गायत्री हसबनीस

दिवाळीची खरेदी लग्नाच्या खरेदीप्रमाणे संपतच नाही. नवीन कल्पना रचून नव्या वर्षी दिवाळीत घर सजवण्यासाठी काय काय करता येईल हा नेहमीच उद्भवणारा प्रश्न. हल्ली सोशल नेटवर्किंगवरून सजावटीच्या भन्नाट कल्पना शोधल्या जातात आणि विविध प्रयोग केले जातात. परंतु दिवाळीची खरेदी करण्यापूर्वी अशा क्रिएटिव्ह कल्पना करण्यापेक्षा दिवाळीसाठी बाजारात काय काय नवीन आलंय आणि त्यातून घर सजावटीसाठी काय करता येईल हे जाणून घेऊन त्याकरता अतिशय उत्सुक असणारा ग्राहकवर्ग मोठा आहे. दिवाळीची खरेदी टिपिकल ग्राहकाप्रमाणे न करता प्रॅक्टिकली करणारी आजची तरुणाई आहे. म्हणजे दिवाळीत घर सजवताना इकोफ्रेंडली आणि मल्टियुजेबल वस्तू वापरून कसं करता येईल या दृष्टिकोनातून भन्नाट काही करणारी ही पिढी आहे. आता बाजारात तर सणावाराला विविध ऑफर्ससह कित्येक क्रिएटिव्ह गोष्टी पाहायला मिळतील. कंदील, फेरी लाइट्स, चमचमणारे दिवे, नियॉन लाइट्स, पताका, लटकवलेले दिवे, एल.ई.डी. स्ट्रिंग इत्यादी स्वस्त दरात उपलब्ध झालेल्या गोष्टी या दिवाळीत सजावटीसाठी खरेदी करून घेता येतील. याशिवाय ई-मार्केटमध्ये नवीनच आलेल्या काही आऊट ऑफ द बॉक्स सजावटीच्या वस्तूंचा घेतलेला हा आढावा..

In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर

’ दिवाळीची सुरुवात होण्यापूर्वीच घर, ऑफिस आणि ठिकठिकाणी दिवाळीची सजावट सुरू होते. त्यामुळे आतापर्यंत बऱ्यापैकी बाजारावर नजर फिरवलेल्या ग्राहकांनी खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांचा सण; त्यामुळे हल्लीच्या ट्रेण्डप्रमाणे स्ट्रिंग लाइट्सचा फंडा वापरला जातोय. या दिव्यांच्या माळांमध्ये नानाविध आकार आहेत. स्पायरल स्ट्रिंग, वेव्ह स्ट्रिंग, बलून स्ट्रिंग, बबल स्ट्रिंग, हार्ट स्ट्रिंग, रोझ स्ट्रिंग, बॉल स्ट्रिंग या प्रकारचे स्ट्रिंग लाइट्स बाजारात दाखल झालेत. यंदा कमी ऊर्जेच्या एल.ई.डी. लाइट्सचा वापर केला जातो आहे. या लाइट्सवर ४० ते ६० टक्के सूट आहे. यामध्ये तुम्हाला कॉपर वायरच्या लाइट्स मिळतील. यातही पांढरा, पिवळा, गुलाबी, लाल, निळा, हिरवा असे रंग आहेत. हे स्ट्रिंग लाइट्स तुम्हाला १८५, २८५, २९९, ४४८, ५९९ रुपये अशा विविध किमतीत मिळतील. त्याचबरोबर लाइटिंग बॉटल्सही अनेकांना आवडतात. तुमच्या आवडीप्रमाणे यात सिंगल कलर आणि मल्टिकलर लाइट्स आहेत. या ग्लास बॉटल्स सिलेंडर, कॉनकेव्ह, श्ॉम्पेन बॉटल आणि कट ग्लास या आकारात उपलब्ध आहेत. यांची किंमत ४०० रुपयांपासून सुरू होऊन १,००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

’ कंदिलाचे वेड तर आजतागायत कायम आहे. घरात आणि घराबाहेर दरवाजावर लावलेलं कंदील म्हणजे मोठं  आकर्षण असतं. कंदिलावरचे डिझाइन पूर्ण घरभर दिव्यांच्या माध्यमातून परावर्तित व्हावे या विचाराने तसे डिझायनर कंदील घेतले जातात. बाजारात असे कंदील हमखास मिळतील. यात हँगिंग लॅम्प्सचा ट्रेण्ड सुरू आहे. त्यातही तुम्ही मल्टिकलर लॅम्प घेऊ  शकता. सिलेंड्रिकल, कोन, सर्कल, स्क्वेअर, स्टार, पेंडंट शेपमध्ये हे लॅम्प उपलब्ध आहेत. सिल्क, जूट, कॉटन, मेटल या फॅब्रिकमध्ये विविध प्रकारचे हँगिंग लॅम्प्स तुम्ही २४९ रुपयांपासून १,१९९ – २,५९९ रुपये इतक्या किमतीत विकत घेऊ  शकता. यंदा ‘लाल हवेली’ पेपर लॅम्प्सचा ट्रेण्ड आहे त्यामुळे सतरंगी शेड्समध्ये असलेले हे लॅम्प्स ४०० ते ५०० रुपयांत मिळतील. हे कंदील अगदी हॅन्डमेड आहेत. आपण घरीही बनवू शकतो. यात वॉल हॅगिंग आहे तसेच दर वर्षीप्रमाणे आकाशकंदील आणि पताका कंदिलला या वर्षीही जोरदार मागणी आहे.

