दिवाळीसाठी शॉपिंग करताना सगळीच शॉपिंग मॉल्स, शॉप्स किंवा ऑनलाइन करण्यापेक्षा रस्त्यांवरील लहान लहान टपऱ्या आणि ठेल्यांवरही लक्ष ठेवावे. नक्कीच एखादी हटके आणि ट्रेण्डी वस्तू मिळून जाईल. त्यामुळे स्ट्रीट शॉपिंगसाठी एक दिवस राखून ठेवा. रस्त्यावरची खरेदी वेगळी ठरण्यासाठी पायपीट मस्ट आहे, तशी कलात्मक नजरही. रस्त्यावरून काय खरेदी करावं आणि काय टाळावं?

बॅग्स

ट्रॅडिशनल कपडय़ांवर वापरता येतील अशा बॅग्स स्ट्रीट शॉपिंगमधून तुम्हाला मिळू शकतात. त्याचेही बरेच प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. बटवे, पर्सेस, क्लचेस, स्लिंग्स असे प्रकार इन आहेत. ३०० रुपयांपासून त्यांच्या किमती सुरू होतात.

फूटवेअर

दिवाळीसाठी फूटवेअर खरेदी करताना ते रस्त्यावरील ठेल्यांवरून घेऊ  शकता. कमी पैशात अत्यंत ट्रेंडी असे फूटवेअर मिळून जातील. घुंगरू, गोंडे, रंगीत स्टोन्स असलेल्या मोजडीज ट्रेंड इन आहेत. कोल्हापुरी चप्पल्ससुद्धा ट्रेण्डमध्ये आहेत. रस्त्यांवर २५० रुपयांपासून तुम्हाला हवे तसे फूटवेअर मिळतील. पण यातले टिकतील की नाही याची शाश्वती नाही. फेस्टिव्ह वेअरसाठी यूज अ‍ॅण्ड थ्रो पर्याय हवा असेल तर हा उत्तम.

ॅक्सेसरीज

ट्रेण्डी ज्युलरी तुम्हाला रस्त्यांवर मिळेल. सध्या चेन नथनी, मांगटीका (बिंदी), अँकलेट्स, गोंडेदार ब्रेसलेट्स किंवा बांगडय़ा अशी ट्रॅडिशनल ज्युलरी ट्रेण्डमध्ये आहे. तुमच्या शहरातील प्रसिद्ध शॉपिंग स्ट्रीटवर ही ज्युलरी तुम्हाला नक्कीच मिळेल. अगदी १०० रुपयांपासून याच्या किमती सुरू होतात.

टीम अप ॅक्सेसरीज

ओढणी, जॅकेट्स, बेल्ट्स, लटकन, गोंडे, लेस इत्यादी कपडय़ांशी टीम अप करता येईल अशा अ‍ॅक्सेसरी रस्त्यांवर मिळतील. जॅकेट्स आणि ओढण्यांचे असंख्य प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. १००, १५० रुपयांपासून यांच्या किमती सुरू होतात.

स्ट्रीट शॉपिंग करून तुम्ही खास दिवाळीसाठी पूर्ण लुक तयार करू शकता. त्यासाठी नजर सर्वत्र फिरती ठेवा. तुम्हाला नक्कीच क्लासी आणि ट्रेण्डी वस्तू मिळून जातील. हॅपी शॉपिंग!!