News Flash

Watchलेले काही : ग्रॅण्ड घरगुती सर्कस

सर्कशीच्या प्रत्येक जाहिरातींत सायकल चालविणारा मकाऊ पोपट किंवा कुत्रा यांची चित्रे हमखास असत.

गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ.

सर्कसच्या अनेक आकर्षणांमध्ये त्यातल्या पाळीव (किंवा जंगली-पाळीव) प्राण्यांनी केलेल्या करामती महत्त्वाचा भाग असतात. सर्कशीच्या प्रत्येक जाहिरातींत सायकल चालविणारा मकाऊ पोपट किंवा कुत्रा यांची चित्रे हमखास असत. आता सर्कशींची संख्या रोडावली. पण घराघरांमध्ये प्राणी-पक्षी पाळण्याची टूम वाढली आहे. माणसाळलेले प्राणी किंवा पक्षी यांना प्रशिक्षण देण्याची असोशी त्यांच्या मालकांमध्ये वाढू लागली. त्यातूनच मग शिकलेल्या प्राणी-पक्ष्यांचे कौतुक यूटय़ूबवरून व्हिडीओजद्वारे प्रसारित केले जाऊ लागले. अशा ग्रॅण्ड घरगुती सर्कसचे प्रचंड दाखले यूटय़ूबवर पाहायला मिळतात. अमेरिका गॉट टॅलेण्ट कार्यक्रमात आलेले एक कुटुंब आपल्या विविध जातींच्या असलेल्या कुत्र्यांकडून सर्कशीतील कसरती करून घेताना दिसतात. दाम्पत्य आणि त्यांच्या लहान मुलीने या कुत्र्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या तालावर श्वानांनी संपूर्ण प्रेक्षागृह परीक्षकांसह ताब्यात घेतले आहे. यात कुत्री दोरीउडय़ा मारण्यापासून ते दोन पायांवर चालण्याचे, नृत्य करण्याचे चमत्कार करताना दिसतात. त्या व्यासपीठावर ते प्रेक्षकांना जराही न कचरता आपल्यातले उत्तम कलागुण माणसांसारखेच सादर करताना दिसतात. याचप्रमाणे एकाच वेळी दहा ते बारा कुत्र्यांना स्टेजवर आणून त्यांच्याकडून अचूक करामती करून घेणाऱ्या अवलिया कलाकाराचा व्हिडीओही लोकप्रिय आहे. हे कुत्रे आपापल्या जागांवर बसून खुणेनुसार माणसांनाही जमणार नाही इतक्या छान गमती करताना दिसतात. श्वानांना जसे माणसाळवून त्यांच्याकडून हव्या तितक्या चांगल्या सर्कसखेळांना राबविले जाते, तसेच मांजरांनाही योग्य प्रशिक्षण देऊन स्टेज शो केले जातात. एक व्यक्ती अनेक मांजरांचा ताफा घेऊन निव्वळ त्यांचे नृत्य आणि त्यांच्या चलाख हरकतींवर टाळ्या मिळविते. अभिनेत्री हेलनप्रमाणे कॅबरे नृत्य करणाऱ्या मांजरीही या शोमध्ये पाहायला मिळतात. नुसते एवढेच नाही, तर काही मांजरी नेत्रदीपक असा पोलडान्स करताना दिसतात. अमेरिका गॉट टॅलेण्टमध्ये अमेरिकी नागरिकांइतकेच प्राण्यांनाही समाविष्ट केले जाते. मालकिणीसोबत नृत्य करणारे, गाणी म्हणणारे कुत्रे इथे सापडतील तसेच मानवासारखा विचार करणारे डुक्कर आणि पोपटदेखील सापडतील. यातला डुक्कर फुटबॉल आणि गोल्फ खेळताना दिसेल तर पोपट सांगेल ते कठीण शब्द बोलून दाखविल्यावर प्रेक्षकांच्या टाळ्यांनंतर अभिवादन करतानाही सापडेल. बोलक्या बाहुल्यांसारखे एका व्यक्तीने आपल्या कुत्र्याला प्रशिक्षित केले आहे. यात तो व्यक्ती बाहुल्याचा आवाजही काढतो. पण त्याबरहुकूम तोंडाची हालचाल श्वान करताना दिसते.