ड्ट मेणबत्त्या आणि त्यांचे विविध आकार-प्रकार, त्यामागे असलेल्या हटके कल्पना नेहमीच पाहणाऱ्याला आकर्षित करतात. यातही टी-लाइट जास्त पाहायला मिळतील. यांचं वैशिष्टय़ म्हणजे सत्तर तासांपेक्षा जास्त वेळ या मेणबत्त्या प्रज्वलित राहतात. या फेमलेस आणि अ‍ॅन्टिस्मोक अशा आहेत. १०० रुपयांपासून यांची सुरुवात आहे. यातले टी-लाइट्स तर तुम्हाला अगदीच स्वस्त दरात मिळतील. १९९, २४८, ३४५, ४००, ५५० रुपये या दरात ते मिळतील. यातल्या एल.ई.डी बॅटरीवर चालणाऱ्या मेणबत्त्या २७०, २४९, ७९९ रुपयांपर्यंत मिळतील. यावर तुम्हाला टी-लाइट कॅण्डल होल्डरही मिळेल. मेटॅलिक होल्डरमध्ये बर्डकेज, लॅन्टर्न्‍स, मोरोकन लॅन्टर्न्‍स, टाएड रिबन्स असे काही प्रकार आहेत. यांची किंमत ४१०, ९९९, ३९९, ८२९, २२९, २८०, ५४९ रुपये इतकी आहे.

ड्ट यंदाच्या दिवाळीत मोती, लाइट्स, बीड्स यांची तोरणं मल्टिकलर आणि फॅन्सी स्वरूपात उपलब्ध झाले आहे. पण या वेळेस फ्लोरल म्हणजे फुलांमध्ये तोरणं जास्त पाहायला मिळतील. फुलांमधील तोरण २७०, २८० रुपये या किमतीत आहे तर मेरीगोल्डमधील तोरण ५२५ रुपयांत मिळेल. तोरणांमध्ये जयपुरी हॅण्डमेड डिझाइनही आहे. त्यातही लटकन, मणी, मोती आणि विविध स्टिचिंग केलेली तोरणं स्वस्त दरात मिळतील.

ड्ट पणत्या, दिवा, दिया या पारंपरिक सजावटीत मेटल दिया ३३५ रुपये, स्टोन वर्क दिया ३२५ रुपये आणि कुंदन वर्क दिया ५८० रुपये या वेगवेगळ्या दरांत मिळतील. यात मल्टिकलर दियासुद्धा आहेत. फ्लोरल शेपमधील दिया ५०० रुपयांपासून मिळेल. मातीच्या पणत्या लोटस, मटका, पानाच्या आकारामध्ये २५० रुपयांपासून सुरू आहेत. २७५, ३५० रुपयांपर्यंत विविध हाताने रंगवलेल्या पणत्याही सहज मिळतील. फ्लोटिंग दियाची क्रेझसुद्धा कायम आहे. त्यात तुम्हाला फ्लोरल शेपच्या पणत्या मिळतील. त्यामध्ये विशेष करून सिंगल कलर शेड्स आहेत. या तुम्हाला ३२५, ३७५, ४०० रुपयांत मिळतील. यात विविध फ्रेग्रन्स असलेल्या पणत्या ५००, ३५० रुपयांपर्यंत मिळतील. अरोमा दियात ग्रीन टी, आणि बांबू फ्रेग्रन्स आहेत. त्यामुळे यंदा प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा आणि इकोफ्रेंडली पणत्यांना जवळ करावे. जॅस्मिन, लव्हेन्डर आणि पिना कोलाडामध्येदेखील विविध सुगंधित पणत्या मिळतील.

दिवाळीत रोषणाईसह वातावरण सुगंधी करण्यासाठी आपण प्रयत्न करतोच मात्र अन्य सजावटीचे सामान घेतानाही कमीतकमी धूर किंवा धूर बाहेर पडणार नाही, प्रदूषण होणार नाही आणि पर्यावरणसंवर्धक असतील अशाच वस्तू बाजारात शोधून खरेदी करू या. पर्यावरण संवर्धक वस्तू वापराचा संकल्प या दिवाळी सणासाठी करून खऱ्या अर्थाने प्रकाशमान होऊ या..!