्हा शॉपिंगला जायचं ठरवतो तेव्हा आपली काही ठरलेली आवडीची दुकानं किंवा सेंट्रल, वेस्टसाइड, पॅन्टालून्स इत्यादींसारखे रिटेल स्टोअर असतात. आपण या ठिकाणी जातो कारण आपल्याला तिकडे आपल्या आवडीचे आणि मापाचे कपडे व वस्तू मिळतात. रिटेल बायरचे हेच काम आहे. येणाऱ्या सीझनच्या फॅशन ट्रेंड्सचा योग्य अभ्यास करणे. या ट्रेंड्सप्रमाणे साधारण लोकांना काय घालायला, खरेदी करायला आवडेल आणि कुठला कपडा अथवा वस्तू जास्तीत जास्त विकली जाईल, या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करून कपडे व अ‍ॅक्सेसरीज आधीच वेगवेगळ्या ब्रँड्सकडून एका रिटेल स्टोअरसाठी मोठय़ा प्रमाणात विकत घेऊन स्टॉक करणे हे रिटेल बायरचे काम आहे.

फॅशन इलस्ट्रेटर

डिझाइनर्सना नवनवीन फॅ शन्स किंवा एखाद्या विशिष्ट कलेक्शन्ससाठी कल्पना सुचतात, ते स्केचिंग, पेंटिंगद्वारे फॅशन इलस्ट्रेटर्स त्याला टु डायमेन्शनल स्वरूपात पेपरवर उतरवतात.  कपडय़ांपासून ते बॅग्ज, फुटवेअपर्यंत सर्व गोष्टींचे स्केच काढले जातात. याच्या व्यतिरिक्त लोकांना आकर्षित करण्यासाठी प्रिंट आणि ऑनलाइन मीडियाच्या जाहिरातींसाठी हेच इलस्ट्रेटर्स वेगळे कन्सेप्च्युअल स्केचेसपण काढतात.

कॉस्च्युम स्टायलिस्ट

कॉस्च्युम स्टायलिंग किंवा डिझायनिंग म्हणजे फोटोशूट, फिल्म, नाटक, जाहिरात, टेलिव्हिजन शो यापैकी कुठल्याही माध्यमातील गोष्टींमधील पात्रांना त्यांच्या वर्णनाला साजेसा योग्य पेहराव देऊन ते पात्र जिवंत करणे. मग ते त्यांच्या केसापासून नखापर्यंत सगळ्याचीच काळजी घ्यावी लागते. या कामासाठी त्या डिझाइनरची कल्पनाशक्ती आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा, ऐतिहासिक व्यक्तिरेखांचा अभ्यास असणे खूप गरजेचे आहे.

टेक्स्टाइल डिझाइनर

या क्षेत्रात दोन महत्त्वाचे विभाग आहेत. अपहोल्स्टरी (पडदे, कार्पेट इत्यादी) आणि कपडे शिवायला लागणारं कापड. कुठल्याही प्रकारचे फॅब्रिक असो प्रिंटेड किंवा विणलेले; टेक्स्टाइल डिझाइनर्स त्यांचे टु डायमेन्शनल डिझाइन पॅटर्न्‍सचे नमुने बनवतात.

पर्सनल स्टायलिस्ट

पर्सनल स्टायलिंग आणि कॉस्च्युम स्टायलिंगमध्ये इतकाच फरक आहे की इकडे स्टायलिस्ट त्या त्या प्रोजेक्टच्या गरचेप्रमाणे फक्त एका व्यक्तीचा पेहराव ठरवतात. मग ते त्या व्यक्तीशी निगडित कुठलाही समारंभ असो, नाटक-सिनेमासारखा प्रोजेक्ट असो किंवा आणखी काही. त्या व्यक्तीला- सेलिब्रिटीला प्रत्येक वेळी परफेक्ट दाखवण्यासाठी हाडाचं फॅशनप्रेमीच व्हायला पाहिजे. त्यासाठी लेटेस्ट फॅ शनट्रेंड्सची माहिती ठेवण्याबरोबर उत्तम कम्युनिकेशन आणि समोरच्या व्यक्तीला पटवण्यात पारंगत असणे गरजेचे आहे.

फॅशनपब्लिक रिलेशन्स :

एका फॅशन ब्रँडची लोकांमध्ये एक चांगली प्रतिमा तयार करण्यासाठी आणि त्यांच्या प्रॉडक्टचे लाँचिंग अथवा प्रमोशन करण्यासाठी फॅ शनपब्लिक रिलेशन्स एजन्सीजचा मोठा हात असतो. या प्रकारच्या कामात जास्तीतजास्त लोकांपर्यंत आपला ब्रँड कसा पोहोचेल यासाठी उत्तम कम्युनिकेशन स्किल्स आणि उत्तम मार्केटिंग स्किल्स असणे खूप गरजेचे आहे.

