शीर्षक बघून आश्चर्यचकित होऊ नका. दाग द फायर’, ‘भावना द इमोशनअशा धर्तीवर चित्रपट निर्मित्तीचा विचार नाही आमचा. अहो, मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहायला परवडत नाही आम्हाला. निर्मिती कुठून करणार.

पिक्चर नाही, पण तगडी स्टोरी आहे ही. तूर्तास स्टोरी वाचा, नशीब उघडलं तर पिक्चरचं बघू.

Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
couple romance at noida delhi metro station
VIDEO : मेट्रो स्टेशनवर रोमान्स करताना दिसले कपल; एकमेकांना किस करतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल, नेटकरी संतापले
Pakistani Singer Shazia Manzoor Slaps Co host on Live Show
पाकिस्तानी गायिकेला ‘हनिमून’ विषयी विचारला प्रश्न; लाइव्ह शोमध्येच होस्टच्या कानाखाली लगावली, पाहा धक्कादायक व्हिडीओ

शालेय अभ्यासक्रमात तुम्ही व्याकरण शिकला असाल. (सीबीएसई, आयसीएसई, बालभारती- कुठलंही असो) कर्ता-कर्मणी-भावे प्रयोग, उभयान्वयी अव्यय, अ‍ॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस.. या व्याकरण पसाऱ्यात ‘कॉमा अर्थात स्वल्पविराम’ तुमच्या कानी पडला असेल. पायथागोरसच्या प्रमेयाचा आम्ही दैनंदिन आयुष्यात वापर केला नाही अद्याप; पण मि. कॉमा तुमच्या-आमच्या आयुष्याचा भागच झालेत. कम्प्युटरवर, की बोर्डवर लिहा किंवा कागदावर लिहा. कॉमा इटुकला असतो, पण तो वाक्यात कधी लिहायचा यावरून उपशाखा तयार झाल्या आहेत. ‘ऑक्सफर्ड कॉमा’ नावाचा प्रकार रूढ केलाय ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने. त्याला ‘सीरियल कॉमा’ असंही म्हणतात. काय शाळा घेताय राव असं वाटेल तुम्हाला, पण हे समजून घेणं आवश्यक आहे.  ‘आशिर्वाद की आशीर्वाद’ हे इतक्या वर्षांत पक्कं करू शकलेलो नाही आम्ही अजून, तुमची काय शाळा घेणार आम्ही..  तर कधी वापरतात ऑक्सफर्ड कॉमा? वाक्यातल्या शेवटच्या आणि त्याआधीच्या शब्दांदरम्यान दिला जातो तो कॉमा. उदाहरणार्थ (कोसला कादंबरीत नेमाडे म्हणतात तसं नाही. हे नॉर्मल उदाहरण) माझे पालक, उसेन बोल्ट आणि स्टेफी ग्राफ ही माझी प्रेरणास्थानं आहेत. या वाक्यात बोल्टनंतर कॉमा नसल्याने बोल्ट आणि स्टेफी माझे पालक आहेत असं वाटू शकतं. ऑक्सफर्ड कॉमा देण्यामागची ही भूमिका. ऑक्सफर्ड आहे इंग्लंडमध्ये, पण कॉमावरून जुगाड झालाय अमेरिकेत. ग्लोबलायझेशन हो, दुसरं काय!

