News Flash

अजब नावांचा गजब जमाना

ऑनलाइन शॉपिंगच्या या जमान्यात अशी अजब नावं ठेवणं हा नवा ट्रेण्ड आहे.

हल्लीच्या जमान्यात हटकेहा कीवर्डझाला आहे. आमचं सगळं वेगळं असतं, हे म्हणण्यात आजच्या पिढीला धन्यता वाटते. शॉपिंगमध्येही अर्थातच या हटके गोष्टींना जास्त मोल आहे. त्यामुळे आपल्या अतरंगी व्यक्तिमत्त्वाला तशाच अजब नावाचं वेगळं काही शोधण्याचा प्रयत्न अनेक तरुण करतात. त्यातूनच फॅशन आणि ॅक्सेसरीजच्या बाजारात अशी अतरंगी ब्रॅण्डनेम फेमस होताहेत. हे फॅशन स्टार्टअप तरुणाईनेच सुरू केलेले आहेत.

हल्लीची तरुण पिढी सतत नव्या.. खरं तर वेगळ्या फॅशनच्या शोधात असते. काही हटके अ‍ॅक्सेसरीजचे प्रयोग करायला सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे फॅशन बाजारात या ‘हटके’ गोष्टींवर सगळ्यांचं लक्ष असतं. नाव हटके असेल की, त्या गोष्टींकडे पटकन लक्ष वेधलं जातं आणि मग एकदा अशा वेगळ्या नावाच्या ब्रॅण्डची वस्तू आवडली की, मग तोच ब्रॅण्ड वापरण्याचा सपाटा लावला जातो. विशेषत: नव्या किंवा स्टार्टअप ब्रॅण्डच्या बाबतीत हा फंडा अगदी थेट लागू होतो.

ऑनलाइन शॉपिंगच्या या जमान्यात अशी अजब नावं ठेवणं हा नवा ट्रेण्ड आहे. चुंबक, बेवकूफ.कॉम, शोर शराबा, हॅप्पीली अनमॅरीड, कागझी, आयटम नंबर इत्यादी नावं असणारी ऑनलाइन शॉपिंग ब्रॅण्ड्स पटकन लक्ष वेधून घेतात. ऑनलाइनबरोबरच नव्या ब्रॅण्डनी स्टोअरसाठीदेखील अशीच नावं शोधल्याचं दिसेल. ‘टप्पू की दुकान’, ‘रोटी कपडा मकान’, ‘क्या चीझ है ’अशी नावं असणारी शॉपिंग स्टोअर्स मॉलमध्ये किंवा शॉपिंग स्ट्रीटवर हमखास दिसतात. शेक्स्पिअर म्हणून गेलाय – नावात काय ठेवलंय?

पण आताच्या जमान्यात या नावांचाच वापर प्रसिद्धीसाठी केला जातो. अतरंगी ब्रॅण्डनेम हा अनेकांसाठी प्रमुख ‘यूएसपी’ असतो. अर्थात त्यासोबत खरोखरच वेगळी आणि गुणवत्ता असलेली प्रॉडक्ट्सही दिली जातात. एकूणच काय तर. ‘नाम अगर अच्छा, तो माल बिकेगा पक्का’चा जमाना आलाय.

हटके ॅक्सेसरीज

मोती, कुंदन, हिरे आणि सोनं म्हटलं की,स्त्रियांच्या डोळ्यात तारे चमकतात. पण हे झालं दशकभरापूर्वीचं. वर्षांगणिक फॅशन बदलते आणि आता इतका बदल झालाय की, दररोजच्या वापरातल्या हल्लीच्या कूल अ‍ॅक्सेसरीजमध्ये सोनं दिसणं कमी झालंय. त्याची जागा घेतली आहे चांदीने. नेहमीच्या डिझाइन्सऐवजी सांबराची शिंगं, घुबड, सिंहाचे मुख, साप, नाग, मोर किंवा अगदी कुलूप, किल्ली, कात्री किंवा मग भौमितिक आकार असलेली डिसाइन्स घेऊन अंगठय़ा, नोज रिंग, कानातले स्टड्स, लॉकेट्स बनवले जात आहेत.

