नामांकित ब्रॅण्ड्सच्या जन्माची, साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेणारं हे सदर.

एक सुंदर वाक्य आहे. डोळे सर्वानाच जन्मत:च लाभतात पण दृष्टी किंवा नजर सगळ्यांकडेच नसते. ज्यांच्याकडे ही ‘नजर’ असते तिचा पुरेपूर वापर करून घेणारेसुद्धा विरळाच. एखादा ब्रॅण्ड जेव्हा यशस्वी होतो तेव्हा त्या ब्रॅण्डकर्त्यांकडे ती नजर असते. त्याला असं काही दिसतं जे त्या काळात वेडेपणाचं असेलही पण ते अन्य कुणालाही दिसत नाही. ही मंडळी काळाची गणितं बदलून तरी टाकतात किंवा नवी समीकरणं तरी जुळवतात. व्ही. जी. सिद्धार्थने कॅफे कॉफी डेच्या माध्यमातून अशीच नवी गणितं जुळवली. कॉफी पिणे ही क्रिया कॉफी पिणे एक अनुभव इतकी बदलवून टाकली. कॉफी व्यवसायाचं रूपच पालटून  टाकलं.

they were cheating people by mixing water in petrol people of jaipur exposed watch viral video
तुम्ही गाडीत पेट्रोलबरोबर पाणी तर भरत नाही ना! पाहा पेट्रोलपंपावरील घोटाळ्याचा धक्कादायक VIDEO
how VVPAT works
विरोधी पक्षांना EVM पेक्षा VVPAT मशीन का आवडते? राजकीय पक्षांना सर्व स्लिप्सची पडताळणी का हवी आहे?
how to choose right sports bra these small 6 tips can help you find correct fitting
जिमसाठी पहिल्यांदाच स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताय? मग ‘या’ सहा गोष्टींची काळजी घ्या
Eating walnuts on an empty stomach in the morning
अक्रोड खाताना ‘ही’ योग्य वेळ, पद्धत व प्रमाण पाळल्यास मेंदू होईल तल्लख; तुमच्या शरीरात काय बदलेल?

‘सीसीडी’कडे पाहताना अनेकांचा, ही परदेशातून आलेली एखादी कॉफीशॉपची साखळी असावी असा गैरसमज असतो. पण हा ब्रॅण्ड पूर्णत: भारतीय मेंदूतून जन्माला आलेला आहे. ब्रिटिश राजवटीत चहा, कॉफी ही पेयं आपल्याकडे खऱ्या अर्थाने रुजली. त्या काळातही कॉफी हाऊसेस होती पण सिद्धार्थने त्यांचं रूपडं बदललं. चिकमंगळूर कर्नाटक येथे सिद्धार्थचा जन्म झाला तो हजारो एकरांचे कॉफीचे मळे असणाऱ्या एका कुटुंबात. शिक्षण पूर्ण होताच सिद्धार्थने अर्थ विश्लेषक म्हणून दोन र्वष नोकरीदेखील केली पण काही तरी करायची ऊर्मी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. दोन वर्षांनी सिद्धार्थ घरी परतला. समोर होते अनेक एकरांवर पसरलेले कॉफीचे मळे. या कॉफी व्यवसायाचा अभ्यास केल्यावर त्याच्या लक्षात आलं की, वर्षांला एकशे वीस करोड कॉफी बॅग्ज देशभरात तयार होत असतील तर या निव्वळ कॉफी बीन्सच्या माध्यमातून सात अब्ज इतकं उत्पन्न मिळतं पण याच कॉफी बीन्सची जेव्हा कॉफी तयार होते तेव्हा तेच उत्पन्न शंभर अब्जांपर्यंत पोहोचतं. त्याला हा ७अब्ज ते १००अब्ज असा पल्ला गाठायचा होता. त्याला कॉफी हाऊसचा पर्याय खुणावू लागला. त्यासाठी कारणही तसंच घडलं. सिद्धार्थ मित्रांसोबत सिंगापूरला गेला होता तेव्हा तो अशा एका ठिकाणी पोहोचला जिथे लोक आनंदाने गप्पा मारत, इंटरनेट वापरत कॉफी पीत होते. ही कल्पना सिद्धार्थला भावली. पण थेट यात शिरण्याऐवजी त्याने आधी पाहणी करायचं ठरवलं. त्यासाठी त्याने एका मुलीची नेमणूक केली. त्या मुलीचा सव्‍‌र्हेचा अहवाल होता की, फक्त कॉफीसाठी असं कॉफीशॉप सुरू करणं फायदेशीर ठरणार नाही. तरीही सिद्धार्थने विचार बदलला नाही. त्याने एका प्रसिद्ध जर्मन कॉफी चेनचा आढावा घेतला. त्याच्या संस्थापकांच्या नातवाला भेटला. १०० डॉलरच्या गुंतवणुकीतून कॉफी पावडरच्या व्यवसायाला सुरुवात होऊन कॉफी शॉपमाध्यमातून हाच व्यवसाय कोटय़वधींची उलाढाल करू लागला ही माहिती सिद्धार्थला बळ देऊन गेली.

