08 March 2021

News Flash

फॅशनेबल

समर म्हणजे कपडय़ांआधी लक्ष वेधून घेतात त्या म्हणजे अ‍ॅक्सेसरीज.

फॅशन डिझाइनर्स आणि मोठमोठे फॅशन ब्रँड्सचे समर कलेक्शन्स आता ठिकठिकाणी स्टोअर्स-मॉलमधून दिसू लागतील. मार्केटमध्ये उन्हाळा सुखकर जावा यासाठी खास कूल कलर्स आणि कूल फॅशनचे कपडे यांची रेलचेल दिसेलच. मात्र समर म्हणजे कपडय़ांआधी लक्ष वेधून घेतात त्या म्हणजे अ‍ॅक्सेसरीज. त्यामुळे सध्या फॅशनेबल अ‍ॅक्सेसरीज काय वापरता येतील, यावर एक नजर टाकूयात..

इअररिंग

दोन्ही कानांत कानातले घालणे हे अगदी आधीपासून चालत आलेली प्रथाच आहे. पण सध्या या प्रथा धडाधड मोडून पडताहेत, त्यात असंख्य बदल झालेत आणि होत आहेत. दोन्ही कानांत कानातले घातलेच पाहिजेत ही रीत आता मोडीत निघाली आहे. ‘लॅक्मे फॅशन वीक’च्या रॅम्पवर अनेक शोमध्ये मॉडेलच्या फक्त एकाच कानात कानातले घातलेले होते. त्यामुळे फक्त एका कानात कानातले घालायची फॅशन आहे यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. त्याखेरीज इअररिंगच्या फॅशनमध्ये पुन्हा नव्वदचा काळ परतल्याचं दिसून येत आहे. त्या वेळी प्रसिद्ध असलेल्या हूप्स् अर्थात मोठय़ा मेटलच्या रिंगा पुन्हा फॅशनमध्ये आल्या आहेत. हे हूप्स् ट्रॅडिशनल ते वेस्टर्न अशा कोणत्याही आउटफिटवरती तुम्ही घालू शकता. इअररिंगचा आकार सहसा समान असतो, परंतु यंदा रॅम्पवर असमान आकाराच्या इअररिंग्जही दिसल्या.

नेकपीस

नेकपीसमध्ये गेल्या काही वर्षांपासून चोकरला खूप पसंती आहे. साधे बारीक, काळ्या रंगातल्या चोकरला अनेकांनी  स्टाइल स्टेटमेंट म्हणून मिरवलं. हेच स्टाइल स्टेटमेंट यंदा अजून एका वरच्या लेव्हलमध्ये रॅम्पवरती दिसलं. चोकरमध्ये सुंदर खडय़ांचे, मेटलचे चोकर फॅशनमध्ये आले आहेत. हे चोकर एकदम क्लासी दिसतात. आणि हे कोणत्याही प्रकारच्या आउटफिटवरती सहज जातात.  यासोबतच चंकी नेकपीसही ट्रेंडिंग आहेत. सिल्व्हर रंगाची हे चंकी नेकपीस साध्याशा ड्रेसला वेगळाच लुक आणतात. आणि ही ज्वेलरी सहसा योग्य काळजी घेतली तर लवकर खराबही होत नाही. कानातल्याच्या असमान आकारांप्रमाणेच नेकपीसही दिसून आले.

आयवेअर

आयवेअरमध्ये चष्म्यामध्ये  टॉर्टॉइज शेलची फ्रेम असणारा चष्मा, क्लिअर व्हाइट फ्रेम असणारा चष्मा, ब्लॅक रीम्ड फ्रेम चष्मा, गोल्ड मेटल वायरफ्रेम ग्लास अशा चष्म्याच्या फ्रेम्स ट्रेंडिंग आहेत. तर चष्म्याच्या शेपमध्ये चौकोनी, गोल, अ‍ॅव्हिएटर शेप, ओवरसाइज हे ट्रेंडिंग आहेत.

सनग्लासेसमध्ये गोल, चौकोनी आकाराचे रेट्रो  सनग्लासेस, ट्रान्सपरन्ट सनग्लासेस, लाल, नारंगी, पिवळ्या रंगाची शेड असणारे सनग्लासेस ट्रेंडिंग आहेत.

बॅग्ज

बॅग्जमध्ये फनी पॅक्स हा बॅगचा प्रकार बघायला मिळतो आहे. या छोटय़ाशा बॅगा तुम्ही कुठेही कॅरी करू शकता. वेगवेगळ्या आकारांतल्या या बॅग्ज तुम्ही तुमच्या आउटफिटनुसार निवडू शकता. यासोबतच छोटय़ा बॅकपॅक, हॅन्डबॅग, स्लिंग बॅगही ट्रेंडिंग आहेत. आणि या बॅग्जमध्ये जास्तीत जास्त पेस्टल रंगाच्या शेड फॅशनमध्ये आहेत. काही फॅशन डिझाइनरच्या शोजमध्ये सुंदर क्लचेसचा वापर दिसला. सुंदर भरजरी ड्रेसवरती वेगवेगळे खडे, सिक्वेन्स, एम्ब्रॉयड्रीची एम्बलिशमेंट दिसली. हे क्लचेस तुम्ही नक्कीच कोणत्याही ट्रॅडिशनल, जड अशा आउटफिटवरती कॅरी करू शकता.

बेल्ट्स

साडीवरती आपण नाजूक कमरपट्टा घालतो. पण साडीवरती लेदर, फर, कापडाच्या अशा वेगवेगळ्या बेल्ट्सनी जागा घेतली आहे. त्यामुळे कमरपट्टय़ासारखे असे वेगवेगळे बेल्ट साडीवरती घालून बघायला काहीच हरकत नाही. मुलींच्या बेल्टचा आकार हा जास्तीत जास्त लहानच असतो पण आता मोठय़ा आकाराचे बेल्ट्स ट्रेंडिंग आहेत. बेल्ट्सचा वापर स्कर्ट आणि टॉप, साडी, कुर्ती, गाऊ न आणि वनपीस अशा वेस्टर्न कपडय़ांवरतीही  नक्कीच करून बघा.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 5:26 am

Web Title: fashion accessory fashion design
Next Stories
1 ‘कट्टा’उवाच : पोक पोक ..
2 ‘पॉप्यु’लिस्ट : शहरांवरची शब्दप्रतिभा!
3 ब्रॅण्डनामा : वुडलॅण्ड
Just Now!
X