फॅशन रायटर :

रिटेल बायर्स आणि र्मचडायजर्सप्रमाणेच फॅशन रायटर आणि फॅ शनपब्लिक रिलेशन्स या दोघांची कामं एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. फॅशन पीआर ब्रँडिंग आणि प्रमोशनच्या वेळेस अशा काही पत्रकार आणि लेखकांना त्या त्या ठरावीक ब्रँड आणि त्यांच्या प्रॉडक्ट्सची योग्य माहिती पुरवतात. फॅशन शोज किंवा लाँच इव्हेंट्सना बोलावतात. त्यानंतर मग फॅ शनरायटर्स या ब्रँडबद्दल आणि त्या इव्हेंटचे समीक्षणात्मक लेख लिहितात. फॅशन रायटर्स साधारण वर्तमानपत्र, ‘व्होग’ किंवा ‘फेमिना’सारखी मासिक किंवा सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या ऑनलाइन फॅशन ब्लॉगसाठी लिहितात.

फॅ शनइंडस्ट्रीतील काही मुख्य करिअरच्या पर्यायांची ही एक छोटीशी तोंडओळख. या सर्व प्रकारच्या कामांसाठी आपल्याकडच्या फॅशन इन्स्टिटय़ूट्समध्ये योग्य कोर्सेस आहेत. पण हे करिअर निवडताना कायम एक गोष्ट लक्षात ठेवा; कलेशी जवळ जाणारं क्षेत्र असल्यामुळे कमी अभ्यास करायला मिळेल या कारणासाठी फॅ शनइंडस्ट्री निवडू नका तर या क्षेत्राबद्दल असलेली ओढ आणि स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा ध्यास असेल तरच पाऊल टाका. फॅ शनक्षेत्रात काम करणे म्हणजेच शिवणकाम-टेलरिंग करणे.. हा गैरसमज आता तरी दूर झाला पाहिजे. तो दूर करण्याचा माझा सतत प्रयत्न असतो.

र्मचडायर्स

र्मचडायर्स आणि रिटेल बायर एकमेकांचे अविभाज्य घटक आहेत. जर रिटेल बायर स्टोअरसाठी मोठय़ा प्रमाणावर खरेदी करतात तर र्मचडायर्स तो स्टॉक आपल्या स्टोअरमध्ये योग्य संख्येत, योग्य वेळेला दिसेल याची जबाबदारी पेलतात. हे सर्व नीट पार पाडण्यासाठी आपल्या स्टोअरमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या आवडीनिवडी, त्यांची पैसे खर्च करण्याची तयारी, त्यानुसार त्या स्टोअरचा सेल्स परफॉर्मन्स या सर्वाचा अचूक अंदाज आणि विश्लेषण हे र्मचडायजिंग टीमचे मुख्य काम आहे.  त्याचबरोबर नवीन सीझनसाठी आलेले सर्व कपडे किंवा अ‍ॅक्सेसरीज पूर्ण स्टोअरमध्ये कशा पद्धतीने मांडले जातील, प्रवेशद्वार किंवा खिडक्यांमध्ये किंवा दुकानाबाहेर असलेल्या मॅनीक्वीनवर सीझनचे कलेक्शन सूचक पद्धतीने कसे मांडता येईल जेणेकरून ग्राहक आकर्षितपण होतील आणि त्याचबरोबर त्यांना हवी ती वस्तू हव्या त्या साइझमध्ये सहज सापडेल, ही जबाबदारीपण र्मचडायर्सची. या पद्धतीच्या कामाला व्हिज्युअल र्मचडायजिंग असे म्हणतात. कुठलंही स्टोअर पॉप्युलर होण्यामागे त्याच्या रिटेल बायर आणि र्मचडायर्सचा सिंहाचा वाटा असतो.

फॅशन डिझाइनर्स

फॅशन डिझाइनर्स हा या इंडस्ट्रीतला आपल्याला परिचयाचा चेहरा. त्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. काळाप्रमाणे सातत्याने बदलत्या फॅ शनट्रेंड्सचा योग्य अभ्यास करून, चालू वर्षांत कुठल्या फॅ शन्सचे पेहराव लोकांना सर्वात जास्त आवडतील, विकत घेतले जातील याचा सतत विचार करणे व त्याप्रमाणे सर्वात ट्रेंडी कपडे बनवून घेणे हे एका डिझाइनरचे मुख्य काम आहे. डिझाइनर्स हे कुठल्याही प्रकारच्या पेहराव किंवा अ‍ॅक्सेसरीमध्ये आपले स्पेशलायझेशन करू शकतात. उदाहरणार्थ हँडबँग्ज ते स्पोर्ट्सवेअर, किड्सवेअर किंवा मग वेस्टर्न वेअर ते ब्रायडल वेअर. त्यांचा कामाची व्याप्ती मोठी असल्याने वावही जास्त आहे. मग ते अगदी मोठे रिटेल ब्रँड्स असोत, बुटिक असो किंवा लेबल असो, इथे सगळीकडे डिझाइनर्सची गरज तर असतेच.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 1:02 am

Web Title: careers in fashion industry information on fashion industry
Next Stories
1 कॅफे कल्चर : कॅफे एक्सलसिअर शतकाच्या उंबरठय़ावर
2 ‘प्लस’ फॅशन
3 ‘चष्मे’बहाद्दर
Just Now!
X