पंचेंद्रियांतील सर्वात बोलका अवयव म्हणजे डोळे. कधी कधी काही न बोलताही डोळे बरंच काही बोलून जातात. नृत्यकलेतदेखील चेहऱ्यामधील डोळ्यांचे हावभाव त्या नृत्याविष्काराचे अर्धे काम करतात. एखाद्याच्या मनाचा ठाव घेण्यासाठी डोळे महत्त्वाची भूमिका बजावतात. मग याच डोळ्यांना आणखी उठावदार करण्यासाठी आय मेकअप केला जातो. आय मेकअप हा सेल्फ कॉन्फिडेन्टचा चांगला उपाय आहे. कुठेही बाहेर जाताना विदाऊट मेकअप जाण्यापेक्षा फक्त आय मेकअप जरी केला तरी आपल्या गेटअपमध्ये वेगळी शान येते. एक काजळाची रेघसुद्धा वेगळं सौंदर्य देते आणि त्यामुळे कॉन्फिडन्स वाढवते. हा मेकअप कसा करावा याच्या टिप्स.

आय मेकअप कसा करावा.

  • रोजच्या वापरात आय लायनर, काजळ वापरायचं झाल्यास ते चांगल्या कंपनीचं वापरावं. कारण काही नकली प्रॉडक्ट्स डोळ्यांना हानी पोहोचवू शकतात. डोळ्यातून पाणी येणं, डोळे लाल होणं हे त्याचेच काही दुष्परिणाम आहेत.
  • काजळ किंवा लायनर लावताना अति ठळक किंवा ब्रॉड लावू नये याने डोळ्यांखाली काळं होण्याची शक्यता असते.
  • लायनरचा रंग डोळ्याला साजेसा घ्यावा. काही वेळा मुली निळा, हिरवा रंग बाजारात नवीन आला असल्यामुळे घेतात आणि कोणत्याही प्रसंगी लावतात. ते दिसायला खूप भडक दिसतं. असे रंग एखाद्या खास कार्यक्रमांसाठीच वापरावेत आणि अशा वेळी लायनरची रेघही बारीक ठेवावी.
  •  आय मेकअप डार्क करणार असाल तर लीप मेकअप लाइट असावा. दोन्हीही डार्क असल्यास मेकअप गॉडी वाटू शकतो.
  •  लग्नासाठी किंवा खास कार्यक्रमासाठी संपूर्ण डोळ्याचा मेकअप करायचा झाल्यास प्रथम आयश्ॉडोज लावाव्या, त्यानंतर लायनर मग काजळ आणि शेवटी मस्कारा आणि हवे असल्यास आयब्रो पेन्सिल. मेकअपचा क्रम अशाच रीतीने असावा नाही तर मेकअप खराब होण्याची शक्यता असते.
  • रोजच्या वापरामध्ये आयश्ॉडोजचा वापर टाळावा. सकाळचा कार्यक्रम असल्यास लाइट शेड्सच्या आयश्ॉडोज वापराव्या व रात्रीच्या कार्यक्रमासाठी डार्क शेड्स. शिवाय कोणताही रंग लावण्याआधी संपूर्ण डोळ्यांना स्किन टोन शेड्सच्या आयश्ॉडोज लावाव्या.
  • आय मेकअपचे कोणतेही प्रॉडक्ट्स लाँग लास्टिंग असतील तर जास्त चांगलं, कारण दिवसातून चार चार वेळा आय मेकअप केल्यास डोळे आणि त्याजवळची नाजूक त्वचा खराब होऊ शकते.
  • मेकअप काढायच्या वेळी तो आय-मेकअप रिमूव्हर सोल्यूशनने किंवा खोबरेल तेलाने काढावा. डोळ्यांचा मेकअप तसाच ठेवून झोपल्यास डोळे लाल होतात आणि लायनर डायरेक्ट पाण्याने धुतल्यास स्प्रेड होऊन चेहरा काळवंडण्याची, डार्क सर्कल्स येण्याची शक्यता असते.

15ट्रेण्डमध्ये काय? आय मेकअपमध्ये कॅट आईज आणि स्मोकी आईज हे ट्रेण्ड अजून चलतीत आहे. हे मेक-अप करताना त्याला अनुसरून ब्रश, पेन्सिल ही साधनं आवश्यक आहेत. स्पार्कलिंग आइज किंवा चमचमता आय मेक-अप सध्या ट्रेण्डमध्ये आहे. त्याला अनुसरून रेव्हलॉननं फोटोरेडी आय आर्ट नावानं वेगळी रेंजच बाजारात नुकतीच आणली आहे. एका बाजूला लाइटवेट, क्रीमी, सहज ब्लेंड होतील असे तर दुसऱ्या बाजूला ब्राइट स्पार्कल असलेले हे रंग आहेत.सूट होतंय का आणि जमतंय का ते पाहूनच हे रंग अॅप्लाय करावेत.