नोरा नावाचे एक मांजर पियानो वाजवताना दिसते. या मांजराने आपल्या घरातील लहान मूल पियानो वाजवताना पाहिले. त्यानंतर ते व्यावसायिक पियानोवादकाच्या थाटातच या वाद्यावर बसून आपल्या शरीराच्या क्षमतेने त्यावरील स्वर वाजवू लागले. प्रत्येक नोटमधला फरक या मांजराला कळत असल्याने त्याचे या मांजराचे पियानोवादन वेगळेच ऐकायला मिळते. कुण्या एका माणसाने पाळलेल्या घुबडांपैकी प्रशिक्षित घुबड मोबाइलवरील गाण्यांवर नाचताना दिसते. याच व्हिडीओमध्ये दुसरे एक घुबड बाथटबमधील पाण्यावर लीलया तरंगताना दिसते. कोंबडीच्या पिल्लाशीच नव्हे तर पाळीव उंदराशी खेळणारे मांजर एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. बेरकी मांजरांचे व्हिडीओ यूटय़ूबवर मोठय़ा प्रमाणावर असले, तरी या व्हिडीओमध्ये मांजर कोंबडीच्या पिल्लाची देखभाल करताना पाहताना आश्चर्य वाटायला लागते.

या कुत्र्यांना शिकविले कसे जाते, ते चाणाक्ष कसे बनतात, याचाही एक व्हिडीओ पाहायला मिळतो. कुत्र्यांना नाव ठेवून त्यांना बोलावले जाते. त्यांना आकडय़ाचे गणित समजावले जाते आणि त्याबरहुकूम वागण्याची आज्ञा दिली जाते.

यातील सगळेच व्हिडीओ घरगुती पाळीव प्राण्यांना शिकवून व्यावसायिकरीत्या त्यांचे खेळ करणाऱ्या कलाकार पेटपास्टर्सचे आहेत. पूर्वी प्राण्यांना प्रशिक्षण देणे अवघड असे. आता तंत्रज्ञानाचा वापर करूनही या प्राण्यांच्या मेंदूवर जाणीवपूर्वक संस्कार कोरले जातात. शिस्तीत वागणाऱ्या या प्राण्यांकडून करामती करताना माणसांसारखी चूक कधीही घडत नाही. कारण माणसांहून कैक पटींनी त्यांची एकाग्रताक्षमता असते. जितक्या वेगाने घराघरांमध्ये प्राणी पाळले जातील, तितक्या त्या प्राण्यांमधील कौशल्य कॅमेरामध्ये पकडण्याची हौस वाढत जाईल. ग्रॅण्ड घरगुती सर्कशीचे नमुने तितक्या मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळतील.

https://www.youtube.com/watch?v=P2d_ovoIOXI

https://www.youtube.com/watch?v=pld_Nkfoa40

https://www.youtube.com/watch?v=opGZjJc5uko

https://www.youtube.com/watch?v=qYElFmbZJgY

https://www.youtube.com/watch?v=PYOSKYWg-5E

https://www.youtube.com/watch?v=x7zE7Fu8Dmw

https://www.youtube.com/watch?v=l4mKHbrlEt4

https://www.youtube.com/watch?v=B740GiFJh6k

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2017 12:34 am

Web Title: grand house circus circus video
Next Stories
1 व्हायरलची साथ : सबसे बडा ‘खिलाडी’
2 ‘ताण’लेल्या गोष्टी : दुभंगलेली मनं
3 चटकदार ठाणे
Just Now!
X