१९९६ मध्ये कॅफे कॉफी डेचं पहिलं आऊटलेट बंगळुरूमध्ये सुरू झालं. हे कॉफी हाऊस सर्वार्थाने वेगळं होतं. तेव्हा इंटरनेटचा वापर नव्यानेच सुरू झाला होता. कॅफेकॉफी डेमध्ये इंटरनेट सुविधा होती. निवांत गप्पा मारायची सोय होती. जोडीला उत्तम संगीत होतं. सिद्धार्थने हे सर्व तरुणाईला समोर ठेवून करण्याची कल्पकता दाखवली जी कमालीची यशस्वी ठरली. त्याची ही कल्पना तरुणाईने उचलून धरली. कॅफेकॉफी डेकडे तरुणाईची पावलं वळू लागली. कॅफे कॉफी डेकडे- अर्थात सीसीडीमध्ये हळूहळू सर्व वयोगटातील मंडळी जमू लागली.

१९९६ पासून सुरू झालेला हा प्रवास आज २००० आऊटलेट्सपर्यंत पोहोचला आहे. २८ राज्यांतील १३५ शहरांत सीसीडी पसरलंय. शिवाय जगभरातील काही शहरांतही या कॉफीची चव चाखली जातेय. अतिशय विचारपूर्वक आखणी करत आपलं प्रत्येक आऊटलेट नेमकं कुठे असेल याचा सिद्धार्थने बारकाईने विचार केला. स्वत: काही ठिकाणी फिरून त्याने सीसीडीची जागा निश्चित केली. त्याचं फलित हेच की त्यामुळे सीसीडी हा भारतातील सर्वात मोठा कॉफीशॉप ब्रॅण्ड ठरला आहे.

सीसीडीचा लोगो व टॅगलाइन यांचीही या वाटचालीत महत्त्वाची भूमिका आहे. सीसीडीचा लोगो ‘या रे या सारे या’ असा संदेश देतो तर, k A lot can happen over coffee ही टॅगलाइन चवीपुरती मर्यादित न राहता खूप काही सुचवते. आपल्या परंपरागत व्यवसायावर अवलंबून न राहता नव्या नजरेने सिद्धार्थने या व्यवसायाकडे पाहिलं. त्यातूनच एक ब्रॅण्ड मोठा झाला. चाकोरीची गणितं मोडल्याशिवाय हे होऊ  शकत नाही. फोब्र्ज मासिकाच्या यादीत ‘नव्या पिढीचा उद्योजक’ म्हणून सिद्धार्थने मिळवलेलं स्थान भारतीयांची मान उंचावणारं ठरलंय. मुळात सीसीडीत जाताना कॉफी तो सिर्फ बहाना है. कवी अनिलांच्या ओळींतील ‘मिसळुनी मेळ्यात कधी, एक हात धरूनी कधी, आपुलीच साथ कधी’ अनुभवण्यासाठी सीसीडी हा उत्तम पर्याय आहे. मित्रमैत्रिणींचा अड्डा इथे जमतो, ती व तो डोळ्यात डोळे घालून इथे बसतात, स्वत:शीच संवाद साधायला एकटय़ाने पावलं वळतात.

‘दिल ढुंढता है फिर वही फुरसतके रात दिन’ असा शोध घेणाऱ्या ह्रदयांसाठी हा ब्रॅण्ड म्हणजे दरवळणाऱ्या, फेसाळणाऱ्या कॉफीसोबतचा एक निवांत कोपरा आहे.

viva.loksatta@gmail.com