१९५० च्या काळात मार्लिन मन्रो या अभिनेत्रीने ग्लॅमर जगात आणलं. हॉलीवूड म्हणजे झगमगतं बोल्ड अँड ब्युटीफु लचं समीकरण. त्यात कपडय़ांपासून ते मेकअपपर्यंत व बोल्ड हेअरस्टाइलपर्यंत आजही हॉलीवूडचं नाव आहे. बॉलीवूडनेही हॉलीवूडचं अंधानुकरण क रत त्याच ग्लॅमरला आपलंसं केलं आहे. कधीतरी तिथे सुरू झालेली एखादी प्रथा आपल्याकडे उचलून घ्यायला अंमळ वेळ लागतो, मात्र बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींनी त्यातही आघाडी घेतली आहे. कधीकाळी ‘क्लिव्हेज शो’ साठी दीपिकाला माध्यमांकडून टीका ऐकावी लागली होती. तिनेही त्यावर खरमरीत उत्तर दिले होते. त्यानंतर काही काळ क्लिव्हेज शो होतील असे कपडे घालणं कटाक्षाने टाळलं जात होतं, मात्र आता त्याला हळूहळू ‘फॅ शनेबल’ करण्याचा विडा बॉलीवूड तारकांनी उचलला आहे..

‘कट गाऊ न’ ज्यामुळे पायापासून मांडीपर्यंतचा भाग दिसायचा त्या गाऊनची फॅशन होती. ही फॅशन फार जुन्या काळापासून आहे. आजच्या आधुनिक काळात ऑफ शोल्डर टॉप्स घालून खांदे दाखवणं ही फॅशन आहे. बॅकलेस ड्रेसचीही फॅशन सर्वसामान्य झाली आहे. १७७५ साली फ्रान्सची राणी मॅरी अ‍ॅन्टोइनेट हिचा एक फोटो प्रसिद्ध आहे. ज्यात तिच्या ड्रेसची स्टाइल छातीचा भाग दिसावा अशा पद्धतीने फॅशन केली गेली होती. त्या काळी सगळ्या राण्या तसे गाऊ न वापरायच्या. त्यांची ती फॅशन सर्वासमोर आदर्श असायची. तेव्हापासून छातीचा भाग दिसेल अशा पद्धतीने डिझाइन केलेले कपडे वापरले जात होते. ज्याला आज ‘क्लिव्हेज’ असं म्हणलं जातं. तेव्हा काही क्लिव्हेज ही फॅशन आहे असं नव्हतं. युरोपात मोठमोठय़ा राण्या तशा स्टाइल ठेवायच्या आणि तिथून ती फॅशन हळूहळू मॉडेलिंग विश्वात रूढ झाली. तेव्हा क्लिव्हेज या संकल्पनेचे रूप ‘डिसेन्ट’ मानले जायचे. त्यात काही भयंक र आहे असे मानले जात नव्हते. त्या संकल्पनेला ‘डिक्लोटेज’ म्हणून संबोधतात. म्हणजे स्त्रीच्या शरीराचा कोणताही भाग कपडय़ांच्या कटिंगच्या पद्धतीने दिसतो. कपडय़ांची ही रचना जाणीवपूर्वक तशी केली जात होती.

हॉलीवूडमध्ये तर क्लिव्हेज दाखवणं हे सर्वसाधारण होतं, कारण स्त्रीच्या सौंदर्याचा तो मापदंड मानला गेला. स्कार्लेट जोहान्सन, हैडी क्लम, जेनिफर लॉरेन्स, मायली सायरस, जेनिफर अ‍ॅनिस्टन या क्लिव्हेजची फॅशन करतानाही प्रचंड एलिगन्स बाळगून असतात. हॉलीवूडचं हे वारं झिनत अमान, हेलन, प्रेमा नारायण, परवीन बाबी, डिंपल कपाडिया या बोल्ड अभिनेत्रींनीही सहजी आपलंसं केलं. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी क्लिव्हेज ही फॅशन आणायला सुरुवात केली. त्यांचे कपडे जरी हॉट असले तरी ते ग्रेसफुली जास्त क्लिव्हेज शो न होऊ  देता सांभाळलं जायचं. १९२० पासून क्लिव्हेज ही एक फॅशन बनली खरी, पण त्याला अधिकृत काहीच महत्त्व नव्हतं. शेवटी २०१६ मध्ये ‘क्लिव्हेज’ची फॅशन रद्दबातलही झाली. मात्र क्लिव्हेज फॅशनचं बाहेर जाणं हे अगदी काही क्षणांपुरती होतं असं आता म्हणावं लागेल. सध्या क्लिव्हेज दाखवणं हे फॅशनच्या लिस्टमध्ये पक्कं जाऊ न बसलं आहे. क्लिव्हेज दाखवणं आज फॅशनचाच एक मोठा भाग आहे, याचं निमित्त ठरलं ते म्हणजे नुकताच श्वेता बच्चनचा व्हायरला झालेला फोटो. त्यात तिचा क्लिव्हेज शो झाला आहे आणि तरीही ते कुठेही अश्लील किंवा बोल्ड वाटत नाही आहे. याआधी गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये व्हॉगसाठी फोटोशूट करतानाही तिने क्लिव्हेज शो करणारे कपडे परिधान केले होते. सध्या श्वेताच नव्हे तर दीपिका, अलिया, सोनम कपूर, प्रियांचा चोप्रा, ऐश्वर्या राय बच्चन सगळ्याच तारकांकडून क्लिव्हेज फॅशनच्या मांदियाळीत ट्रेंडमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सयानी गुप्ता व राधिका आपटेचाही एकत्र फोटो आहे, ज्यात दोघींनी फोटोशूट करताना क्लिव्हेज शो केला आहे. श्वेता बच्चन, सयानी गुप्ता व राधिका आपटे या तिघींनी ओपन जॅकेट घातलं होतं ज्यातून क्लिव्हेज सहज दिसू शकतो.

