News Flash

‘कट्टा’उवाच : लॉलझ् ..

सुरुवातीला व्हॉट्सअ‍ॅपकडे फक्त काहीच प्रकारची हास्य दाखवणारे इमोजी होते

वेदवती चिपळूणकर

सातमजली हास्य नावाचा एक हास्याचा प्रकार कधीकाळी मराठी भाषेत अस्तित्वात होता. स्मितहास्य, खो-खो हसणं, खळखळून हसणं इत्यादी इतरही प्रकार मराठी भाषेत पाहायला मिळायचे. समोरच्या माणसाच्या क्रियेवर असलेली प्रतिक्रिया म्हणून अनेकदा माणूस हसतो. त्या माणसाची क्रिया काय आहे यावर प्रतिक्रियेची पद्धत आणि तीव्रता ठरते. ओळखीचं हसू हा एक प्रकार सोडता बाकी जवळजवळ सर्वच प्रकारचं हसणं ही एक प्रतिक्रिया असते. प्रचंड आवडलेल्या एखाद्या विनोदावर माणूस खो-खो हसतो तर आनंद झाल्यावर, मजा वाटल्यावर माणूस खळखळून हसतो. मात्र या ‘चॅटिंग’च्या प्रकारामुळे हसणंही अक्षरांच्या जुळणीतून व्यक्त होऊ लागलं आहे.

सुरुवातीला व्हॉट्सअ‍ॅपकडे फक्त काहीच प्रकारची हास्य दाखवणारे इमोजी होते. मात्र त्यात भर घालत आता सर्वच सोशल मीडियाने लोळून हसणारे, कुत्सित हसणारे, वाकडय़ा तोंडाने हसणारे, चिडवत हसणारे इत्यादी अनेक प्रकारचे इमोजी आणले आहेत. मात्र केवळ इमोजी नव्हे तर आपल्या शब्दांतून हसणं व्यक्त करण्यासाठीही ‘हाहाहा’ सोडता इंग्रजी हसण्याचे शॉर्टफॉर्म तरुणाईने खूप आधीच शोधून काढले आहेत आणि त्यात सतत भर पडतच असते. ‘लॉल’पासून ‘आर.ओ.एफ.एल.’ पर्यंत अनेक पद्धतींनी माणूस ‘ऑनलाइन’ हसतो.

‘लॉल’ याचा अर्थ ‘लाफ आऊट लाउड’ म्हणजेच ‘एलओएल’! तसाच ‘आर.ओ.एफ.एल.’चा अर्थ ‘रोल ओव्हर फ्लोअर लाफिंग’ म्हणजेच लोळून लोळून हसणे ! या शॉर्टफॉम्र्सना आजकाल जवळजवळ स्वतंत्र शब्द म्हणूनच भाषेत स्थान मिळालं आहे. या शब्दांचा वापर मात्र आपल्याला फायदेशीर ठरतो. आपल्याला खरोखर हसू येत असो किंवा नसो या शब्दांच्या वापराने समोरच्याला नक्की असं वाटतं की आपण काहीतरी चांगली प्रतिक्रिया देत आहोत. न आवडलेल्या विनोदांना उडवून लावण्याचा हा अत्यंत सोपा उपाय ज्यात समोरच्याला कळणार नाही की आपण खरंच हसलो की नुसताच ‘रिप्लाय’ दिला.

मुळात एक स्वतंत्र शब्द नसलेल्या या ‘शब्दाचं’ अनेकवचनही आपण तयार केलं आहे. नुसतं ‘लॉल’ म्हणून आपल्याला आपलं हसू पुरेसं दाखवता येत नसावं म्हणून कदाचित आपण त्याचं अनेकवचनात रूपांतर केलं आहे. सर्वसामान्यपणे इंग्रजी शब्दाचं अनेकवचन करताना आपण त्याला ‘एस’ लावतो; या प्रकरणात मात्र आपण जरा फॅन्सी पद्धतीने त्याला अनेक सारे ‘झेड’ लावले आहेत. या अनेक साऱ्या झेडमुळे कदाचित आपण खूप हसतो आहोत असं समोरच्याला वाटत असावं.

या लॉलझमुळे आपल्याला व्हच्र्युअल संवादात हसण्याचा शाब्दिक मुखवटा घालणं खूपच सोपं झालं आहे.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 12:36 am

Web Title: hashtag laugh out loud lol
Next Stories
1 ‘पॉप्यु’लिस्ट : पठडीबाहेरची गाणी!
2 ब्रॅण्डनामा : फॅब इंडिया
3 ‘बुक’ वॉल
Just Now!
X