गायत्री हसबनीस

डोळ्यांवरच्या पापण्या अजून खुलून दिसाव्यात म्हणून आपण आयलाईनरला जवळ करतो. सणासुदीचे दिवस आहेत त्यामुळे नुसत्या आय शॅडोपेक्षा त्यावर आकर्षक रंगाची एक पट्टी उठलीच पाहिजे. त्यातून हल्ली डार्क रंगाचे आयलाईनर विकत घेतले जात असताना ट्रेण्डमध्ये असलेल्या सिंपल रंगांपेक्षा जरा डल, मडी, ऑफबीट रंग म्हणजे डार्क ब्लू, ग्रीन, ऑरेन्ज आणि अर्थात ब्लॅक या रंगाना पसंती आहे. शॅडो कलर किंवा काळ्या रंगसंगतीत मोडणाऱ्या रंगांना या सीझनमध्ये तुमच्या ट्रॅडिशनल आऊ टफिटवर नक्कीच वापरता येतील. काही खास व फेमस ब्रॅण्डसनी या वेळेसही नेहमीप्रमाणे आपल्या ग्राहकांची मागणी पूर्ण करायचा प्रयत्न केलाय.

ड्ट २०१८ पासून रेड रंगाच्या आयलाईनरला वाव मिळालेला नाही. ज्यांचे डोळे घारे आहेत त्यांच्या डोळ्यांना शोभतील असे बेबी पिंक, डार्क ब्राऊन किंवा हेवी शिमर असलेले सर्व गडद रंग ट्रेण्डमध्ये आहेत.

ड्ट सर्वप्रथम ‘वोव’या ब्रॅन्डने ब्लॅक मॅट आयलाईनर स्वस्त दरात उपलब्ध केले आहेत. त्यात तुम्हाला स्पेशल पॅक्सही मिळतील. साधारण १०० रुपयांपासून त्यांची किंमत आहे. रिव्लॉनचं ‘फॅ ब्यूलाईनर’ हे प्रॉडक्ट बरंच चर्चेत आहे. ५०० ते ६५०, ६९० रुपयांपर्यंत याची किंमत असून फेस्टिवल सीझनमध्ये याला मागणी आहे. स्मजप्रुफ आणि वॉटरप्रुफ असं हे आयलाईनर आहे.

ड्ट या सीझनमध्ये लवकर वाळेल असं आयलाईनर तरूणी विकत घेतात तेव्हा सर्वात योग्य निवड म्हणून मेबिलिन न्यूयॉर्क च्या ‘हायपर इन्क आयलाईनर’ला पसंती मिळेल. फास्ट ड्रायिंग आणि स्मुद लेयरिंग हे त्याचं वैशिष्ठय़ आहे.

ड्ट फेसेसचे लॉन्गवेअर आयलाईनर वेगवेगळ्या शेड्समध्ये उपलब्ध आहेत. डीम ब्लू, डार्क ब्राऊ न अशी वेगळी छटाही तुम्ही वापरू शकता. नेव्ही ब्लू तसा कॉमन झाला आहे त्यामुळे न्यूड किंवा लाईट ब्राऊ न रंगांना सध्याच्या फेस्टिवल सीझनमध्ये मागणी आहे. साधारण ४९९ रुपयात हे आयलाईनर मिळतील. चारकोलमध्ये मॅकची पॉवरआय पेन्सिल तर ‘एनव्हायएक्स’चे जब्बो आयलाईनर उपलब्ध आहे. कोल्हची खासयित असलेले बरेचसे आयलाईनर ‘नायका’वर उपलब्ध आहेत. ज्यावर १० ते १५ टक्के सूट आहे. अजून आयलाईनरवर जास्त ऑफर्स नाहीयेत पण पुढच्या आवडय़ापासून ‘नायका’ व अन्य वेबसाईट्सवर किमान १० टक्कय़ांच्यावर ऑफर्स दिसतील. ४६८, ५००, ५५० रुपयांपर्यंत कोल्हचे आयलाईनर मिळतील. याशिवाय, रिव्लॉनचा ‘कॉल्ह अ‍ॅन्ड काजल’ आयलाईनर २२३ रुपयांपासून उपलब्ध आहे.

ड्ट  ट्रेण्डमध्ये असलेले रंग व्यक्तिमत्त्वानुसार आणि आवडीनुसार बदलतात. डार्क ग्रीन हा कलर बऱ्याचदा वापरला जाता. सिनेमांमध्ये ट्रॅडिशनल वेअरवर डार्क शेड्स असणारेही आयलाईनर्स वापरले जात आहेत. विविध रंगांचे आयलाईनर हे जेल अथवा पावडरपेक्षा लिक्विडचे वापरलेले कधीही चांगले. मॅकचे लिक्विड आयलाईनर या सीझनला वापरू शकता. ज्यात ब्राऊ न, मरून, ब्लॅक, ग्रीन असे गडद रंग विथ शिमर १,९५० रुपयांपासून मिळतील. मेबिलिनकडून डार्क रंगातील ग्लॉसी इमर्लंड, लस्ट्रॉस सॅफरिन ब्लू, स्लिक ओनिक्स, सॉफ्ट न्यूड, स्ट्राईकिंग कूपर असे नानाविविध शेड्स उपलब्ध आहेत. ६ टक्के सूटसह नॉर्मल रेंन्जमध्ये ४५० रूपयांपुढे यांची किंमत आहेत. लॅक्मेकडून नाईन टू फाईव्ह या प्रॉडक्ट अंतर्गत ब्राऊ न, ब्लॅकमध्ये १०० रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यंत आयलाईनर आहेत. ४७४ रुपयांपर्यंत तुम्हाला लॅक्मेचे ‘प्रेशियस लिक्विड’ आयलाईनर मिळेल.

ड्ट थोडय़ा कमी किंमतीत ‘एले १८’चे वॉटर रेझिस्टंट आयलाईनर ८५ रुपयांपासून ते १५०, १६० व १८० रुपयांपर्यंत मिळेल. योग्य व स्वस्त दरात उपलब्ध असणारे आयलाईनर विकत घ्यायचे असतात तर त्यासाठी ई कॉमर्स वेबसाईटवर रेटिंग्स पाहून आणि ‘इन स्टॉक’ असेल तर नक्कीच घ्या.

ड्ट विशेष म्हणजे बऱ्याच तरूणी बॅगत आपले आयलाईनर ठेवतात त्यामुळे त्यांची पसंती ही जास्त पेन्सिल आयलाईनरला असते. त्यात मेबिलिनचे लॉन्ग लास्टिंग पेन्सिल आईलाईनर तसेच अ‍ॅसेन्सचे लॉन्ग लास्टिंग पेन्सिल आयलाईनर उपलब्ध आहेत. १६९, २३५, ४२० रुपयांपर्यंतची रेंज यात आहे. त्यातून लॅक्मेचे आयकॉनिक फाईन निब पेन्सिल आयलाईनर ३५०, ३७८ रुपयांपर्यंत मिळू शकेल. मेबिलिनचे कोलोस्सल पेन आयलाईनर सगळ्यांनाच आवडते त्यामुळे ४५० रुपयांपर्यंत ते उपलब्ध आहे.

viva@expressindia.com