मोबाइलची कव्हर्स, बॅग्स, पाकिटं यांच्या वरच्या ग्राफिक्सबाबतीतही तसंच. काळे-निळे-पिवळे असे एकजात सारखे रंग घेण्यापेक्षा काही तरी क्रिएटिव्ह आणि वैविध्यपूर्ण गोष्टी तरुणाईला हव्या आहेत.  ‘नखरेवाली’ असं लिहिलेलं सई ताम्हणकरचं ब्रूच किंवा लॉकेट असो वा, स्वानंदी टिकेकरच्या नाकातली कात्रीच्या आकाराची नोज पिन, अशी हटके फॅशन करून आपले लाडके सेलेब्रिटीसुद्धा मायलेज मिळवतात. ऑनलाइन ऑर्डर्स देऊन अशी फॅशन प्रॉडक्ट्स विकत घेण्याकडे हल्लीच्या तरुणाईचा जास्त कल दिसतो. अशा गोष्टींना ऑनलाइन मार्केट उपलब्ध असल्याने तरुणाईच्या सर्च लिस्टमध्ये अशाच हटके गोष्टी विकणाऱ्या ब्रॅण्ड्सच्या नावांची रेलचेल असते.

टीशर्टवर अशा क्रिएटिव्ह डिसाइन्ससह काही लक्षवेधी वाक्यं छापून घेतली जातात. स्वत:ची नावं छापून घेऊन मोबाइलसाठी कव्हर्स घेतले जाणं हे तर आता खूपच कॉमन झालं आहे. हाच ट्रेण्ड अ‍ॅक्सेसरीजमध्ये आणला एका ज्युलरी स्टार्टअपने. ‘क्वर्कस्मिथ’ या नावाने दिव्या आणि प्रज्ञा बत्रा या दोन बहिणींनी मिळून दीड वर्षांपूर्वी हा ब्रॅण्ड सुरू केला. अनेक सेलेब्रिटीज या नव्या तरीही वेगळेपणामुळे प्रसिद्ध झालेल्या ब्रॅण्डची ज्युलरी मिरवताना दिसतात. सईचं नखरेवाली ब्रूच, स्वरा भास्करनं घातलेले देखो मगर प्यार से इअरकफ्स याच ब्रॅण्डचे.

‘माझी मोठी बहीण दिव्या गेली बारा वर्ष ज्युलरी डिझाईनच्या व्यवसायात आहे. चंदेरी दागिन्यांवर आमचं असणारं प्रेम क्वर्कस्मिथच्या निर्मितीमागचं कारण होतं. दिव्या केवळ डिझाइन्सवर लक्ष केंद्रित करत असल्याने आणि मार्केटिंगचा तिला काही गंध नसल्याने मग मी या क्षेत्रात तिच्यासोबत उतरले’, असं प्रज्ञा सांगते.

ॅक्सेसरीजचे काही हटके ब्रॅण्ड्स :

 • चुंबक
 • क्वर्कबॉक्स
 • टप्पू की दुकान
 • हॅपीली अनमॅरिड
 • शोर शराबा
 • रोटी कपडा मकान
 • कागझी
 • आयटम नंबर
 • क्या चीज है
 • तोता मैना
 • बेवकूफ.कॉम

स्त्रीमधला मिश्कीलपणा जपणारा चांदीचा दागिना अशी आमच्या ब्रॅण्डची थीम आहे. विविध गुणसंपन्न, विविध रू पं असणारी स्त्री आमचं प्रेरणास्थान आहे. स्त्रीच्या स्वभावाच्या वेगवेगळ्या बाजू आणि छटा दाखवण्याच्या उद्देशाने आम्ही वेगळी डिझाइन्स करतो.  सौम्य, गंभीर, मिश्कील, कधी योद्धय़ाप्रमाणे कणखर तर कधी नजरेतील नजाकतीने घायाळ करणारी स्त्री अशा सर्व अदा आमच्या डिझाइनमार्फत दाखवण्याचा प्रयत्न करतो.’

दिव्या आणि प्रज्ञा बत्रा, क्वर्कस्मिथ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 5:02 am

Web Title: different accessories fation
Next Stories
1 अतरंगी  ‘किश’
2 प्रदर्शनीय खरेदी
3 कॅफे टिप्सेरिया : मिशन साफसफाई
Just Now!
X