04 June 2020

News Flash

फॅशन फ्लॅशबॅक

तुमच्या फॅशनविषयक शंका, सल्ले किंवा अडचणी आम्हाला viva@expressindia.com या मेलवर पाठवत रहा

सरत्या वर्षांत फॅशनच्या दुनियेत खूप छान छान बदल झाले. सुटसुटीत सिम्पल पण क्लासी फॅशनचं हे वर्ष होतं. क्रॉप टॉप्स, पलाझो, रीप्ड जीन्स, फ्लेयर्ड स्कर्ट्स, प्लिटेड स्कर्ट्स, फ्लोरल प्रिंट्स याला या वर्षांत खूपच लोकप्रियता मिळाली. इंडियन वेअर्समध्येसुद्धा वेगवेगळे छान बदल झाले. तसंच आता असलेल्या वेडिंग सीझनमध्ये पेस्टल कलर्स खूप इन आहेत.
या वर्षीचे विमेन्स फॅशन ट्रेंड्स हे कॉन्फिडन्स आणि एलीगन्स या दोन थीम्सना वाहिलेले दिसले. हे ट्रेण्ड्स खूपच सिम्पल पण तरीही क्लासी आहेत. कोणत्याही ऑकेजनला सूट होणारे आऊटफिट्स या वर्षांत दिसले. साडी, गाऊन, अनारकली, पलाझो विथ क्रॉप टॉप, लाँग स्कर्ट आणि वेगवेगळ्या फॅशनचे श्रग या वर्षांत प्रामुख्याने दिसले. ही सारी आऊटफिट्स फ्युजन वेअरमध्ये मोडू शकतील. मिक्स अ‍ॅण्ड मॅच हा या फॅशनचा मंत्र. अशा मिक्स अ‍ॅण्ड मॅचमध्ये तुमची कलात्मकता दाखवण्याची संधी असते आणि तुमची स्टाइल दुसऱ्या कुणाच्या स्टाइलशी मिळती-जुळती होण्याची शक्यता फार कमी असते. हा युनिक फॅशन सेन्स मिक्स अ‍ॅण्ड मॅचमुळे मिळतो. तुम्हाला कॉलेज संपल्यावर पटकन तयार होऊन एखाद्या पार्टीला जायचं असो किंवा सिम्पल फ्रेण्ड्स गेट टुगेदर असो, एखादा मस्त स्कर्टवर किंवा पलाझो पॅण्टवर ऑकेजननुसार क्रॉप टॉप किंवा एथनिक टॉप मॅच केलात की, क्षणात लुक बदलू शकतो आणि काही क्षणांत तुम्ही रेडी होऊ शकता.
सन २०१५ हे वर्ष पेस्टल कलर्सचं होतं, असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर रेड, ब्लू, यलो, ग्रीन या कलर्स च्या शेड्ससुद्धा इन होत्या.कुठली फॅशन कुणाला सूट होईल, स्टाइलिंग टिप्स या विषयावर या वर्षभरात मलाइका अरोरा खान आणि डिझायनर अमित दिवेकर यांनी ‘व्हिवा’मधून वाचकांना मार्गदर्शन केलं. आता २०१६ चं वर्ष नवीन काही फॅशनविषयक सदरं घेऊन येत आहोत. नवीन वर्षांचा कलर ऑफ द इअर कोणता, लेटेस्ट फॅशन ट्रेण्ड काय आणि ते कॅरी करण्याचा फॅशन मंत्र कोणता हे ‘व्हिवा’मधून नवीन वर्षांतही सांगत राहूच. बी फॅशनेबल, बी कॉन्फिडण्ट हा २०१५ चा फॅशन मंत्र मात्र विसरू नका. तुमच्या फॅशनविषयक शंका, सल्ले किंवा अडचणी आम्हाला viva@expressindia.com या मेलवर पाठवत रहा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2015 1:40 am

Web Title: fashion trends in 2015
टॅग Viva
Next Stories
1 डिजिटल गोळाबेरीज
2 शेवटची प्ले लिस्ट!
3 राम राम!
Just Now!
X