अमेरिकेच्या उत्तर प्रांतात ‘मेन’ नावाचा भाग आहे. या मेनमध्ये पोर्टलँडमध्ये ‘ओकहर्स्ट डेअरी’ नावाची दुग्धजन्य पदार्थ तयार करणारी प्रसिद्ध कंपनी आहे. १९१८ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचा टर्नओव्हर ११० मिलियन डॉलर्स एवढा आहे. म्हणजे ११० वर सहा शून्य.  दुग्धजन्य पदार्थाची ने-आण करण्यासाठी पांढऱ्या बॅकग्राऊंडवर लाल अक्षरात ओकहर्स्ट असं ब्रँडिंग असणारे ट्रक आहेत. ते चालवण्यासाठी अर्थातच ड्रायव्हर मंडळी आहेत. या मंडळींनी नेमून दिलेलं काम पूर्ण केलं. मात्र आवश्यकता असल्याने त्यांना ओव्हरटाइम करावा लागला, तोही केला त्यांनी. यासाठी कंपनीने त्यांना अतिरिक्त पैसे देणं स्वाभाविक होतं. पण नियमांवर बोट ठेवून कंपनीने ओव्हरटाइमचे पैसे द्यायला नकार दिला. चर्चा, बोलणी असे सनदशीर मार्ग अवलंबून झाले पण कंपनी बधली नाही. तिकडच्या कामगारांची स्थिती आपल्यासारखी नसल्याने त्यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारला. कंपनीने नियमांचा आधार घेतला. स्थानिक न्यायालयाने कंपनीच्या बाजूने निर्णय दिला. कामगार खचले नाहीत, ते वरच्या कोर्टात गेले. या कोर्टाने चक्क कामगारांच्या बाजूने निर्णय दिला. मदतीला धावून आला ‘एक कॉमा’. ‘कॅनिंग, प्रोसेसिंग, प्रीझवर्ि्हग, फ्रीझिंग, ड्रायिंग, मार्केटिंग, स्टोअरिंग, पॅकिंग फॉर शिपमेंट ऑर डिस्ट्रीब्युशन ऑफ- १. अ‍ॅग्रीकल्चरल फूड, २. मीट अँड फिश प्रॉडक्ट्स आणि ३. पेरिशेबल फूड्स. वरील वाक्यातल्या कामांसाठी ओव्हरटाइम पैसे मिळणार नाही असा नियम आहे. कामगारांच्या वकिलांनी नियम भिंगाखाली धरून सखोल वाचला. ‘पॅकिंग फॉर शिपमेंट ऑर डिस्ट्रीब्युशन ऑफ’ यांच्यात कॉमा नाही. आधीच्या ‘इंग’ प्रत्ययांत कृतींदरम्यान कॉमा आहे, पण इथे नाही. कॉमा नसल्याने पॅकिंग आणि डिस्ट्रीब्युशन अपवाद आहे असा तर्कवाद कामगारांच्या वकीलसाहेबांनी मांडला. जगात एवढे प्रॉब्लेम आहेत, एवढय़ाशा कॉमाने काय होतंय असं वाटेल तुम्हाला. पण कामगारांच्या ४ वर्षांच्या अतिरिक्त काम मोबदल्याचा म्हणजेच साधारण १० मिलियन डॉलरचा प्रश्न होता. कंपनीच्या वकिलांनी हा शब्दच्छल असल्याचं म्हटलं. खूप ताणाताणी झाली. मेन प्रांतातल्या कोर्टाच्या स्टाइलबुकनुसारही ऑक्सफर्ड कॉमा देणं अनिवार्य नाहीये पण या कोर्टाने स्थानिक कोर्टाचा निर्णय बदलला. ‘नियमांतील वाक्यात एका विशिष्ट ठिकाणी कॉमा नसल्याने ओव्हरटाइम कुठल्या गोष्टींसाठी मिळणार आणि कुठल्या गोष्टींसाठी नाही याबाबत संदिग्धता आहे. कामगारांनी अतिरिक्त काम केलं आहे हे कंपनीच्या रेकॉर्डवरून सिद्ध झालं आहे. ओव्हरटाइमचे पैसे न देण्यासाठीच्या नियमांमध्ये स्पष्टता नाही. वरकरणी हा कॉमा गौण वाटू शकतो. पण कॉमाकडे दुर्लक्ष केल्यास कामगारांना हक्काच्या पैशापासून वंचित राहावे लागेल’, असे कोर्टाने सांगितलं.

कोर्टाच्या निर्णयामुळे त्या कामगारांना ओव्हरटाइमचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘ध’ चा ‘मा’ वरून झालेले रामायण तुम्हाला ठाऊक आहेच. पण इथे तर एका छोटं चिन्ह कंपनीला शेकणार आहे. कॉमाची गोष्ट व्हायरल झाल्याने अनेक कंपन्यांनी लेबर लॉ, एम्प्लॉइज कॉन्ट्रॅक्स तपशीलवार अभ्यासाला सुरुवात केलेय अशी वार्ता आहे. ऑक्सफर्ड कॉमा इंग्लंडमधून आलेला आणि गंमत म्हणजे ओकहर्स्ट कंपनीच्या प्रॉडक्ट्सचं मुख्य मार्केट आहे इंग्लंड. म्हणजे आपलाच कॉमा आणि आपलाच फुलस्टॉप प्रकार! ‘कॉमा’ प्रकरणातून कंपनी ‘कोमात’ जाऊ नये एवढीच आपली प्रार्थना..

viva.loksatta@gmail.com