मितेश जोशी

‘ढग दाटीवाटीने बसले आहेत, वर्ग सुरू होण्याची वाट बघत आहेत पाऊस मास्तर आता बिनधास्त उगारा छडी’

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
coconut oil and aloe vera for beautiful and glowing skin Benefits
उन्हाळ्यात चेहरा कायम चिपचिपा, घामट दिसतो? खोबऱ्याचं तेल अन् कोरफडीचं मिश्रण वाढवेल सौंदर्य
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स
Makeup tips for people with oily skin during summer
Summer Makeup Tips: उन्हाळ्यात मेकअप कसा करावा? असा करा स्वेट प्रूफ मेकअप

– वरदा

उन्हाळ्यातली घामाची लाहीलाही वरुण कृपेनेयंदाच्या वर्षी लवकर थांबली आहे. डोंगरदऱ्यात दडी मारून बसलेला पाऊस धो-धो बरसायला लागलाय. आपल्याकडे ऋतू आणि पदार्थ यांचं एक भलतंच नातं हमखास पाहायला मिळतं. जसं उन्हाळा आणि थंडगार सरबत, हिवाळा आणि गरमागरम सूप, तसंच पाऊस आणि फक्कड चहा. आणि जर जोडीला भजीची प्लेट असेल तर मग केवळ जिव्हातृप्ती! जसं उन्हाळा आणि थंडगार सरबत, हिवाळा आणि गरमागरम सूप, तसंच पाऊस आणि फक्कड चहा. आणि जर जोडीला भजीची प्लेट असेल तर मग केवळ जिव्हातृप्ती! पावसाने थोडी विश्रांती जरी घेतली तरी वातावरणात आलेला सुखद गारवा आपल्याला गरम चाय की प्याली तोंडाला लावल्याशिवाय शांत बसू देणार नाही. त्यामुळे पहिल्या पावसाच्या या कुंद, चिंबगार वातावरणात व्हिवाच्या वाचकांना गरमागरम चहाच्या आठवणी अविस्मरणीय करता याव्यात यासाठी फक्कड चहाच्या काही रेसिपीज..

आइस टी विथ लाइम

  • साहित्य : ब्लॅक चहाच्या बॅग्ज – १ किंवा २, साखर – स्वादानुसार, बर्फाचे तुकडे, पाणी – ४०० मिली, एक लिंबाचा रस
  • कृती : एका भांडय़ात पाणी उकळवा. एक मोठय़ा मगमध्ये ते ओता आणि नंतर त्यात टी बॅग्स ठेऊन ४ मिनिटांसाठी झाकून ठेवा. ४ मिनिटांनंतर चहाची बॅग काढून घ्या आणि त्यात साखर घाला. साखर पूर्ण विरघळेपर्यंत हलवा. चहा सव्‍‌र्ह करण्याअगोदर त्यात बर्फाचे तुकडे आणि १ चमचा लिंबाचा रस घाला.

कोल्ड ऑरेंज टी

  • साहित्य : संत्र्यांचा रस – २ कप, लिंबाचा रस- २ लहान चमचे, चहापावडर – ४ चमचे, दालचिनी पावडर – १ लहान चमचा, मध/साखर – १ लहान चमचा, पाणी – ४ कप, संत्र्यांच्या काही फोडी (सजावटीसाठी), बर्फाचे तुकडे
  • कृती : एक भांडय़ात मंद आचेवर पाणी उकळवा. त्यात चहा, दालचिनी, ऑरेंज झेस्ट आणि साखर आदी जिन्नस पाण्यात विरघळवा. तयार चहा गॅसवरून खाली उतरवा आणि १ तास रूम टेम्परेचरवर थंड होऊ द्या. तयार चहाचा चोथा गाळणीने वेगळा काढा. एका मगमध्ये तयार चहा घ्या. त्यात वरून संत्र्याचा रस, लिंबाचा रस आणि बर्फाचे तुकडे घाला. संत्र्याच्या फोडीने मग सजवून सव्‍‌र्ह करा कोल्ड ऑरेंज टी.

बदाम का कहावा

  • साहित्य : ग्रीन टी बॅग्ज – २ नग, वर्ख लावलेले बदाम – ३ टेबलस्पून, वेलची – २ नग, दालचिनी (१ इंच) एक कांडी, लवंगा – २ नग, मध- ४ टी स्पून, केशर – ८ कांडय़ा
  • कृती : एका भांडय़ात पाच कप पाणी उकळवा. उकळत्या पाण्यात वेलची, लवंगा, दालचिनी आणि केशर मिसळा. ३ मिनिटांपर्यंत मंद आचेवर हे पाणी गरम करा. त्यात मध आणि टी बॅग्ज घाला. विस्तवावरून काढून २-३ मिनिटांपर्यंत मिक्स होण्यासाठी ठेवून द्या. टी बॅग्ज आणि आतील मसाले काढून टाका. त्यांत आता वर्ख लावलेले बदाम घालून गरमागरम चहा पिण्यासाठी तयार व्हा!

पीच टी

  • साहित्य : जर्दाळू – ४, पाणी – ४ ग्लास चार चमचे, चहा पावडर – ४ चमचे, साखर – ४ चमचे
  • कृती : प्रथम जर्दाळू दोन तास एक कप पाण्यात भिजत घालावेत. बिया काढून मिक्सरमध्ये वाटून रस काढावा. चार ग्लास पाणी, साखर उकळावे. त्यात चहा पूड टाकून गाळून घ्यावा. गार झाल्यावर जरदाळूचा रस टाकावा. दोन तास फ्रि जमध्ये ठेवून गार करून प्यावा.

मोगली चहा

  • साहित्य : पाणी – चार कप, साखर –  चार चमचे, चहा पावडर – चार चमचे, दूध – एक कप जायफळ, जायपत्री, वेलदोडा, लवंग, केशराची पूड प्रत्येकी पाच चमचा.
  • कृती : पाणी आणि साखर उकळवून घ्यावे. त्यात सर्व पूड टाकून घ्यावी आणि मिश्रण पुन्हा एक मिनिट उकळावे. त्यानंतर चहापूड टाकून तीन मिनिटे झाकून ठेवावे. गाळून घ्यावा आणि गरम गरम मोगली चहाचा आस्वाद घ्यावा.