तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

एलिझाबेथ गिल्बर्ट या लेखिकेची खास शैली म्हणजे आजची प्रत्येक स्त्री तिच्या लिखाणाशी रिलेट होऊ  शकेल. तिच्या ‘इट प्रे लव्ह’ या पुस्तकातील ही ओळ विशेष आवडते. याचे कारण असे की प्रत्येक स्त्रीच्या मनात कुठे तरी न्यूनगंड असतो. मी कशी दिसते?, मी किती परिपूर्ण आहे?,  अशा प्रश्नांची उत्तरं शोधत आजची स्त्री सतत इतरांशी स्वत:ची तुलना करत असते. आयुष्य कधीच परिपूर्ण नसतं. ते जसं असेल तसं आपल्याच हाताने खुलवायचं, सुंदर बनवायचं असतं. आपल्यावर आजूबाजूच्यांकडून खूप अपेक्षांचं, त्यांच्या मतांचं ओझं असतं. त्यात आपण स्वत:ला गुरफटून घेतो. हा अपेक्षांचा भार आपण खरं तर कमी करायला हवा, हेच विसरून जातो. आपल्याला कोणाच्या तरी वर पोहोचायचं आहे, ही भावना आपल्याकडे काय सुंदर आहे हेच विसरायला लावते. दुसऱ्यांच्या अपेक्षांपेक्षा आपलं हे सुंदर गोष्टींचं संचित प्रत्येक स्त्रीने आयुष्यभर जपलं पाहिजे.
शब्दांकन – गायत्री हसबनीस