इन्स्टाग्राम, डबस्मॅश, फेसबुक, ट्विटर या गोष्टी केवळ टाइमपास करण्याच्या नाहीत, हे एव्हाना अनेकांच्या लक्षात आलंय. या समाजमाध्यमांचा अक्कलहुशारीनं वापर करून मार्केटिंग करता येऊ शकतं, हे तरुण कलाकार मंडळींच्याही ध्यानात येतंय. इंटरनेटच्या अशा वापरात आघाडीवर आहेत तरुण रंगकर्मीचे ग्रुप. या नाटकवाल्या मंडळींची ‘नेट’की नाटकं सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत.
‘ए गौरव, तू ते नवीन फेसबुक पेज बघितलास का रे? नाटकांची कसली भारी पब्लिसिटी केली आहे. डबस्मॅश काय, इन्स्टाग्रामचे फोटो काय, भारी ना!’.. असे संवाद व्हॉट्सअॅपवर रंगतात हल्ली. तरुणाईसाठी नाटक म्हणजे प्रचंड उत्साह, सळसळणारी ऊर्जा आणि खूप क्रिएटिव्हिटी. पण ही क्रिएटिव्हिटी फक्त रंगमंचावरच दिसत नाही तर, रसिक प्रेक्षकांना प्रेक्षागृहापर्यंत खेचून आणण्यासाठीसुद्धा ही क्रिएटिव्हिटी लागते. पेपरमध्ये जाहिरात देऊन नाटकांची पब्लिसिटी करणे ही नेहमीची पद्धत झाली. पण आता काळ बदलला आणि ऑल थॅंक्स टू नवीन टेक्नोलॉजी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपमुळे इन्होव्हेटिव्ह पब्लिसिटी प्लॅन बनवून सुंदर सुंदर नाटकं जगासमोर येऊ लागली. आजची ९० टक्के जनरेशन फेसबुक पेजवर आलेले व्हिडीयोज बघून, डबस्मॅश, क्रिएटिव्ह पोस्टर्स बघून नाटकं बघायला येते. म्हणूनच तरुण रंगकर्मीनी आता सोशल मीडियातून प्रसिद्धीचा फंडा राबवला आहे.
‘अथांग नाटय़ निर्मिती’ या संस्थेच्या सौरभ शाळीग्राम ने सांगितले की, लोकांपर्यंत आपली कला पोहचवण्याचा हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. आमचा टारगेट ऑडियन्स म्हणजे यंग ग्रुप, १८ ते ३० वयोगटातला. त्यामुळे त्यांच्यावर नाटकाच्या पब्लिसिटीचा काय इम्पॅक्ट होत आहे, हे लगेच जाणून घेणं महत्त्वाचं असतं. फेसबुक, व्हॉट्सअॅप यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे. फेसबुकमुळे नाटकाचा विषय जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचतो. थीम बेस्ड व्हिडीयोज पोस्ट केल्यावर लोकांना नाटकाचा एक शॉर्ट ट्रेलर मिळतो.
आणि फेसबुक, व्हॉट्सअॅप यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे. फेसबुकमुळे नाटकाचा विषय जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचतो. थीम बेस्ड व्हिडीयोज पोस्ट केल्यावर लोकांना नाटकाचा एक शॉर्ट ट्रेलर मिळतो. ‘वन्स इन अ ब्लू मून’ या आमच्या हॉरर कॉमेडी नाटकासाठी केलेले हे व्हिडीओज लोकांच्या मनात बसले आणि भरपूर प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियाचा अजून एक फायदा असा की, लोकांच्या कमेंट्स आणि लाईकवरून लगेच कळतं की, केलेली क्रिएटिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचली आहे की नाही. २५ लोकांच्या टीममध्ये प्रत्येकाच्या डोक्यातून भन्नाट कल्पना निघतात. त्याचाच वापर करून आम्ही सतत काही नवीन करण्याचा प्रयत्न करतो. ‘अथांग’च्या पेजला भेट दिल्यावर अशा किती तरी नवीन गोष्टी दिसतात.