त्यामुळे ज्यातून क्लिव्हेज दिसू शकेल अशा फॅशनचे कपडे घालतानाच त्यातला साधेपणाही सांभाळायचा अशी एक दुहेरी जबाबदारी या तारकांनी घेतली आहे.

सोनम कपूरही कित्येक फिल्म मॅग्झिनसाठी फोटोशूट करताना बोल्ड अंदाजमध्ये असते. बऱ्याचदा डिक्लोटेज कपडय़ांची फॅशन सोनम करताना दिसते. ऐश्वर्या राय बच्चन ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची अभिनेत्री असल्याने तिने यापूर्वी ‘गुजारिश’ आणि ‘अ‍ॅक्शन रिप्ले’ या चित्रपटांमधून क्लिव्हेज शो करणारे कपडे घातले होते. तिला वेस्टर्न फॅशनची चांगली जाण असल्याने अनेकदा ‘कान’ चित्रपट महोत्सावात रेड कार्पेटवरही तिने क्लिव्हेज फॅशन फॉलो केली आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मानेही ‘जीक्यू इंडिया’ या मॅग्झिनसाठी फोटोशूट केलं होतं. ज्यात तिला ‘जीक्यू वुमन ऑफ दी इयर’ हा पुरस्कार मागच्या वर्षी मिळला होता. जीक्यू ही मेन्स फॅशन मॅग्झिन आहे. त्यासाठी कव्हरफोटोवर स्त्री प्रतिमा म्हणून बोल्ड अंदाजात अनुष्काने क्लिव्हेज दाखवण्याची फॅशन वापरली होती तरीही तो फोटो भरपूर डिसेन्ट वाटत होता. ‘बिग बॉस’ या हिट रिअ‍ॅलिटी शोमध्ये आर्शी खानही संपूर्ण घरात क्लिव्हेज दाखवणारे लो नेक जॅकेट्स , शर्ट्स घालत होती. यात स्वत:ला सांभाळून चार लोकांसमोर ते कुठेही गलिच्छ वाटू नये इतकं ते फॅशनच्या पठडीतही दिसावं याची काळजी अभिनेत्री घेत आहेत. विद्या बालनसारख्या अभिनेत्रीने फारच जपून क्लिव्हेज दाखवताना सांभाळून स्वत:ची प्रतिमा ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून जपली आहे. ‘द डर्टी पिक्चर’च्या कथेच्या गरजेमुळे तिने क्लिव्हेज दाखवून बोल्ड होताना व तिच्यातील गुणी अभिनेत्रीला धक्का न पोहोचवताना ते धाडस केलंच की.. कतरिना कैफ, दीपिका पदूकोण याही त्यात मागे नाहीत. प्रियांका चोप्राही आंतरराष्ट्रीय कीर्तीची कलाकार असल्याने तिला हॉलीवूडपटात क्लिव्हेज शो करणारे कपडे सर्रास वापरावे लागतात. बॉलीवूडमध्येही ती जितकी बोल्ड नव्हती तितकी ती हॉलीवूडमध्ये झाली आहे. काजोलसारखी वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची अभिनेत्रीही यात मागे राहिलेली नाही. तिचा बॅकलेस गाऊ नमधला बोल्ड अंदाज सगळ्यांनाच थक्क करून गेला आहे. त्यामुळे कोणतीच अभिनेत्री यात मागे नाही. परंतु ती सांभाळण्याची धमक व धाडस कठीण आहे त्यातून ते सर्वाना झेपेल असंही नाही.

अभिनेत्रींना हे झेपतं कारण त्यमागे ग्लॅमरचं वलय आहे. जेव्हा ‘उप्स् मोमेंट’ म्हणून अभिनेत्रींना अनेक गोष्टींना, वादविवादांना सामोरं जावं लागतं त्यामुळे क्लिव्हेज दाखवतानाही ती काळजी सर्वतोपरी अभिनेत्री घेताना दिसतात. नुकतंच ‘वीरे दी वेडिंग’च्या ट्रेलर लाँचसाठी स्वरा भास्करला तिच्या क्लिव्हेज दाखवताना अशाच अवघड क्षणाला सामोरे जावे लागले तेव्हा तिच्याबरोबरच्या अन्य अभिनेत्रींनी तिला सावरलं. मलायका अरोरा खान ही सर्वात सुंदर, ग्लॅमरस व क्लिव्हेज दाखवतानाही प्रचंड डिसेन्ट दिसते.

बॉलीवुड अभिनेत्रींमध्ये बेधडकपणा आहेच. क्लिव्हेज हे फॅशन इंडस्ट्रीतून आऊट ऑफ फॅशनच झाले होते. त्यामुळे क्लिव्हेज शोचा हा ट्रेंड सध्या मॉडेलिंग विश्वातून न येता बॉलीवूड अभिनेत्रींकडून येतो आहे. परखड व्यक्तिमत्त्व दिसावं, जाणवावं यासाठी त्याही फॅॅशन फॉले करतायेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता ही फॅशन सर्वसामान्यांच्या आयुष्यातही अवतरते आहे. मात्र हॉलीवूडचं समीकरण इथे फिट बसवताना ते कुठेही अश्लीलतेकडे झुकणार नाही, यासाठी या अभिनेत्री अतिदक्षतेने ही फॅशन फॉलो क रताना दिसताहेत.

viva@expressindia.com