‘डबस्मॅश’ हे नवीन अॅप बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचले आहे. याचा मुख्यत: उपयोग मस्ती आणि ग्रुपमध्ये टाइमपाससाठी केला जातो. पण याचाच उपयोग नाटकांच्या प्रसिद्धीसाठी नुकताच केला गेला. असा आगळावेगळा प्रयोग ‘नाटक कंपनी’ संस्थेच्या टीमने केला. नाटक कंपनीच्या मार्केटिंग टीमचा प्रशांत वैशंपायन म्हणाला की, ‘सोशल मीडियाचा सगळ्यात मोठा फायदा असा की, काहीही खर्च न करता आपण हजारो रसिकांपर्यंत पोहचू शकतो. मग जर इतका चांगला फायदा मिळाला आहेच, तर आपण त्याचा खूप क्रिएटिव्ह उपयोग केला पाहिजे. त्यामुळेच आम्ही दर वेळेला नाटकाच्या विषयानुसार सगळ्यात नवीन जे असेल त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतो. व्हॉट्सअॅपला ज्या वेळेस व्हॉइस नोट हा प्रकार नवीन इंट्रोडय़ूस झाला होता. आम्ही नाटकाच्या प्रचारासाठी त्याचा उपयोग केला. आणि आमचा प्रयोग हिट झाला. ‘नाटक कंपनी’चे ‘बिनकामाचे संवाद’ हे नाटक व्हॉट्सअॅपवरच आधारित आहे. मग त्याचा प्रचार पण त्याच माध्यमातून इफेक्टिव्ह होईल असं वाटलं. आणि ते खरं पण झालं. ऑडियन्ससोबत पर्सनल टच ठेवण्यासाठी आम्ही नाटकानंतर व्हिडीओ काढला आणि तो फेसबुकवर शेअर केला आणि स्वत:ला टॅग करायला सांगितलं. धिस वॉज अवर बेस्ट हिट. ‘दळण’ या नाटकाचा प्रचार गुडलक चौकात एल.ई.डी. वॉलवरून केला आणि त्यासोबत सेल्फी काढून पोस्ट केले. याचा आम्हाला खूप फायदा झाला. कमर्शियल नाटकांना लोक सेलेब्रिटी बघून येतात. पण प्रायोगिक नाटकांना तसं नसतं. त्यामुळे सोशल मीडिया हेल्प्स अ लॉट..’ प्रशांत सांगत होता.
एखाद्या नाटकाचे कॉमिक बुकसारखे एपिसोड्स आले किंवा खूप इन्होव्हेटिव्ह पोस्टर बघितलं तर तुम्हालाही ते नाटक बघावंसं वाटणारच ना?
पाइनअॅपल एक्स्प्रेशन या संस्थेच्या मार्केटिंग टीममधील अमित सावरगांवकर सांगतो की, व्हिडीयो टेस्टिमोनियल्स लोकांना खूप अॅट्रॅक्ट करतात. लोकांना ते आपलंसं वाटतं. त्यामुळे नाटक बघणाऱ्यांच्या संख्येतपण बरीच वाढ झाली आहे. आज लोकांच्या हातात एका क्लिकवर सगळं उपलब्ध असतं, त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचणं फार सोपं झालं आहे. आम्ही खूप क्रिएटिव्ह पोस्टर्स तयार केली आहेत. त्यामुळे यंग डिझायनर्सना पण खूप स्कोप मिळतो आहे. ‘इंस्टाग्राम’सारख्या ओन्ली फोटो यूसेज साइट्समुळे तिकिटांचे फोटोज मस्त पोस्ट लिहून टाकता येतात. ते फार इफेक्टिव्ह असतं.’
प्रेक्षकांना नाटकापर्यंत आणण्यासाठीदेखील स्किल लागतं आणि इट्स अ टीमवर्क. हे सिद्ध केलंय आयपीटीए (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) च्या यंग ग्रुपच्या मार्केटिंग टीमने. त्यातलाच एक अमृत समक. त्यानं हे टीमवर्क समजावून सांगितलं. ‘जेव्हा आपण व्हॉट्सअॅपच्या ब्रॉडकास्ट मेसेजने लोकांना मेसेज पाठवतो तेव्हा लोकांना ते पर्सनल इन्व्हिटेशन दिल्यासारखे होते. यंग डिझायनर्सना पण खूप स्कोप मिळतो. त्यामुळे बेस्ट क्वालिटी पोस्टर्स आम्हाला मिळत आहेत. आम्ही एकाच नाटकासाठी खूप व्हरायटीची पोस्टर्स तयार केली. यामुळे आमच्या ‘मनातले सारे’ या नाटकाला खूप छान प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियाचा शक्य तेवढा वापर करून आम्ही ही पोस्टर्स व्हायरल करतोय.’
व्हिडीयो, फोटोज, पोस्टर्स, अशा बऱ्याच गोष्टी तयार करून फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, हाइक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियामधून समोर आणल्या जाताहेत. नेटवरची ही नाटकंच नाटकांच्या पब्लिसिटीसाठी उपयोगी आहेत.